‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Cm Devendra Fadnavis यांना अनिल कपूरच्या ‘या’ चित्रपटानं केलं प्रभावित!
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत राजकारण आमि राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले… मात्र, सर्वात लोकप्रिय ठरला तो अनिल कपूरचा ‘नायक’ (Nayak Movie) चित्रपट… सामान्य रिपोर्टर ते एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला असून फार महत्वाच्या दुरदृष्टीच्या राजकीय परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं… दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra fadnavis) यांना तुम्हाला कोणत्या चित्रपटाने प्रभावित केलं? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नायक चित्रपटाचा उल्लेख केला होता…. नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस जाणून घेऊयात… (Entertainment News)

अक्षय कुमार (Akshay Kumar) याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ‘फिक्की’च्या कार्यक्रमात घेतली. यावेळी फडणवीसांना अक्षय कुमारने विचारलं, की तुम्ही राजकारणातले स्टार आहात. कोणता चित्रपट किंवा कलाकार आहे, ज्याचा तुमच्यावर प्रभाव आहे? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “तुमच्या संवेदना किंवा मानवी भावनांना बरेच चित्रपट भावित करतात, तसे अनेक चित्रपट आहेत. राजकारणाचा विषय झाला, तर एका चित्रपट ने मला प्रभावित केलं आणि समस्याही वाढवल्या. तो चित्रपट म्हणजे अनिल कपूर, अमरिश पुरी, राणी मुखर्जी यांचा ‘नायक’ चित्रपट”. (Anil Kapoor movie Nayak)

पुढे ते म्हणाले की, “एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन तो लदिवसभरात इतकी कामं करतो, की मी जिथेही जातो लोकं म्हणतात, तुम्ही नायक सारखं काम करा, त्यांनी बघा कसं काम केलं, एका दिवसात जग पालटून टाकलं. मला एके दिवशी अनिल कपूर भेटले होते. मी त्यांना म्हटलं की कशाला बनवलात नायक चित्रपट? तो ‘नायक’ तर आम्ही ‘नालायक’ असं लोकांना वाटायला लागलं. एका दिवसात कशी इतकी कामं केली, मला वाटतं की या चित्रपटने बेंचमार्क सेट केला आहे. माझ्या भावनांना आकार देण्यासाठी या चित्रपटाने नक्कीच मला प्रभावित केलं आहे”. (Maharashtra Politics)
तसेच, पुढे फडणवीसांनी तुम्ही एखाद्या क्षेत्रात दीर्घ काळ काम केलं की तुमच्या संवेदना बोथट होतात, मात्र काही सिनेमांनी माझ्या या भावना जिवंत ठेवण्याचं काम केलं, मी असे चित्रपट पाहून पुन्हा तोच सर्वसामान्य माणूस बनतो, जो मी कायमच आहे, या उल्लेख करायला फडणवीस विसरले नाहीत.
================================
हे देखील वाचा : Mr India : अनिल कपूरच्या चित्रपटात सर्वाधिक खर्च खलनायकावर केला!
=================================
दरम्यान, २००१ मध्ये एस. शंकर दिग्दर्शित ‘नायक’ हा चित्रपट रिलीज झाला होता… या चित्रपटाने सामान्य माणसांच्या आणि राजकारणांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं… सामान्यांच्या समस्या आणि त्या कशा सोडवल्या जाव्यात याचाच एक छोटासा परंतु प्रभावी नमुना यात दाखवण्यात आला होता… या चित्रपटात अनिल कपूर, परेश रावल, अमरीश पुरी, राणी मुखर्जी, नीना कुलकर्णी, पुजा बत्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या… (Nayak Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi