Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant

Abhang Tukaram Trailer: जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा सांगणाऱ्या सिनेमाचा ट्रेजर

Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक

The Family Man Season 3 : श्रीकांत तिवारी ‘या’ तारखेला

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण

Abhishek Bachcham याने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला?

Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर

Salman Khan याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये बिग बींची एन्ट्री?

Gondhal Movie Trailer: श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर

साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केली आणि Riddhima apoor ट्रोल

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Single Screen Theaters Of Mumbai : स्ट्रॅन्ड असते तर ८३ वर्षाचे असते…

 Single Screen Theaters Of Mumbai : स्ट्रॅन्ड असते तर ८३ वर्षाचे असते…
कलाकृती विशेष

Single Screen Theaters Of Mumbai : स्ट्रॅन्ड असते तर ८३ वर्षाचे असते…

by दिलीप ठाकूर 30/10/2025

आजच्या डिजिटल युगात मल्टीप्लेक्स आणि ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट आणि कन्टेन्ट पाहायला मिळत असताना मुंबईतील जुन्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य ते काय? असा एक प्रश्न असतो.  एकेक करत करत मुंबई तर झालेच पण महाराष्ट्रातील, देशातील जुन्या काळातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जात आहेत. जुन्या पिढीतील चित्रपट रसिक सोशल मीडियावर कधी त्या काळातील आठवणी व्यक्त करताना अशा जुन्या काळातील चित्रपटगृहाचाही आठवणीने उल्लेख करतात आणि त्यातून त्यांची हळहळदेखिल जाणवते….असेच एक काळाच्या पडद्याआड गेलेले चित्रपटगृह म्हणजे, दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील स्ट्रॅण्ड चित्रपटगृह.

३० ऑक्टोबर १९४२ रोजी सुरु झालेले हे चित्रपटगृह आज सुरु असते तर ते ८३ वर्षाचे झाले असते.. या स्ट्रॅन्ड सिनेमा थिएटरशी माझा खूपच उशिरा संबंध आला, पण तो कायमच लक्षात राहण्याजोगा आहे. आणि तेच तर महत्वाचे असते. सत्तरच्या दशकातील आम्ही चित्रपट रसिकांना आपण कोणत्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतोय यांच्याशीही काही देणेघेणे असे. ती चित्रपट रसिक संस्कृतीच वेगळी.

दक्षिण मुंबईतील स्टर्लिंग, रिगल, इरॉस, न्यू एम्पायर ही अनेक वर्षे इंग्लिश चित्रपटाची हुकमी थिएटर्स म्हणून ओळखली जात असल्याने तेथे माझ्यासारखा रेडिओवर कसोटी क्रिकेट सामन्याच्या कॉमेन्ट्रीपुरताच इंग्लिशशी संबंध असलेला या थिएटर्सच्या आसपास तरी कशाला जाईल? कधी एकादा हिंदी पिक्चर तेथे प्रदर्शित झालाच तर बघु असा सरळ सोपा दृष्टिकोन व हिशोब   होता. त्यात स्ट्रॅन्डला एकादा हिंदी चित्रपट रिलीज होताना तो त्याबरोबरच ग्रॅन्ट रोड परिसरातील एकाद्या थिएटरमध्येही असे. स्ट्रॅन्डमधून एक दोन आठवड्यात तो हिंदी चित्रपट उतरायचा. (पूर्वकरारानुसार दोन आठवडे असे त्या चित्रपटाच्या जाहिरातीत अनेकदा स्ट्रॅन्डच्या खाली म्हटले जाई. वाचन किती होत असं बघा ).

मला आठवतंय सेन्सॉरने काही कटस सुचवलेला आणि धर्मेंद्र व रेखाच्या पोस्टरवरील धाडसी प्रणय दृश्यामुळे गाजलेला ‘किमत’ ( १९७३) हा रवि नगाईच दिग्दर्शित जेम्स बाँड स्टाईलचा पण अस्सल मसालेदार मनोरंजक हिंदी चित्रपट स्ट्रॅन्डला रिलीज झाला होता आणि स्ट्रॅन्डचे या पिक्चरचे थिएटर डेकोरेशन पाहण्यासाठी जायचे आम्ही गिरगावातील खोताची वाडीतील काही सवंगड्यानी ठरवले तेवढ्यात समजले ‘किमत ‘ ड्रीमलॅन्डलाही येतोय. परवीन बाबीने एकामागोमाग दोन चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतानाचा बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चरित्र’ (१९७३) ड्रीमलॅन्ड लागला तोच एकाच आठवड्यात उतरला ( क्रिकेटपटू सलिम दुराणी त्यात हीरो होता, बरं का?‌ पहिल्याच चित्रपटात त्रिफळाचित झाला तो.), आणि पुढच्याच शुक्रवारी तिची भूमिका असलेला ‘धुंए की लकीर’ (१९७३) ड्रीमलॅन्डसह स्ट्रॅन्डलाही लागला इतकेच.

================================

हे देखील वाचा : Agnipath ते ‘मुनवली’; अमिताभ अलिबागकर झाला…

================================

प्रेक्षक म्हणून स्ट्रॅन्डला जाण्याचे योग मला येत नव्हते आणि त्याची चक्क आवश्यकताही नव्हती. अनेकदा तेथे इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत आणि मराठी वृत्तपत्रात इंग्लिश चित्रपटाच्या जाहिराती येत नसत. पण हे थिएटर नेमके आहे कुठे, कसे आहे, किती मोठे आहे ( इंग्लिश चित्रपटाचे आहे म्हणजे हायफाय असणार, रुबाबदार असणार हेही स्वाभाविकपणे त्यात आलेच. जसे चित्रपट तशी त्याची थिएटर्स असाही एक फंडा सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांच्या काळात होता, त्यांच्या दीर्घकालीन इतिहासात तो आहे. त्यावर वेगळा फोकस होईल.), स्ट्रॅन्डचे पोस्टर डेकोरेशन कसे असते यांची उत्तरे हवी असतील, त्याचा ‘ऑखो देखा हाल ‘ अनुभवायचा तर कुलाबा मार्केटमध्ये जायलाच हवे. फळे,अनेक चित्रपटगृहे महत्त्वाच्या कॉर्नरला असताना हे भर भाजी, कडधान्य, फिश वगैरेच्या गर्दीत मार्केटमध्ये कसे हा प्रश्न पडत होता. कदाचित जेव्हा म्हणजे ३० ऑक्टोबर १९४२ साली अर्थात इंग्रजांच्या काळात सुरु झाले तेव्हा येथे छोटेसेच मार्केट असेल.

स्ट्रॅन्डचा पहिला चित्रपट होता, लक्झरी पिक्चर्स  हाऊसचा ‘Sergeant York’. यात गॅरी कपूर हा अमेरिकन हीरो होता आणि या चित्रपटात युद्धभूमीवरील थरारक प्रसंग आहेत असे तेव्हा बातमीत म्हटले होते. ( सहजच एक प्रश्न मनात येतोय, इंग्रंजांच्या काळात दक्षिण मुंबईत इंग्लिश कंपन्यांनी उभारलेली चकाचक पाॅलिश्ड सिनेमा थिएटर्स प्रामुख्याने आपल्याला विदेशातून येत असलेले इंग्लिश चित्रपट पाहण्यासाठी उभारली नाहीत ना? म्हणजे त्यांचा मुख्य हेतू तोच असावा का? ‌पण याच चित्रपटगृहांनी आपल्याकडील चित्रपट रसिकांना विदेशी चित्रपट पाहण्याची आवड निर्माण केली.‌ चित्रपट संस्कृतीतील ही गोष्ट छोटी वाटते पण महत्त्वाची.) स्ट्रॅन्डसमोर उभा राहिलो तेव्हा त्याचा साहेबी थाट आणि त्यावरची इंग्लिश पिक्चर्सचे होर्डींग्स, शो कार्ड्स मला परकेपणाची जाणीव करुन देत होता. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीत वाढलेल्याने गेट वे ऑफ इंडियाला फिरायला आल्यावर जाताना थोडं पुढे येत स्ट्रॅन्ड पहावे असे माझ्या मनात घट्ट बसले. आणि स्ट्रॅन्डपासून मी मनाने कायमच दूर राह्यचे ठरवले. ( मै अपनी औकात को सही वक्त पहेचान गया असा सलिम जावेद स्टाईल संवाद माझ्या मनात आला.) ही मध्यमवर्गीय मानसिकता का?

हा झाला पूर्वार्ध. आता उत्तरार्धात याच गोष्टीने नवीन वळण घेतले आणि हेच स्ट्रॅन्ड कायमचे आठवणीत राहीले. म्हटलं ना, “‘टाॅकीजच्या गोष्टी”‘शी माझे असलेले नाते काही वेगळेच आहे. मी फक्त आणि फक्त चित्रपट पाहिले नाहीत, चित्रपट  स्टूडिओ आणि थिएटर संस्कृतीही जाणून घेतली. त्यातले बारकावे समजून घेतले. मी मिडियात आलो आणि १९८४ च्या जानेवारीत मुंबईत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फीचे आयोजन करण्यात आले होते. आता पणजीत ( गोवा) नोव्हेंबर महिन्यात रंगत असलेला इफ्फी पूर्वी जानेवारीत आयोजित केला जाई आणि एक वर्ष नवी दिल्ली व  एक वर्ष चित्रपट निर्मितीचे केंद्र असलेले शहर ( मुंबई, हैदराबाद, कोलकत्ता, बंगलोर, त्रिवेंद्रम वगैरे) असा तो आलटूनपालटून असे.

