
Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?
संगीतकार बप्पी लहरी यांनी वेस्टर्न आणि इंडियन म्युझिक यांचा सुंदर मिलाफ करून भारतीय चित्रपट सांगितला समृद्ध केला खरं आर डी बर्मन यांचाच वारसा त्यांनी पुढे चालवला. तरी दखील बप्पी लहरी यांना डिस्को संगीताचे बादशहा म्हणून ओळखले जाते. वयाच्या अवघ्या 18 वर्षे त्यांनी ‘नन्हा शिकारी’ (१९७३) या चित्रपटाला संगीत देऊन बॉलीवूड मध्ये संगीताचा श्री गणेशा केला. या चित्रपटात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गाणी गायली होती. सिनेमा फ्लॉप झाला पण गाणी चांगली बनली होती.

बप्पी लाहिरी – किशोर कुमार या दोघांमध्ये रक्ताचं जरी नसलं तरी मामा भाच्याचं नातं होतं. त्यामुळे किशोर कुमार बद्दल बप्पीच्या मनात एक कायम सॉफ्ट कॉर्नर असायचा. 1975 साली आलेल्या ‘जख्मी’ या चित्रपटातील ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो मे…’ या किशोर कुमार यांनी गायलेले गाणे बप्पी लहरी यांचं नाव सर्वत्र झालं. यानंतर १९७६ साली विशाल आनंद यांच्या ‘चलते चलते’ या चित्रपटाला संगीत देताना त्यातील किशोर कुमारची सर्व गाणी विशेषतः ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना….’ हे सिनेमाचं शीर्षक गीत देशभर प्रचंड लोकप्रिय झालं. या चित्रपटाचा नायक विशाल आनंद होता तर नायिका नाजनीन आणि सिम्मी गरेवाल होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन भीष्म कोहली यांनी केले होते.
वाचकांना एक माहिती सांगितली पाहिजे. नायक विशाल आनंद म्हणजेच भीष्म कोहली! दिग्दर्शनासाठी त्याने हे नाव घेतलं होतं. विशाल आनंद हा देव आनंदच्या बहिणीचा मुलगा. ‘चलते चलते’ या चित्रपटाच्या नंतर त्याने आणखी एक चित्रपट लॉन्च केला. या चित्रपटाला संगीत बप्पी लहरी यांचेच होते. आणि गाणी अमित खन्ना यांनी लिहिली होती. चित्रपटाचे नाव ते ‘दिल से मिले दिल’ याची नायिका शामली होती. यातील गाणी देखील किशोर कुमार यांनी गायली. पहिले गाणे रेकॉर्ड झाले ‘ये नैना ये काजल खूबसूरत हो तुम एक गझल…’ किशोर कुमारने आपल्या सॉफ्ट रोमँटिक आवाजात हे गाणं गायलं होतं. यानंतर पुढचं गाणं होतं चित्रपटाचा टायटल सॉंग. ‘दिल से मिले दिल..’ हे गाणं जेव्हा किशोर कुमार कडे आलं तेव्हा त्याला ते गाणं खूप आवडलं. याच्या रिहर्सल पण सुरू झाल्या. नंतर किशोर कुमारने सांगितले या गाण्याचे रेकॉर्डिंग आपण काही दिवसानंतर करू!
रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. सर्व वादक, संगीतकार बप्पी लहरी आता किशोर कुमारची वाट बघू लागले. पण दुपारपर्यंत किशोर कुमारने आलेच नाही. इकडे रेकोर्डिंग स्टुडीओ त खूप गोंधळाचे वातावरण पसरले. बप्पी यांनी अनेकदा फोन केले पण किशोर कुमार चे घरी फोन उचलला नाही किंवा त्याच्याकडून देखील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये फोन आला नाही. शेवटी कंटाळून बप्पी लहरी आपला हार्मोनियम घेऊन थेट किशोर कुमार यांच्या घरी गेले. ‘गौरी कुंज’ च्या गार्डनमध्ये किशोर कुमार मस्तपैकी एक मॅगझिन वाचत बसले होते.
बप्पी लाहिरी ला पाहिल्यानंतर ते उभे राहिले. बप्पी ने विचारले,” मामा, तुम स्टुडिओ क्यू नही आये?” त्यावर किशोर कुमार ने त्याला बसायची खूण केली आणि सांगितले, “ भांजे , मै ये तेरा गाना नही गा सकता. ये गाना किसी और से गवाले. मै ये नही कहता ये गाना हिट नही होगा. ये गाना सुपरहिट होगा. लेकिन मै इसे नही गा सकता.” बप्पी च्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्याने विचारलं,” मामा लेकिन क्यू नही गा सकते?” त्यावर किशोर कुमार म्हणाला,” बप्पी, बेटा ये तेरा गाना अधुरा है रे.. उसे पुरा कर. फिर मै गाऊंगा!” त्यावर बप्पी ने विचारले,” मामा क्या अधूरा है? आप मुझे नही बतायेंगे तो कौन बतायेगा ?” त्यावर किशोर कुमार म्हणाला,” इसीलिए तो स्टुडिओ मे नही आया. अगर ये बात मै सबके सामने तो कहता एक म्युझिक डायरेक्टर की व्हॅल्यू कम हो जाती. मैं तुम्हारे व्हॅल्यू कम नही होना चाहता था. इसलिये मैने वहा आना मुनासिफ नही समझा और मुझे मालूम था तुम जरूर आओगे!” बप्पी यांनी किशोर कुमार चे पाय धरले!
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
किशोर कुमारने त्याला उचलले आणि सांगितलं,”बप्पी, मेरे भांजे , तेरा गाना अधूर है रे. सिच्युएशन के अनुसार तुम मुझे गाने को बोलता है लेकिन ये एक पार्टी सॉंग है. मै गाना अगर शुरू करुंगा तो अधुरा लगेगा. तो इसमे पहले कोरस डाल. कोरस गाना शुरू करेगा. फिर मै गाने में एन्ट्री लूंगा. और गाने को ज्यादा वेस्टर्न मत बना थोडा इंडियन फ्लेवर रहने दे ताकी लोग गाने को महसूस कर सके.” बप्पी किशोरचा एकूण एक शब्द शांतपणे ऐकत होता. तो लगेच स्टुडिओमध्ये गेला. म्युझिशियंस ला सूचना केल्या. कोरस कडून तयारी करून घेतली आणि किशोरला निरोप पाठवला. किशोरदा लगेच स्टुडिओत आले आणि गाण्याचा रेकॉर्डिंग झालं ‘ दिलसे मिले दिल हे..’ हे गाणं अप्रतिम बनलं होतं सिनेमाला फारसी यश मिळालं नाही पण या गाण्याच्या घटने तून किशोर कुमार यांचे संगीतकारा बाबत च्या भावना मात्र किती संवेदनशील होत्या हे लक्षात येतं!