Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर Kedar Shinde घेऊन येत आहेत ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’
Zee स्टुडिओज आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे एकत्र येऊन एक वेगळा आणि मनोरंजनाने भरलेला चित्रपट घेऊन येत आहेत. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट महिलांच्या नात्यांमधील मजेदार आणि भावनिक पैलू उलगडतो. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना हसवणारे आणि विचार करायला लावणारे असतात. त्यांचे ‘बाईपण भारी देवा’सारख्या यशस्वी चित्रपटाच्या पंक्तीत आता ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ जोडले जाणार आहे. महिलांच्या मनातील भावना, त्यांच्यातील चतुराई आणि प्रेम-निंदा यांचा गोड आणि तिखट मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Aga Aga Sunbai, Kay Mhante Sasubai)

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सासू आणि सुनेच्या नात्याचे गोड-तिखट चित्रण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही कारण प्रत्येक घरात सासू-सुनेचा नातं वेगळ्या रंगात आणि परिस्थितीत दिसतं. कधी हसू, कधी भांडण, कधी प्रेम आणि कधी काळजी याच सर्व पैलूंना चित्रपटाच्या माध्यमातून प्रकट करण्यात आले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात की, “प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण आणि कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं आणि घर सांभाळणाऱ्या दोन महिलांचं सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सना निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे, आणि हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”चित्रपटाची निर्मिती सना शिंदे आणि उमेश कुमार बन्सलयांच्या कडे आहे, आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १६ जानेवारी २०२४ रोजी येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांचे मार्गदर्शन, वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे संवाद, आणि मयूर हरदास यांचे छायाचित्रण यामुळे चित्रपटाला एक विशेष स्पर्श मिळणार आहे.(Aga Aga Sunbai, Kay Mhante Sasubai?)
================================
================================
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “केदार शिंदे हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट आजच्या सासू-सुनेच्या नात्याचं अत्यंत मनोरंजक आणि भावनिक चित्रण करतो.” सासू आणि सुनेच्या नात्याचा गोड-तिखट प्रवास घेऊन येणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. १६ जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट नक्कीच एक हिट ठरेल.