Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raj Kapoor : ‘जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां’ हे शैलेंद्रचे अधुरे गीत कुणी पूर्ण केले?

 Raj Kapoor : ‘जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां’ हे शैलेंद्रचे अधुरे गीत कुणी पूर्ण केले?
बात पुरानी बडी सुहानी

Raj Kapoor : ‘जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां’ हे शैलेंद्रचे अधुरे गीत कुणी पूर्ण केले?

by धनंजय कुलकर्णी 24/10/2025

‘संगम’ चित्रपटाच्या नंतर आर के फिल्मचा पुढचा चित्रपट होता ‘मेरा नाम जोकर’. राजकपूर ‘संगम’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच त्याच्या पुढच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाचा विचार करत होता. त्यांच्या मनात संपूर्ण चित्रपटाची कथा तयार होती. एका विदूषकाची शोकांतिका या चित्रपटातून दाखवायची होती. विदूषकाच्या डोळ्यातील पाणी हा प्रेक्षकांसाठी सर्वात मोठा विनोद असतो असे म्हणतात. चार्ली चॅप्लिन यांनी त्यांच्या चित्रपटातून हाच जॉनर वापरला होता. राज कपूरसाठी ‘मेरा नाम जोकर’ हा अत्यंत महत्वकांक्षी सिनेमा होता. सिनेमाचा कॅनवास खूप मोठा होता.

या चित्रपटासाठी तीन गीतकार काम करत होते. कवी नीरज , शैलेंद्र आणि हसरत जयपूरी. संगीतकार होते शंकर जयकिशन. १९६५ साली राजकपूर यांनी शैलेंद्र यांना या चित्रपटातील एक सिच्युएशन सांगितली आणि तिथे एक गाणे लिहिण्यासाठी सांगितले. सिच्युएशन अशी होती सर्कशीतील जोकर आपल्या आयुष्याचा संपूर्ण पट प्रेक्षकांसमोर मांडतो. आपलं सर्व दु:ख प्रेक्षकांपुढे हसत हसत रितं करतो. गाण्याची सिच्युएशन युनिक होती अशा प्रकारचे गाणे यापूर्वी बॉलीवूडमध्ये आलं नव्हतं. त्यामुळे शैलेंद्र विचार करून सांगतो असे म्हणाले. त्यावेळी शैलेंद्र यांचा ‘तिसरी कसम’ हा चित्रपट फ्लोअर वर होता. या सिनेमासाठी शैलेंद्र वर अतोनात कर्ज झालं होतं त्यांची तब्येत देखील साथ देत नव्हती. अशा अवस्थेत राजकपूर यांनी त्यांना गाणं द्यायला सांगितले.

आणखी काही दिवसांनी जेव्हा या दोघांची भेट झाली त्यावेळेला राज कपूरने गाण्याच्या प्रगती बाबत विचारले तेव्हा शैलेंद्रने पुन्हा एकदा विचार करून सांगतो  असं सांगितलं. त्यावेळी राजकपूर यांनी शैलेंद्र यांना गाण्याचा ‘की वर्ड्’ दिला ‘जीना यहां मरना यहां’ शैलेंद्रने चमकून राज कपूरकडे पाहिले आणि त्यांची प्रतिभा जागृत झाली. लगेच त्यांनी त्यावर विचार करायला सुरुवात केली. ‘जीना यहां मरना यहां  इसके सिवा जाना कहां’ राजकपूरला हा मुखडा  खूप आवडला. त्यांनी शैलेंद्रला या गाण्याचे अंतरे  लिहायला सांगितले. पण नेमकं याच वेळी शैलेंद्र आजारी पडले. त्यांचा चित्रपट ‘तिसरी कसम’ रिलीज झाला पण त्याला व्यावसायिक यश मिळाले नाही. शैलेंद्र यांचा आजार बळावतच गेला आणि १४ डिसेंबर १९६६  या दिवशी गीतकार शैलेंद्र यांचे वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी निधन झाले! राजकपूर आणि आर के फिल्म साठी हा फार मोठा धक्का होता. राजकपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या प्रिय मित्राचा मृत्यू झाला होता.

================================

हे देखील वाचा : राज कपूरच्या चित्रपटांची ऑफर नाकारणारी नायिका कोण?

================================

पण शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे जग रहाटी चालूच राहते. राजकपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ चे काम सुरू केले. पण शैलेंद् चे अर्धवट गीत कोण पूर्ण करणार हा प्रश्न होता. राजकपूरला तर तो मुखडा खूप आवडला होता. एकदा राजकपूर शैलेंद्र यांच्या घरी गेले असताना त्यांची नजर शैली शैलेंद्र या शैलेंद्रच्या मुलावर पडली. तो त्यावेळी केवळ सतरा वर्षाचा होता. तो देखील वडिलांप्रमाणे साहित्य प्रेमी आणि खूप संवेदनशील मुलगा आहे  हे राजकपूरला माहीत होते.

राज कपूरने त्याला जवळ घेतले त्याचे सांत्वन केले आणि विचारले “तुझ्या वडिलांचे अर्धवट गाणे लिहून झाले आहे ते तू पूर्ण करशील का?”. जेव्हा राजकपूर सारखा मोठा निर्माता दिग्दर्शक मोठ्या आत्मीयतेने विचारतो म्हटल्यावर त्याने देखील होकार दिला. राज कपूरने गाण्याचा मुखडा त्याला सांगितला. आपल्या वडिलांचे अधुरे काम पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे याचा जरा आनंद झाला आणि त्याने त्यावर काम करायला सुरुवात केली.  पुढच्या आठ दिवस दहा दिवसात त्याने गाणे लिहून काढले. जेव्हा हे गाणे राजकपूर यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी शैली शैलेंद्र ला मिठीच मारली. आपल्या वडिलांची संपूर्ण प्रतिभा शैलीच्या लेखणीमध्ये दिसून आली. शैली शैलेंद्र ने  काय अप्रतिम गाणं लिहिलं होतं.

कल खेल मे हम हो ना हो

गर्दिश मे तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यही अपने निशा

इसके सिवा जाना कहां

राज कपूर यांनी ते गाणं आपल्या चित्रपटात घेतले चित्रपटाच्या संपूर्ण गाण्यांमध्ये हे गाणं सर्वात लोकप्रिय ठरले! आपल्या वडलांच्या अधुऱ्या कामातून शैली शैलेंद्रने गीतकार म्हणून सिनेमात एन्ट्री घेतली.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment News mera naam joker movie mera nam jocker movie Raj Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.