Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार

Red Soil Stories च्या शिरीष गवसला नेमकं काय झाल होत?

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत?

 Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत?
बात पुरानी बडी सुहानी

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत?

by धनंजय कुलकर्णी 14/10/2025

सत्तरच्या दशकामध्ये समांतर चित्रपट, आर्ट सिनेमा अर्थात कलात्मक चित्रपटांसाठी भारतात खूप चांगले दिवस होते. खरं तर सत्तरचे  दशक हे भारतीय सिनेमासाठी अत्यंत स्थित्यंतराच्या दशक होते एकीकडे रोमँटक म्युझिकल सिनेमाच्या जागी ॲक्शन पॅक सिनेमाने आपला जॉनर दाखवायला सुरुवात केली होती. त्याचवेळी लो बजेट आशय गर्भ सशक्त कथानक मिनिंग फुल असे  चित्रपट समांतर चित्रपटाच्या माध्यमातून येत होते. या समांतर सिनेमाचे अनेक शिलेदार होते त्यापैकी एक होते श्याम बेनेगल.

1974 सालच्या ‘निशांत’ या चित्रपटापासून त्यांनी मायानगरीत प्रवेश केला. 1977 साली त्यांनी ‘मंथन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होता. कारण एक तर ही सत्य कथा होती या सिनेमाला फायनान्स गुजरातच्या पाच लाख शेतकऱ्यांनी केला होता. प्रत्येकी दोन रुपये त्यांनी देऊन क्राउड फंडिंगच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती झाली होती. कदाचित जगातील हा पहिला चित्रपट असावा ज्याचे क्राउड फंडिंग झाले होते. हा सिनेमा भारतातील ‘ऑपरेशन व्हाईट फ्लड’ अर्थात ‘श्वेतक्रांती’ या विषयावर होता. डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी भारतातील प्रत्येक घरापर्यंत दूध पोचायला  हवं यासाठी ही मोहीम सुरू केली होती. गुजरात मधील अमूल  या  दूध उत्पादक कंपनी च्या माध्यमातून ही सर्व मोहीम चालू होती.  गुजरात मधील खेडा गावातील अनेक गरीब शेतकरी रोज दूध या कंपनीला आणून देत असतात यातून ही सहकारी तत्वावर चळवळ उभी राहिली. हे काम सोपं नव्हतं. अनेक अडचणी होत्या. लोकांचे पारंपारिक विचारसरणी होती. गरीब , श्रीमंत, सवर्ण, दलित हा जातीभेद संघर्ष होता. हे आणि असे अनेक अडथळे होते. पण या सर्व अडथळ्यांचे शर्यतीवर मात करत व्हर्गीस कुरियन यांनी ही मोहीम सक्सेसफुल करून दाखवली. भारतीय स्वातंत्र्यानंतर च्या दशकातील हि कथा होती.

================================

हे देखील वाचा : अभिनेत्री स्मिता पाटील का खुश होती ‘या’ दिग्दर्शकावर ?

================================

याच सक्सेस स्टोरीला श्याम बेनेगल यांनी पडद्यावर आणण्याचे ठरवले. या चित्रपटाचे कथानक वर्गीस कुरियन आणि श्याम बेनेगल यांनी लिहिले होते. स्क्रीन प्ले आणि संवाद विजय तेंडुलकर यांनी लिहिले होते. चित्रपटाला संगीत वनराज भाटिया यांचे होते. चित्रपटात स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शहा, अनंत नाग,  कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, अंजली पैंगणकर यांच्या  प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे सर्व शूट थेट गुजरात च्या लोकेशन्स वर घेतले होते. बजेट अगदीच कमी असल्यामुळे कलावंतांनी अक्षरशः फुकटामध्ये या सिनेमात काम केले होते. पण सर्वांची जिद्द होती की हा चित्रपट पूर्ण करायचा. हा चित्रपट पूर्ण करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. गुजरातमध्ये त्या काळात प्रचंड दुष्काळ होता. अशा परिस्थितीत हा चित्रपट पूर्ण झाला. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळण्याची अजिबात खात्री कुणालाच नव्हती. पण अनपेक्षित पणे या चित्रपटाला खूप चांगले यश मिळाले. गुजरात मध्ये शेतकरी आपलीच सक्सेस स्टोरी पाहण्यासाठी गर्दी करू लागले.  संपूर्ण देशात देखील या चित्रपटाला खूप चांगले यश मिळाले.

या चित्रपटांमध्ये फक्त एकच गाणं होतं. ‘मेरो गाम काठा पारे’ हे गाणं गायिका प्रीती सागर यांनी गायलं होतं. खरं तर या चित्रपटात गाण्याला तशीच सिच्युएशन नव्हतीच  पण सत्यदेव दुबे यांच्या आग्रहासाठी हे गाणं या चित्रपटात घेतले गेले.  या गाण्याचे बोल प्रीती सागर आणि तिच्या बहिणीने नीती सागर यांनी लिहिले होते. प्रीती सागर यांच्या साठी हे गाणं म्हणजे तिचं सिग्नेचर सॉंग बनलं. चित्रपटात हे गाणं सात वेळेला येते. चित्रपटाचे क्रेडिट्स चालू असताना या गाण्याची गती थोडीशी वाढवली होती. हे गाणं या चित्रपटासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. खरं तर हे लोकगीत नव्हतं पण लोकगीताच्या शैलीमध्ये ते बनलं होतं.

या गाण्याची आणखी एक गंमत म्हणजे या गाण्याचे कनेक्शन इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स सोबत देखील आहे.  प्रिन्स चार्ल्स ऐंशी च्या दशकाच्या सुरुवातीला भारतामध्ये आले होते. त्यावेळेला ते आवर्जून आनंद येथे या प्लांटला भेट देण्यासाठी गेले होते. तिथे व्हर्गीस कुरियन यांच्यासोबत त्यांची मीटिंग होते.  प्रिन्स चार्ल्स यांना या चित्रपटातील हे गाणं खूप आवडलं होतं. या मिटिंगला प्रीती सागर उपस्थित होत्या. प्रिन्स चार्ल्स  यांनी ते गाणे ऐकवण्याची विनंती केली. प्रीती सागर ने त्यांच्यासमोर गाणं लाईव्ह सादर केलं होतं. त्यामुळे या गाण्याला जागतिक लोकप्रियता मिळाली. हे गाणे नंतर अमूल ने त्यांच्या प्रमोशन साठी वापरले गेले.

================================

हे देखील वाचा : ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

================================

‘मंथन’ हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आला. नंतर हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर साठी ऑफिशियल एंट्री म्हणून पाठवला गेला. कांस फिल्म फेस्टिवल मध्ये देखील या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 50 वर्षे होत आहेत पण या चित्रपटातील आशय आणि गुजरात मधील सत्यकथा ला दिलेली ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे आज देखील अनेक फेस्टिवल्स मध्ये हा सिनेमा आवर्जून दाखवला जातो. श्याम बेनेगल यांचा देखील हा आवडता चित्रपट आहे!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood entertainment current news entertainment retro news manthan movie mohan aghashe nasaruddin shah Smita Patil Vijay Tendulkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.