Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Rishabh Shetty आणि मराठी नाटकाचं खास कनेक्शन माहित आहे का?
कन्नड चित्रपट ‘कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे…. पंजुर्ली आणि गुलिगा देवांचा इतिहास आणि दाक्षिणात्य संस्कृती मोठ्या पडद्यावर लोकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेता आला… जगभरात ८०० कोटींचा आणि देशात ७०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करणाऱ्या ‘कांतारा १’ चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे… ‘कांतारा १’ चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता असणाऱ्या ऋषभ शेट्टीने कॉलेजमध्ये असताना मराठीतील एक अजरामर नाटक रंगभूमीवर साकारलं होतं… कोणतं होतं ते नाटक आणि त्याचा इंडस्ट्रीतला प्रवास कसा होता? जाणून घेऊयात…
‘कौन बनेगा करोडपती?’ या कार्यक्रमात नुकताच ऋषभ शेट्टी सहभागी झाला होता… यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा मारताना त्याने त्याच्या अॅक्टिंग स्ट्रगलच्या सुरुवातीच्या काळाला उजाळा दिला… यावेळी ऋषभने त्याचं आणि मराठी नाटकांचं काय कनेक्शन आहे हे सांगितलं… ऋषभ म्हणाला की, “आम्ही फार सामान्य घरातून आलो आहोत.. माझे वडिल अॅस्ट्रॉलॉजर होते… लहानपणापासून अभइनयाची आवड असल्यामुळे छोटे मोठे रोल मिळावेत यासाठी कायम मी धडपडत असायचो.. एकदा मला एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली… ते एक मराठी नाटक होतं ‘घाशीराम कोतवाल’… ज्याचं ट्रान्सलेशन कन्नड भाषेत करुन आम्ही सादरीकरण केलं होतं आणि त्यात मी मुख्य भूमिका घाशीराम कोतवाल ही साकारली होती.. आणि आनंदाची बाब म्हणजे या भूमिकेसाठी मला उत्कृष्ट अभिनेता म्हणून बक्षीस देखील मिळालं होतं”… अशाप्रकारे आज जगभरात ‘कांतारा’ चित्रपटाच्या निमित्ताने फेमस झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ऋषभ शेट्टीचं मराठी रंगभूमीशी अविरत नातं आहे…

बॉलिवूडमध्ये जसे काही कलाकार हे आऊटसाईडर्स आहेत, अगदी तसाच ऋषभ साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आऊटसाईडर होता.. परंतु, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने आज जगातील मेकर्स आणि चित्रपटप्रेमींना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडलं… ऋषभ शेट्टीने १८ वर्ष इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्यासाठी अथक परिश्रम केलं आहे… अभिनेता होण्याचं बालपणापासून स्वप्न पाहणाऱ्या ऋषभने शाळेत असतानाच छोट्या मोठ्या नाटकांमध्ये कामं केली होती… इतकंच नाही तर, पाण्याच्या बाटल्या विकणं, रियल इस्टेट क्षेत्रातही काम केलं. इतकंच नाही तर काही दिवस ऋषभनं हॉटेलमध्येही काम केलं होतं. हे करत असताना तो सिनेमात क्षेत्रातही त्याचं नशीब आजमावत होता.

ऋषभ शेट्टीला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी २००४ मध्ये मिळाली. Nam Areali Ondina यातून चित्रपटातील अभिनयाची सुरुवात केली… पुढे काही चित्रपटांमध्ये कॅमिओ करुन किंवा लहान-सहान रोल साकारत त्याने अनुभव घ्यायला सुरुवात केली… तब्बल १८ वर्षे संघर्ष केल्यानंतर कांतारा चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली… इतकंच नाही तर कांतारासाठी अभिनेता-दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिका साकारत त्याने राष्ट्रीय पुरस्कारावही आपलं नाव कोरलं…
आपल्या संघर्षाबद्दल एका मुलाखतीत बोलताना ऋषभ म्हणाला होता की,’मला इंडस्ट्रीमध्ये येऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००४ मध्ये कन्नड चित्रपटविश्वात पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होते. सिनेमाचं नाव होतं ‘सायनाइड’. त्यानंतर अनेक चित्रपट मिळत गेले पण खरी ओळख कांतारामुळे मिळालं”…
================================
================================
दरम्यान, मराठी नाटकाशी असलेलं ऋषभ शेट्टीचं कनेक्शन त्याने सांगितलंच पण जसं कांतारा चित्रपटाची कथा दक्षिणेतील संस्कृती आणि त्यांच्या देवांच्या अवतीभवती फिरते अगदी त्याच पठडूतील मराठीतील ‘दशावतार’ चित्रपट असून याचे कौतुकही ऋषभने आवर्जून केलं होतं…. ”आपल्या संस्कृती आणि मातीशी जोडणारे आणि आपल्या पुर्वजांना आणि देवांचा इतिहास सांगणारे चित्रपट येत आहेत हे फार कौतुकास्पद आहे”, असं म्हणत त्याने ‘दशावतार’चं अभिनंदन केलं होतं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi