‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Love Story सिनेमाच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला स्टार पुत्रांच्या च्या सिनेमांची भाऊ गर्दी झाली. सुनील दत्त, धर्मेंद्र, मनोजकुमार, राजेंद्रकुमार यांच्या मुलांचे रुपेरी पडद्यावर मोठ्या दणक्यात लॉचिंग चालू होते. संजय दत्त (रॉकी), सनी देओल (बेताब) कुमार गौरव (लव्ह स्टोरी) हे तीनही सिनेमे वर्षभराच्या अंतरात झळकले आणि तीनही सिनेमे सुपर हिट झाले. आज हे सिनेमे येवून पंचे चाळीस वर्ष झालीत. काळाच्या ओघात कुमार गौरव विस्मृतीत गेलाय. संजय दत्त ने आता काम कमी केलय. सनी मात्र आजही जोशात आहे.त्याचा बॉर्डर-2 लवकरच प्रदर्शित होतो आहे. खरं तर या तिघात कुमार गौरव ची हवा त्या काळात प्रचंड निर्माण झाली होती. ‘लव्ह स्टोरी’ सुपर हिट झाला हता. या सिनेमाच्या मेकिंग ची गोष्ट देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे.

तत्पूर्वी या सिनेमाची स्टार कास्ट आपण पाहूयात या सिनेमातून कुमार गौरव आणि विजेता पंडित ही नवीन तरुण जोडी बॉलीवूडमध्ये आली होती आणि हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता जर 1981 सालच्या आपण चित्रपटांकडे जर यादीकडे पाहिलं तर त्यामध्ये सर्वात हिट सिनेमा म्हणून मनोज कुमारच्या ‘क्रांती’ चा उल्लेख होतो. दुसऱ्या क्रमांकावर मनमोहन देसाई यांच्या ‘नसीब’ होता. आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘लव्हस्टोरी‘चा होता. हा ‘लव्ह स्टोरी’ चित्रपट बनवला होता राजेंद्र कुमार यांनी. राजेंद्र कुमार तेच जे जुबली स्टार होते साठच्या दशका मध्ये. राजेंद्रकुमार यांनी आपल्या मुलाला लॉन्च करण्यासाठी ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. त्या काळात या सिनेमाचं बजेट जवळपास एक कोटी सात लाख रुपये होते. आणि या सिनेमाने त्या काळात साडेतीन कोटीचा धंदा केला होता!
आता बघुयात या सिनेमाच्या इतर मेकिंग च्या गोष्टी. मिर्झा ब्रदर्स यांनी या सिनेमाची कथा लिहिली होती खरंतर ही कथा आवडली होती रमेश बहन यांना आणि रमेश बहल या कथानकावर चित्रपट बनवणार होते सुनील दत्त यांच्यासाठी. सुनील दत्त यांनी आपले पुत्र संजय दत्त यांच्यासाठी हा चित्रपट बनवायचा ठरवलं होतं. पण पुढे काही कारणामुळे सुनील दत्त , रमेश बहल आणि मिर्झा ब्रदर्स यांच्यात एकवाक्यता झाली नाही आणि तो चित्रपट काही बनलाच नाही. नंतर मिर्झा ब्रदर्स यांनी हीच कथा राजेंद्र कुमार यांना ऐकवली आणि राजेंद्र कुमार यांनी या कथानकावर चित्रपट बनवला ‘लव्ह स्टोरी’.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
परंतु या सगळ्या गदारोळामध्ये राजेंद्रकुमार आणि सुनील दत्त या दोघांमध्ये विनाकारण मतभेद निर्माण झाले आणि पराकोटीचे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. पण कधी कधी काही गमतीच्या गोष्टी अशा घडतात की आणखी दोन-तीन वर्षानंतर म्हणजे १९८४ साली एका गोड बातमीने या दोघांमधील दुरावा कायमचा मिटला. राजेंद्र कुमार यांचे चिरंजीव कुमार गौरव आणि सुनील दत्त यांची कन्या नम्रता दत्त यांनी लग्न १९८४ साली लग्न केलं आणि या दोघांमधील दुरावा या निमित्ताने मिटला. राजेंद्रकुमार यांनी या सिनेमासाठी दिग्दर्शक म्हणून त्यावेळेला राहुल रवैल यांची निवड केली. राहुल रवैल यांचा तोपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण राज कपूरचे सहाय्यक असल्यामुळे त्यांचं टॅलेंट बॉलिवूडला माहीत होतं.
‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत असतानाच त्यांना धर्मेंद्र च्या मुलाचा सनी देओलचा ‘बेताब’ हा पहिला सिनेमा हा दिग्दर्शनासाठी मिळाला. आणि साहजिकच त्यांचं लक्ष या प्रोजेक्ट कडे गेल्यामुळे राजेंद्रकुमार राहुल रवैल वर प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी या सिनेमातून त्यांना चक्क काढून टाकलं. नंतर या सिनेमाचे दिग्दर्शन नव्वद च्या दशकातील ख्यातनाम दिग्दर्शक डेव्हिड धवन हे त्या लव्ह स्टोरीचे सुरुवातीला एडिटर होते त्यांनी या सिनेमाचा काही भाग दिग्दर्शित केला. काही भाग पुढे राजेंद्रकुमार यांनी देखील दिग्दर्शित केला. त्यामुळे सिनेमाच्या क्रेडीटस मध्ये (श्रेय नामावली ) मध्ये जेव्हा दिग्दर्शक म्हणून कोणाचं नाव द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला राजेंद्रकुमार यांनी ती बाजू चक्क कोरी ठेवली आणि ‘अ फिल्म बाय राजेंद्रकुमार’ असे लिहून या प्रकरणावर पडदा टाकला!
या सिनेमाचे नायिका विजेता पंडित हिच्या जागी सुरुवातीला टीना मुनीमचा देखील विचार झाला होता पण टीना मुनीम त्याच वेळेला ‘रॉकी’ या चित्रपटाचा शूटिंग करत असल्यामुळे तिने या सिनेमासाठी डेट देऊ शकली नाही आणि ते विजेता पंडित हिचीच वर्णी लागली. त्याचप्रमाणे या चित्रपटातील डॅनी डेंजप्पा च्या भूमिकेसाठी सुरुवातीला संजीव कुमार चा विचार झाला होता परंतु संजीव कुमारच्या देखील डेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे डॅनी ला भूमिका मिळाली. या चित्रपटातील विद्या सिन्हा ची भूमिका खरं तर सुलक्षणा पंडित हिला करायची होती पण राजेंद्र कुमारने एकाच चित्रपटांमध्ये दोन दोन बहिणी नको म्हणून तिला नाही म्हटले आणि विद्या सिन्हा ला ही भूमिका मिळाली. सिनेमाच्या शूट साठी राजेंद्र कुमार यांनी निवडलेली लोकेशन्स खूप छान होती आणि या चित्रपटातील गाणी विशेषत: ‘याद आ रही है’, ‘देखो मैने देखा है एक सपना’ खूपच चांगल्या पद्धतीने चित्रित झाली होती आणि आज देखील ती लोकप्रिय आहेत.

या चित्रपटांमध्ये अरुणा इराणीची देखील एक भूमिका होती आणि तिला देखील एक गाणं या चित्रपटामध्ये मिळालं होतं. या सिनेमाचा नायक कुमार गौरव हा रातोरात स्टार बनला त्याचा फॅन फॉलोइंग विशेषतः फीमेल फॅन खूप वाढला होता. प्रत्येक तरुणीसाठी तो लव्हर बॉय वाटत होता आणि एक चॉकलेट बॉय ही त्याची इमेज या निमित्ताने निर्माण झाली होती. कुमार गौरव उद्याचा राजेश खन्ना म्हणून देखील मीडिया मधून त्याच्यावर लेख त्या काळात येत होते. परंतू तरुणींच्या या ड्रीम बॉयला मात्र पुढे बॉलीवूडमध्ये फार काही करता आलं नाही. कारण लव्ह स्टोरी हा त्याचा एकमेव बम्पर हिट सिनेमा ठरला. या सिनेमा नंतर आलेले रोमान्स ,स्टार , लवर्स हे सिनेमे थोडेफार गाजले पण हा काही इस्टॅब्लिश होऊ शकला नाही. खरंतर त्याच्यामध्ये पोटेन्शिअल खूप चांगलं होतं चांगला अभिनय तो करत होता. अलीकडचे स्टार जे आहे शाहरुख खान अक्षय कुमार यांनी देखील आम्ही बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना आमच्या समोर आयडियल म्हणून आम्ही कुमार गौरव याच्याकडेच पाहत होतो असं त्यांच्या इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं.
