
Aryan Khan-Shah Rukh Khan अडचणीत; समीर वानखेडेंच्या ‘त्या’ तक्रारीमुळे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
आर्यन खान दिग्दर्शित The Ba***ds Of Bollywood ही वेब सीरीज तुफान गाजली… परंतु, या सीरीजमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईचे माजी झोनल संचालक आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह सीन दाखवण्यात आल्याचा दावा वानखेडेंनी केला होता.. या मुद्दावरुन त्यांनी शाहरुख आणि गौरी खान यांना कोर्टात खेचत त्यांच्यावर मानहानीची तक्रार दाखल केली होती.. आता या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांना समन्स जारी केले आहेत. (Shah Rukh and Gauri Khan)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर संलग्न कंपन्यांना ७ दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आर्यन आणि शाहरुख खान समीर वानखेडेंमुळे अडचणीत सापडले आहेत… (Sameer Wankhede vs Aryan Khan)
समीर वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेत शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडसह नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांचे नाव आहे. The Ba***ds Of Bollywood विरोधात समीर यांनी २ कोटींची नुकसानभरपाई मागितली असून ही नुकसानभरपाईची रक्कम कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करावी असेही त्यांनी सांगितले आहे.
================================
=================================
काय होतं २०२१ ड्रग्ज प्रकरण?
२ ऑक्टोबर २०२१ रोजी समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असताना त्यांनी आर्यन शाहरुख खान याला कॉर्डिलिया क्रूझवरून अटक केली होती. त्याच्याकडे अमली पदार्थ आढळल्याचा दावा त्यांनी केला होता. अटकेनंतर आर्यन खान (Aryan Khan) याला २५ दिवस तुरुंगवनास भोगावा लागला होता.. दरम्यान या कारवाईवर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव असल्याचा आरोप करतसमीर वानखेडे यांनी सेलिब्रिटींना जाणीवपूर्वक ड्रग्जच्या प्रकरणात अडकवले होते, असाही दावा त्यांनी केला होता. (Sameer Wankhede And Aryan Khan drugs case)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi