Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Maharashtrachi Hasyajatra मधल्या ‘या’ अभिनेत्याने केलं ‘प्राजक्ताला प्रपोज? म्हणाला, ‘तिच्याकडून ही वर्कआऊट झालं’ पण…
Sony Marathi वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय हास्य कार्यक्रम प्रेक्षकांना हसवण्यासाठी नेहमीच नवीन पद्धती शोधतो. या शोमधील विनोदी अभिनेता ओंकार राऊत त्याच्या अफलातून अभिनयामुळे कायम चर्चेत असतो. ओंकार राऊतच्या विनोदाच्या शैलीला प्रेक्षकांची भारी पसंती मिळाली आहे, परंतु याच शोमधून काही काळापूर्वी एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला होता , ज्यात ओंकारने सूत्रसंचालक प्राजक्ता माळीला प्रपोज केल्याच सांगत आहे.(Maharashtrachi Hasyajatra)

ओंकार राऊतने आता या चर्चांवर पडदा टाकत आपल्या मुलाखतीत यावर खुलासा केला आहे. ओंकारने दिलेल्या मुलाखतीत त्याला ‘लग्न कधी करणार आहेस?’ असा प्रश्न विचारला गेला.त्यावर त्याने सांगितलं की, “माहित नाही… कोणाकडे मुलगी असेल तर सांगा. मी तर ‘अनुपम’वर पण रजिस्टर करणार आहे! माझे बाबा मला म्हणाले, सगळ्या ठिकाणी आहेस, तर मग अनुपमवर पण ये ना… माहित नाही मला, पण होईल लवकरच.” ओंकारने नुसतं हा मजेदार उत्तर दिला, पण त्याने प्राजक्ता माळीला प्रपोज करण्याच्या चर्चेवरही खुलासा केला.

यावेळी त्याने प्राजक्ता माळीला प्रपोज करण्याच्या चर्चेवरही भाष्य केल. ओंकारने सांगितले की, “नाही, प्रपोज केलंय मी… पण ते खूप नॅचरल होतं, आणि तिच्याकडूनही ते जास्त चांगलं वर्क आऊट झालं.” ओंकारने स्पष्ट केले की ‘हास्यजत्रा’ मध्ये त्याचे आणि प्राजक्ताचे एक स्कीट होतं, ज्यात ओंकार प्राजक्ताला टोकत असतो. यामध्ये ओंकारचे संवाद स्क्रिप्टेड होते, पण प्राजक्ताच्या रिअॅक्शन्समुळे ते आणखी मजेदार बनत होते. “मी नुसता बोलतोय आणि ती शांत बसलीये, असं झालं असतं, तर ते एवढं वर्क नसतं झालं. ती पण चांगलं रिअॅक्ट करते, त्यामुळे मजा येते नोकझोक करायला,” असे ओंकार म्हणाला.(Maharashtrachi Hasyajatra)
==============================
==============================
प्राजक्ताशी असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना ओंकारने तिचे मनापासून कौतुक ही केले. तो म्हणाला, “ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. प्राजक्ता माळी खूप काळजी घेणारी मुलगी आहे. तिला तिच्या आजूबाजूच्या लोकांची, मित्रांची खूप काळजी असते. जर तिला कुठून लांबून समजलं की काही बिनसलंय, तर ती स्वतःहून येते चौकशी करायला. ती मनाने खूप चांगली मुलगी आहे!” यामुळे ‘हास्यजत्रा’ मधील ओंकार राऊत आणि प्राजक्ता माळी यांच्या नोकझोकांबद्दलच्या अफवांवर पूर्णपणे पडदा टाकला गेला आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांची मैत्री किती ख़ास आहे हे ही स्पष्ट झाल.