राजेंद्र कुमार यांनी १९८६ साली महेश भट्ट यांच्याकडे एक चित्रपट दिग्दर्शना साठी दिला होता ‘नाम’. या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि कुमार गौरव यांच्या प्रमुख भूमिका होत्या कुमार गौरवचा अभिनय खूप चांगला होता या सिनेमांमध्ये. हा सिनेमा चालला देखील खूप छान. याच्या एक वर्ष आधी १९८५ साली महेश भट यांनीच दूरदर्शनसाठी ‘जनम’ नावाची एक टेली फिल्म केली होती. ही भारतातली पहिली टेली फिल्म होती आणि कुमार गौरव चा यात अतिशय अप्रतिम अभिनय झाला होता हे सगळं असून देखील त्याला व्यावसायिक यश फारसे मिळाले नाही. अगदी माधुरी दीक्षितला घेऊन देखील राजेंद्रकुमार यांनी ‘फूल’ नावाचा एक चित्रपटाची निर्मिती केली होती कुमार गौरव याला पुन्हा एकदा लॉचिंग करण्याचा प्रयत्न केला पण हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. नंतर कुमार गौरव यांनी अभिनयाकडे पाठ फिरवून बिजनेस मध्ये लक्ष घातले. पुढे बऱ्याच वर्षांनी तो संजय गुप्ता यांच्या ‘कांटे’ या चित्रपटात रसिकांच्या समोर आला. त्याचप्रमाणे मजहर खान यांच्या ‘गॅंग’ या चित्रपटात देखील तो दिसला.
‘लव्ह स्टोरी’ चे कथानक त्या काळाशी सुसंगत असे होते. दोघांच्या घरातून विरोध दोघांनी पळून जाणं या टाईपचे कथानक होतं. पण ते खूप छान पद्धतीने सिनेमात दाखवल्यामुळे तरुणाईने हा सिनेमा डोक्यावर घेतला. सिनेमातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती आणि आर डी बर्मन यांनी यानी संगीत दिलं होतं. या सिनेमातील गाणी अमित कुमार यांनी गायली होती. अमित कुमार आणि कुमार गौरव हे कॉम्बिनेशन पुढे काही वर्ष खूप चांगलं चाललं होतं. या चित्रपटांमध्ये खरंतर किशोर कुमार देखील गाणार होता आणि किशोर कुमारला त्यासाठी रेकॉर्डिंग ला बोलवण्यात आलं होतं. पण गंमत अशी झाली की किशोर कुमार ज्यावेळेला रेकॉर्डिंग ला गेला उलट पावली तो परत आला याचं कारण असं की त्याला कळालं की हा सिनेमा राजेंद्रकुमार प्रोड्यूस करतोय! राजेंद्र कुमार आणि किशोर कुमारचा काय भांडण होतं? आपल्याला थोडसं मागे जायला लागेल.
१९७४ साली एक सिनेमा आला होता ‘सुनहरा संसार’. यामध्ये राजेंद्र कुमार आणि हेमामालिनी हि पेअर होती. या सिनेमाचं संगीत नौशाद अली यांनी दिलं होतं आणि या सिनेमात पहिल्यांदाच नौशाद यांच्या संगीत नियोजनाखाली किशोर कुमार यांनी गाणं गायलं होतं. किशोर कुमारचं हे एकमेव गाणं होतं त्यांच्याकडचे! त्या दृष्टीने किशोर कुमार साठी हा खूप ऐतिहासिक सिनेमा होता . पण दुर्दैवाने राजेंद्रकुमार यांनी हे गाणं चित्रपटातून कापल्यामुळे किशोर कुमारचा राजेंद्र कुमार वर थोडासा राग होता आणि त्यामुळे त्यांना ह्या सिनेमासाठी गाणं गायला नकार दिला होता. या सिनेमाला त्या काळात कुठले पारितोषिक मिळाली होती? बेस्ट प्ले बॅक सिंगरचे अवॉर्ड अमित कुमार यांना ‘याद आ रही है…’ या या गाण्यासाठी मिळालं होतं.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
================================
या चित्रपटाचे संगीतकार आर डी बर्मन यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून नॉमिनेशन मिळालं होतं. त्याप्रमाणे बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून अमजद खान यांना देखील नॉमिनेशन मिळालं होतं. त्याप्रमाणे गीतकार आनंद बक्षी यांना ‘याद आ रही है..’ या गाण्यासाठी नॉमिनेशन मिळालं होतं पण अवॉर्ड मात्र फक्त अमित कुमार यालाच मिळाला. या सिनेमाने खरंतर अमित कुमार याची कारकीर्द चांगली बहरली पण कुमार गौरवला मात्र फार काही पुढे करता आलं नाही मित्रांनो आज आपण लव्ह स्टोरी या सिनेमाला रिलीज होवून ४५ वर्षे पूर्ण होत आहेत.