Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

जेव्हा Raj Kapoor चा मुकेश साठीचा प्लेबॅकचा हट्ट ओ पी नय्यरने हाणून पाडला!
राजकपूर यांनी आर के फिल्मच्या बाहेरच्या चित्रपटात देखील बरीच कामे केली पण या चित्रपटात देखील त्यांची इमेज आणि त्यांचे सहकलाकार विशेषता कृ मेंबर्स हे आर के फिल्म्स प्रमाणेच असायचे. म्हणजे या चित्रपटात देखील राज कपूर साठी पार्श्वगायन अनेकदा मुकेश हेच करायचे या चित्रपटांना संगीत देखील शंकर जयकिशन यांचेच असायचे. तसेच गीतकार म्हणून शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांचेच नाव राजकपूर रेकमेंड करत असायचे. अर्थात प्रत्येक वेळी हे असेच व्हायचे असे नाही.

काही अपवाद देखील नक्कीच होते. अशाच एका चित्रपटात जेव्हा राजकपूर साठी प्लेबॅक सिंगर म्हणून मुकेश ऐवजी मोहम्मद रफी यांचा स्वर वापरला गेला. त्यावेळेला राज कपूर यांनी आपल्यासाठी मुकेश यांचाच प्लेबॅक हवा असा हट्ट धरला होता. परंतु चित्रपटाचे निर्माते आणि संगीतकार यांनी मात्र राज कपूर यांची ही मागणी मान्य केली नाही. एका क्षणी या वादात हा चित्रपट संगीतकार सोडतो की काय इतका बिकट प्रसंग निर्माण झाला होता. पण प्रश्न सामंजस्याने हाताळला गेल्यामुळे राज कपूर साठी या चित्रपटात प्लेबॅक मोहम्मद रफी यांनी दिला. चित्रपट सुपरहिट झाला. कोणता होता तो चित्रपट? आणि काय होता नेमका किस्सा?
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
पन्नास च्या दशकाच्या अखेरीस अभिनेते आणि निर्माता शेख मुख्तार यांनी ‘दो उस्ताद’ नावाचा एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. या क्राईम थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन तारा हरीश यांनी केले होते. या चित्रपटात राजकपूर , मधुबाला आणि शेख मुख्तार प्रमुख भूमिकेमध्ये होते. चित्रपटाची स्टोरी दोन भावांची होती जे लहानपणीच बिछडले जातात. मोठेपणी दोघेही गुन्हेगार बनतात आणि पुन्हा समोरासमोर येतात. या एका स्टोरी लाईनवरील चित्रपटाने पुढे बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांना जन्म दिला. चित्रपटाच्या संगीतकार होते ओपी नय्यर आणि गीतकार होते कमर जलालाबादी. ओपी त्या वेळेला वेस्टर्न फडकते संगीत देण्यासाठी लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटात अशाच प्रकारच्या ट्यून तयार केल्या. राज कपूर यांना जेव्हा त्या ऐकवल्या गेल्या त्यावेळेला यांना देखील खूप आवडल्या.
राज कपूर यांनी ओ पी नय्यर यांना विचारले,“या ट्यूनवर मुकेश यांचा आवाज कसा वाटेल?” त्यावर संगीतकार ओ पी यांना राज चा हेतू लक्षात आला ते तात्काळ म्हणाले,” अगदी बकवास वाटेल! यातली सर्व गाणी रफी गाणार आहेत.” मात्र राज कपूर यांनी या ट्यूनवर मुकेश यांच्याकडून माझ्यासाठी गाणे गाऊन घ्या असे सांगितले. ओपी यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि या चित्रपटातील सर्व गाणी मोहम्मद रफी आणि आशा भोसले जाणार आहेत असे पुन्हा सांगितले. ओपी नय्यर यांची स्वतःची एक स्टाईल होती ते आपल्या संगीत रचनेमध्ये कुणाचीही दखल अंदाजी मंजूर करत नसायचे. अगदी निर्माता असो दिग्दर्शक असो अभिनेता अभिनेत्री असो कुणी जरी समोर आले तरी त्यात तसू भरही ते फरक करायचे नाहीत. आपल्या भूमिकेवर कायम ठाम असायचे.

त्यामुळे ‘दो उस्ताद’ ची गाणी मोहम्मद रफी गातील असे त्यांनी राजकपूरला सांगितले राजकपूर त्यावेळी स्टार होते त्यांना ओपी यांचा हा पवित्रा पचवायला कठीण झालं. त्यांनी निर्माता शेख मुख्तार यांना हा सर्व प्रकार सांगितला आणि माझ्यावर चित्रित होणारी गाणी मुकेश कडून गाऊन घ्या असे सांगितले. निर्मात्याला ओपी नय्यर यांचा स्वभाव ठाऊक होता आपण जर जास्त जबरदस्ती केली तर ते चित्रपट सोडतील याचीही त्यांना भीती होती .मुख्तार यांनी राज कपूर यांच्या पुढे हात जोडत सांगितले ,” ओपी आपल्या भूमिकेवर ठाम असतात आणि मी त्यांच्या या भूमिकेत स्वागत करतो. मी अजिबात त्यांना कुठलाही सल्ला देणार नाही.”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
जेव्हा संगीतकार आणि निर्माता दोघांनीही मुकेशचा आवाज वापरायला नकार दिल्यानंतर राजकपूर यांनी रफी यांचा स्वर मान्य केला. चित्रपटांमध्ये एकूण नऊ गाणी होती आणि मोहम्मद रफी आशा भोसले यांनी अतिशय भन्नाट अशी गाणी होती. नजरोके तीर मरे कस कस एक नही दो नही आठ नौ दस, रुक रुक कहां चली दिवानी कोई रोके,रिक रिक टिक टिक…गाणी मस्त होती. राजकपूर यांनी या चित्रपटात काम केलं खरं. सिनेमाला यश मिळाले पण राजकपूर आणि ओपी भविष्यात पुन्हा कधीच एकत्र आले नाही.या ‘दो उस्ताद’ चा री मेक म्हणजे प्रकाश मेहरांचा ‘हाथ की सफाई.’ ओपी यांनी देखील आपल्या संगीतात मुकेश यांचा स्वर अतिशय कमी वापरला होता. त्यांची भिस्त कायम मोहम्मद रफी , आशा भोसले, शमशाद आणि गीता दत्त यांच्यावर असायची.