‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kantara – Chapter 1 : हजार वर्ष जुन्या साम्राज्यात ‘ही’ गोष्ट होती?; मोठी चूक पाहून डोक्याला हात लावाल!
सगळीकडे सध्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाची भयंकर क्रेझ आहे… हजारो वर्ष बांगरा, कांतारा या साम्राज्यांची कथा… त्यातच पंजुर्ली आणि गुलिगा या त्यांच्या दैवांची अंगावर काटा आणणारी रहस्यमय कथा प्रेक्षकांना भावली आहे… अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty( हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असून २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा ‘कांतारा: चॅप्टर १’ हा प्रीक्वेल आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा फार कमी दिवसांमध्ये पार करणाऱ्या ‘कांतारा: चॅप्टर १’मधील एक मोठी चूक प्रेक्षकांच्या नजरेस पडली आहे. इतक्या मोठ्या चित्रपटात ही चूक झालीच कशी असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे…

खरं तर कांतारा १ चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टीनं प्रचंड मेहनत घेतली. इतका मोठा भव्य इतिहास दाखवण्यासाठी त्याने फार बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि शुटींग पुर्ण केलं… मात्र, इतकी काळजी घेऊनही चित्रपटाच्या एका महत्त्वपूर्ण दृश्यात एक मोठी आणि ऐतिहासिक चूक प्रेक्षकांच्या लक्षात आली आहे. चित्रपटातील ‘ब्रह्मकलश’ (Brahmakalsh Song from kantara 1) गाण्यात दिसतं की, देवांच्या उत्सवात गावकरी केळाच्या पानांवर जेवण करत आहेत. उत्सव सुरू आहे. पण, एका कोपऱ्यात एक मोठ प्लास्टिकचा पाण्याचा कॅन स्पष्टपणे दिसत आहे. ‘कांतारा चॅप्टर-१’ ची कथा ही चौथ्या शतकातील असून प्लास्टिकचा शोध हा २० व्या शतकात लागला. ही एक ऐतिहासिक असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. शिवाय, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ऋषभ शेट्टीकडून अशी चूक अपेक्षितच नव्हती असं देखील लोकं म्हणत आहेत… (Kannada movie)

दरम्यान, ‘कांतारा चॅप्टर-१’ सारख्या भव्य चित्रपटात अशा चुकीची बिलकूल अपेक्षा नव्हती, नेटकऱ्यांनी चित्रपटाचा आणि टीमला या मुद्द्यावरुन ट्रोल केलं आहे… काही जणांनी या चुकीची तुलना २०१९ मध्ये जगप्रसिद्ध हॉलिवूड सीरिज ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) मध्ये झालेल्या एका मोठ्या चुकीशी केली आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या एका भागात अचानक मध्ययुगीन सेटवर स्टारबक्सचा कॉफी कप दिसला होता, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता याच दर्जाची ‘कांतारा चॅप्टर-१’ मधील प्लास्टिकच्या बाटलीची चूक मानली जात आहे… इतकंच नाही तर चित्रपट एडिट करताना एडिटरच्याही ही गोष्ट लक्षात कशी आली नाही यावरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे… आता यावर ‘कांतारा १’ च्या टीमकडून किंवा ऋषभ शेट्टीकडून काही स्पष्टीकरण येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Rukmini Vasanth : ‘कांतारा – चॅप्टर १’ मधली ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
================================
‘कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १’ चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने देशात ४४१ कोटींचा आणि जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे… ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात ‘कांतारा – चॅप्टर २’ देखील येत्या काळात येणार यावरु शिक्कामोर्तब झाला आहे… या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह रुक्मिणी वसंत, गुलशन देवैय्या, जयराम, राकेश पुजारी, प्रमोद शेट्टी अशा बऱ्याच कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत… (Kantara 1 Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi