
V. Shantaram यांच्या बायोपिकमध्ये दीपिका पादूकोणसोबत झळकलेला ‘हा’ अभिनेता साकारणार शांताराम बापूंची भूमिका!
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे… महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता सिद्धांत चर्तुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात असून अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) देखील या बायोपिकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे… मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या व्ही शांताराम यांच्यावरील बायोपिकची निर्मिती त्यांचा मुलगा दिग्दर्शक किरण शांताराम करणार आहेत…(Biopic on Director V.Shantaram)

काही मिडिया रिपोर्ट्सनुसार, व्ही शांताराम यांच्या भूमिकेसाठी सिद्धांत चर्तुर्वेदीने फोटो शुट देखील केलं असून येत्या काही महिन्यांमध्ये बायोपिकचं शुटींग सुरु होईल असं सांगितलं जात आहे… या बायोपिकमध्ये शांताराम यांचं चित्रपटसृष्टीतील कार्य आणि त्यांचं वैयक्तिक जीवनही मोठ्या पडद्यावर मांडलं जाणार आहे… महत्वाचं म्हणजे व्ही शांताराम यांच्या जीवनावरील हा पहिला वहिला बायोपिक असून यात त्यांच्या तिन्ही लग्नांबद्दलही चित्रण केलं जाणार असं समजतंय…. व्ही. शांताराम यांचं पहिलं लग्न विमला, दुसरं, जयश्री आणि तिसरं संध्या यांच्याशी केलं… आणि त्याचमुळे चित्रपटात ३ नायिका असणार असंही दिसून येतंय… (Kiran Shantaram)

व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, १९२७ मध्ये ‘नेताजी पालकर’ हा त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता… यानंतर, ‘डॉ. कोटनीस की आत्म कहाणी’, ‘दो आँखे बारा हात’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दुनिया ना माने’, ‘सिंहगड’, ‘चंदनाची चोळी’, ‘चानी’, ‘अमर ज्योती’ अशा अनेक चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे… येत्या १८ नोव्हेंबरला व्ही शांताराम यांची जयंती असून या दिवशी त्यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली जाणार अशी शक्यता आहे… तसेच, या बायोपिकचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे (Abhijeet Deshpande) करणार आहेत असंही सांगितलं जात आहे… अद्याप अधिकृतपणे या बायोपिकबद्दल माहिती मेकर्सकडून दिली गेली नाही… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड
================================
सिद्धांत चर्तुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो ‘धडक २’ (Dhadak 2) मध्ये दिसला होता… याव्यतिरिक्त ‘गली बॉय’, ‘बंटी और बबली २’, ‘फोन भूत’, ‘खो गये हम कहा’, ‘गेहराईया’ या चित्रपटांत तो दिसला होता… आता व्ही शांताराम यांची भूमिका सिद्धांत योग्यरित्या साकारणार का हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत…. (Siddhant Chaturvedi Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi