Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant

Abhang Tukaram Trailer: जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा सांगणाऱ्या सिनेमाचा ट्रेजर

Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक

The Family Man Season 3 : श्रीकांत तिवारी ‘या’ तारखेला

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण

Abhishek Bachcham याने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला?

Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर

Salman Khan याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये बिग बींची एन्ट्री?

Gondhal Movie Trailer: श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर

साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केली आणि Riddhima apoor ट्रोल

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर ही तितकेच टवटवीत!

 Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर ही तितकेच टवटवीत!
बात पुरानी बडी सुहानी

Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर ही तितकेच टवटवीत!

by धनंजय कुलकर्णी 30/10/2025

बंगालमधून आलेल्या संगीतकारांनी हिंदी सिनेमाच्या संगीताचे  दालन अतिशय समृद्ध करून ठेवले आहे. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांच्यापासून हा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर सचिन देव बर्मन, सलील चौधरी, हेमंत कुमार, शामल मित्रा, राहुल देव बर्मन, कनू रॉय, पंकज मलिक, बप्पी लहरी शंतनु मोइत्रा…. असा गुणी संगीतकारांचा प्रवास चालूच राहिला. संगीतकार सलील चौधरी हे अतिशय प्रतिभा संपन्न असे संगीतकार होते. त्यांनी हिंदी सोबतच बंगाली, मल्याळम,कन्नड,तेलगु,तमिळ,गुजराती, ओरिया, मराठी भाषांमध्ये देखील संगीत दिले. सलील चौधरी यांच्यावर वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचा खूप प्रभाव होता. त्याचा खूप चांगला वापर त्यांनी भारतीय चित्रपट संगीतात करून घेतला. हिंदी सिनेमांमध्ये ‘मधुमती’,’आनंद’, ‘दो बिघा जमीन’, ‘पारख’, ‘काबुलीवाला’, ‘माया’, ‘छाया’, ‘मेरे अपने’, ‘रजनीगंधा’ या चित्रपटातील मधुर संगीत रसिक विसरू शकत नाही. त्यांनी पार्श्वसंगीतामध्ये देखील खूप मोठे कार्य करून ठेवले आहे.

सलील चौधरी यांनी लहानपणी ऐकलेली एक पाश्चात्य ट्यून तब्बल तीस वर्षानंतर आपल्या चित्रपटात वापरली आणि हे गाणं आज साठ वर्षानंतर देखील तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर आजची तरुण पिढी देखील फिदा आहे. या गाण्यावर अनेक रील्स इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरत असतात. या गाण्याची रसिकांवराची गोडी इतकी प्रचंड आहे की अनेक संगीतमय कार्यक्रमात या गाण्याचा आजही समावेश असतो. कोणतं होतं ते गाणं आणि कोणत्या ट्यूनवर तब्बल तीस वर्षांनी सलीलदांनी या गाण्याची निर्मिती केली होती?

१९६१ साली ऋषिकेश मुखर्जी यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘छाया’. यात सुनील दत्त, आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. यातील एका गाण्यांमध्ये सलील दा नी या ट्यून चा वापर केला होता. सलीलदा जेव्हा अगदी आठ दहा वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना संगीताची गोडी लागली होती. त्यांच्या वडिलांचे एक मित्र होते डॉक्टर मलोनी. दोन्ही कुटुंबांचे कायम एकमेकांच्या घरी येणे जाणे असायचे. डॉक्टर मलोनी यांना १९३५ साली त्यांच्या मूळ देशात आयर्लंडला जावे लागले. जाताना त्यांनी त्यांचा एक किमती खजिना सलीलदाच्या कुटुंबीयांच्या हवाली केला. हा खजिना होता वेस्टर्न क्लासिकल ग्रामोफोन रेकॉर्डसचा. सलीलदांच्या वडिलांना फारसा वेळ नसायचा पण लहानगा सलील मात्र या रेकॉर्ड्स कायम ऐकत असायचा. या लहान वयातच त्यांना मोझार्टच्या एका सिंफनीने त्यांना वेड लावले. हि सिम्फनी त्यांना प्रचंड आवडली. ही सिम्फनीची ट्यून त्यांच्या डोक्यात इतकी फिट बसली की दिवस रात्र ते ही गुणगुणत असायचे.  

पुढे सलीलदा चित्रपटसृष्टीत आले संगीतकार बनले. १९६१ साली जेव्हा त्यांच्यासमोर ऋषिकेश मुखर्जीच्या ‘छाया’ चित्रपटाचे संगीत आले त्यावेळेला त्यांनी मोझार्टची हि ट्यून वापरायचे ठरवले. या ट्यूनवर त्यांनी राजेंद्र कृष्ण यांच्याकडून गाण्याचे बोल लिहून घेतले. तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. गाण्याचे बोल होते ‘इतना ना न मुझे से तू प्यार बढा की मै एक बदल आवारा….’मोझार्ट’च्या सिम्फनीवरून प्रेरणा घेवून सलील चौधरी यांनी हे गीत बनवले.  

हि रचना इतकी रोमँटिक आणि कॅची बनली होती की आज देखील आपल्याला मोहित करते. ‘छाया’ हा चित्रपट खूप गाजला. यातली गाणी विशेषतः मोझार्टच्या ट्यूनवरील गाणे खूप गाजले. तलत मेहमूच्या टॉप टेन गाण्यांपैकी हे गीत ठरले! सलील  चौधरी यांना हि ट्यून  इतकी आवडली की त्यांनी याच चित्रपटात या गाण्याचे एक सॅड व्हर्शन  देखील ठेवले. या चित्रपटात तलत मेहमूद यांनी गायलेली चार गाणी गायली होती.

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

=================================

‘आंसू समझ के क्यूं मुझे आंख से तूने गिरा दिया’ हे अतिशय सुंदर गाणं या चित्रपटात होता. ‘आंखो मे मस्ती शराब की काली जुल्फो मे राते शबाब की..’ है मस्त मूड ड मधील तलत चे गाणे होते. ‘छाया’ या चित्रपटातील या गाण्याचा  जर आज आपण विचार केला तर या गाण्याशी  निगडित असणारे तलत मेहमूद, लता मंगेशकर, सलील चौधरी, राजेंद्र कृष्ण, सुनील दत्त… यापैकी कोणीच शिल्लक नाही. आहे फक्त आशा पारेख!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Asha Parekh bollywood update Celebrity News Entertainment Entertainment News lata mangeshkar retro bollywood news rishikesh mukherjee Sunil Dutt talat mehmood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.