मुंबईत या इफ्फीचे मुख्य केंद्र मेट्रो थिएटर होते. न्यू एक्सलसियरला पॅनोरमा, स्ट्रॅन्डला भारतीय आणि विदेशी सिनेमावाल्याच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग होते. अर्थात मी स्ट्रॅन्डला शक्य तितके भारतीय चित्रपट पाह्यचे ठरवले आणि त्यात गुरुदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’, ‘कागज के फूल ‘ वगैरे चित्रपट होते. माझ्यासाठी यामुळेच स्ट्रॅन्डचे दरवाजे उघडले तरी माझ्या मनात मध्यमवर्गीय संकोच होताच. पडद्यावर ‘प्यासा ‘ सुरु होताच मी सिनेमाशी जोडला गेलो. स्ट्रॅन्डचा एकूणच रुबाब भारीच होता. बाल्कनी तर स्टाईलीश. इफ्फीच्या निमित्ताने स्ट्रॅन्डला आणखीन काही चित्रपट पाहताना थिएटरच्या रेड कार्पेट संस्कृतीशी ओळख वाढवायचा प्रयत्न केला. म्हटलं ना, आमच्या पिढीने चित्रपट पडद्यावरच ठेवला नाही. आजूबाजूचे जगही समजून घेणे आवश्यक मानले.

काही वर्षातच पुन्हा स्ट्रॅन्डजवळ जायचा योग आला. यावेळी कारण वेगळेच होते. बी. सुभाष दिग्दर्शित ‘टारझन’ (१९८५) अचानक सुपर हिट झाला आणि किमी काटकारचा टेलिफोन नंबर मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली ( पिक्चर हिटचे साईट इफेक्ट्स असे अनेक असतात. ) त्या काळात अनेक स्टार आम्हा सिनेपत्रकारांना मुलाखतीसाठी घरीच बोलवत. किमी काटकरची आई मला फोनवर म्हणाली, कोलाबा मे  स्ट्रॅन्ड सिनेमा के सामने हम रहते है….. आजही जेव्हा जेव्हा एकाद्या म्युझिक चॅनलवर किमी काटकरचे एकादे गाणे पाहतो तेव्हा स्ट्रॅन्ड थिएटर पटकन आठवते ( आणि अर्थातच किमी काटकरची भेटही आठवते.) किमी काटकर त्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्री.

काही वर्षातच याच स्ट्रॅन्डमध्ये एक मिनी थिएटर असून तेथील तन्वीर अहमद दिग्दर्शित ‘आकर्षण’ (१९८८) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण रजनी आचार्य याच्याकडून आले. दृश्य काय होते? तर ‘आकर्षण सिनेमात सिनेमा होता’ आणि त्या सिनेमाच्या ट्रायलला अकबर खान आणि सोनू वालिया यांच्यासोबत आम्ही सिनेपत्रकार आहोत. म्हणजे आम्हाला अभिनयाची संधी होती की आम्ही ओरिजनल भूमिकेत होतो? अकबर खान, सोनू आणि आम्ही सगळ्यांनीच शूटिंग एन्जॉय केले. म्हणून शूटिंग आणि स्ट्रॅन्ड दोन्ही लक्षात राहीले…. चित्रपटात सिनेपत्रकार असा हा मामला.

नव्वदच्या दशकात कुलाब्यातील मुकेश मिलमध्ये एकाद्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग रिपोर्टीग अथवा एखाद्या मुलाखतीसाठी गेल्यावर अधूनमधून स्ट्रॅन्डवर चक्कर मारायचो. आपली सिनेपत्रकारीतेची पाळेमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये खोलवर रुजलीत हे मी कधीच विसरणार नाही याच भावनेने स्ट्रॅन्डवर जायचो….कालानंतरने तेही बंद झाले आणि हळूहळू हे बंद थिएटर उदास, भकास वाटू लागले. अशी नि:शब्द इमारत काय पाह्यची. आज स्ट्रॅन्डचा शो सुरु असता तर थिएटर ८३ वर्षांचे झाले असते. अशा वेळी स्ट्रॅन्डशी निगडित जुन्या चांगल्या आठवणी काढाव्यात.  त्याचीच ही ‘टॉकीजची गोष्ट’.

================================

हे देखील वाचा : कल्पक आणि वेगळी दृष्टी असलेले Piyush Pandey!

================================

इंग्रजी चित्रपटाच्या चित्रपट रसिकांना स्ट्रॅन्ड आठवतो, मॅकनॉज गोल्ड, डर्टी डझन अशा बहुचर्चित चित्रपटांसाठी. त्यांचा स्ट्रॅन्डकडे पाहण्याचा ॲन्गल अर्थात माझ्यापेक्षा वेगळाच…. आजही मी कुलाबा परिसरात जात असतो, तेव्हा मला काळाच्या पडद्याआड गेलीली डिफेन्स, स्ट्रॅण्ड या चित्रपटगृहाची आठवण येतेच. चित्रपटसृष्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकताना आणि चित्रपट संस्कृतीचा अभ्यास करताना त्यात मुंबईतील चित्रीकरणाचे स्टुडिओ आणि चित्रपटगृह यांनाही महत्व आहे. त्यातील अनेक स्टूडिओ व चित्रपटगृह आज अस्तित्वात नाहीत, पण तेथे जे घडले, पडद्यावर आले ते चित्रपटांत आहे….‌

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update coloba Entertainment mumbai single screen theater strand theater
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.