Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

बॉलीवूड सिनेमा आणि Diwali रिलीजचे गणित!
आपल्याकडे सिनेमा हा उद्योग रेल्वेनंतर सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बऱ्यापैकी चालना या उद्योगामुळे मिळते. अलीकडच्या काळात तर सिनेमाची सगळीच गणित बदलून गेलेली आहे. आपला देश हा ग्राहकाभिमुख असल्यामुळे त्याला आवडेल असा प्रॉडक्ट आपण देत असतो. सिनेमाच्या बाबत तसंच झालेला आहे. अलीकडच्या काळात मल्टिप्लेक्स कल्चर आल्यामुळे सिनेमाच्या यशाची गणित काहीशी बदलली जरी असली तरी सिनेमा या माध्यमाची गोडी तसू भरी कमी झालेली नाही.

सिनेमाच्या निर्मात्यांनी या उद्योगात प्रचंड पैसा ओतला असल्याने तो वसूल करण्यासाठी ते कायम प्रयत्नांत असतात. निर्माते/फायनान्सर/डिस्ट्रीब्यूटर बऱ्यापैकी अंधश्रद्धाळू असल्यामुळे सिनेमा कधी रिलीज करायचा यावर त्यांचा फार मोठा काथ्याकुट चालू असतो. दिवाळी,गणपती, रमजान ईद, ख्रिसमस, नवीन वर्ष… हे असे सण आहेत की यावेळी लोकांकडे वेळ आणि पैसा भरपूर असतो. त्यामुळे या काळात चित्रपटाला गर्दी होणं हे गॅरेंटीने समजले जाते. हे मुहूर्त गाठण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. हा अगदी सुरुवातीपासूनचा फंडा आहे. अलीकडच्या काळात सिनेमा रिलीजचा डेटाबेस बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे नव्वद सालच्या नंतरचे सिनेमे आणि त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा आपल्याला व्यवस्थित माहिती असतात. पण त्यापूर्वी देखील दिवाळीचा मुहूर्त प्रत्येक निर्माता आपल्यासाठी गाठत असायचा. अर्थात दिवाळीला रिलीज झालेले सगळे सिनेमे काही हिट होत नव्हते पण एक अपेक्षा निर्मात्यांना असायची की या निमित्ताने आपला सिनेमा प्रेक्षक जास्त संख्येने बघतील!

अगदी जुन्या काळात जायचं म्हटलं तर १९५७ साली मेहबूब यांचा ‘मदर इंडिया’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता आणि सुपरहिट झाला होता. १९७१ साली ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट देखील दिवाळीच्या मुहूर्ता आला होता आणि बंपर हिट बनला होता. सत्तरच्या दशकात १९७३ सालच्या दिवाळी मुहूर्तावर ‘यादों की बारात’ १९७६ साली ‘मेहबूबा’ तर १९७८ साली ‘मुकद्दर का सिकंदर’ प्रदर्शित झाले होते. (Bollywood Retro Movies)

एन चंद्रा यांचा ‘तेजाब’ १९८७ साली प्रदर्शित झाला आणि माधुरीचे स्टार बदलले. १९८९ साली सुभाष घई यांचा ‘राम लखन’ आणि विधू विनोद चोप्रा यांचा ‘परिंदा’ दिवाळीच्या आसपास झळकले आणि सुपर हिट ठरले. आपण जेव्हा १९९० च्या दशकापासूनचा दिवाळी रिलीजचा आढावा घेऊ लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की १९९३ साली शाहरुख खानचा ‘बाजीगर’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्ता प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर हिट झाला. अब्बास मस्तान दिग्दर्शित या सिनेमा पासूनच शाहरुखचे स्टार पालटले. आणि तिथून पुढे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले बहुतेक सर्व सिनेमे बम्पर हिट झाले.
शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ या दिवशी प्रदर्शित झाला. जो आज देखील मुंबईच्या मराठा मंदिर थिएटर मध्ये चालू आहे. इतका प्रदीर्घ काळ चालणारा चित्रपट कदाचित हा जगातील विक्रम असावा. १९९६ सालच्या दिवाळीत आमिर खान आणि करिष्मा कपूरचा ‘राजा हिंदुस्तानी’ हा ऑल टाइम हिट सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. त्याच्यात पुढच्या वर्षी १९९७ साली शाहरुख खान करिष्मा कपूर आणि माधुरी दीक्षितचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट दिवाळीत आला आणि सुपर डुपर हिट बनला.

दिवाळी आणि शाहरुख खान याचं जणू अतूट नातच होतं. कारण १९९८ साली शाहरुख खान काजोल राणी मुखर्जी यांचा करन जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर बनला. राजश्री प्रॉडक्शनचा ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट १९९९ च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने देखील जबरदस्त बिझनेस केला होता. २००० साली शाहरुख खान अमिताभ बच्चनचा ‘मोहब्बते’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. बी आर चोप्रा यांचा ‘वीर-झारा’ हा चित्रपट २००४ च्या दिवाळीत प्रदर्शित झाला. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला मदन मोहन यांचे संगीत होते. २००७ च्या दिवाळीमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ऑल टाइम ब्लॉकबस्टर रेकॉर्ड ब्रेकर ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच दिवशी रणवीर कपूरचा ‘सांवरिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तो सुपर फ्लॉप झाला होता.
‘गोलमाल’ सिरीज ही बऱ्यापैकी दिवाळीच्या आसपासच रिलीज होत होते आणि सर्व सिनेमे हिट होत होते. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ हा सिनेमा २०१२ सालच्या दिवाळीत प्रदर्शित झाला होता. रितिक रोशन आणि प्रियंका चोप्रा यांचा ‘क्रिश’ हा चित्रपटाने २०१३ ची दिवाळी गाजवली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. २०१४ च्या दिवाळी मध्ये शाहरुख आणि दीपिकाचा ‘हॅपी न्यू इयर’ हा सुपरहिट चित्रपट दिवाळीच्या मुहूर्ता प्रदर्शित झाला होता. ‘प्रेम रतन धन पायो’ हा राजश्री प्रोडक्शन चा चित्रपट २०१५ च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने चांगला बिझनेस केला.(याच दिवशी मराठी ‘कट्यार काळजात घुसली’ प्रदर्शित झाला होता.)
================================
हे देखील वाचा : crisis : Lalita Pawar आणि Ashok Kumar यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले !
================================
काही सिनेमे दिवाळीच्या मुहूर्ता हट्टाने प्रदर्शित केली जातात पण त्यांची वाताहात लागते डिझास्टर होते. सुपरफ्लॉप होतात. यातलाच एक सिनेमा होता २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’. गोलमाल प्रमाणेच हाउसफुल सिरीज च्या सिनेमे देखील दिवाळीच्या आसपास प्रदर्शित झाले आणि रिलीज झाले हिट झाले.२०२३ साली सलमान खान चा टायगर-३ रिलीज झाला होता. गेल्या वर्षी २०२४ सलवार सिंघम अगेन आणि ‘भूल भुलैय्या’ ‘हे दोन सिनेमे रिलीज झाले आणि हिट ठरले.