‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

गोष्ट Asha Parekh ने शशी कपूरला मारलेल्या करकचून मिठीची!
साठच्याच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री आशा पारेख त्या काळात तमाम तरुणाइची दिल की धडकन बनली होती. आशा पारेख म्हणजे हिट सिनेमाची गॅरंटी हे त्या काळात समीकरण झालं होतं. काही वर्षांपूर्वी आशा पारेख यांचे चरित्र प्रकाशित झाले. त्याचे नाव आहे ‘द हिट गर्ल.’ या पुस्तकात अनेक गमतीशीर घटनांचा उल्लेख आहे. त्या काळात प्रत्येक हिरो हा आशा पारेख सोबत काम करायला उत्सुक असायचा. या काळातील आशा पारेख चा करिष्मा काही औरच होता. अभिनेता शशी कपूर हा देखील आशा पारेख चा प्रचंड मोठा फॅन होता.
१९६३ साली तो एका इंग्रजी चित्रपटात काम करत होता. चित्रपटाचं नाव सुद्धा ‘द हाऊस होल्डर’ या सिनेमाचे दिग्दर्शक होते James Ivory. या चित्रपटाची नायिका म्हणून शशी कपूरने आशा पारेख हिची निवड केली होती. कारण तो मनापासून तिचा चाहता होता. परंतु आशा पारेख असल्या कलात्मक चित्रपटात इंटरेस्टेड नव्हती. त्या काळात ती प्रचंड बिझी होती आणि मोस्टली कमर्शियल सिनेमात ती काम करत होती. त्यामुळे तिने नकार दिला. तिच्या सोबत काम करण्याची शशी ची इच्छा अधुरीच राहिली. आशा पारेख आणि शशी कपूर पहिल्यांदा हिंदी सिनेमा झळकले ते १९६८ सालच्या मोहन सैगल यांच्या ‘कन्यादान’ या चित्रपटात. हा चित्रपट सुपरहिट ठरला यातील ‘लिखे जो खत तुझे…’ आणि ‘मिल गये मिल गये आज मेरे सनम मिल गये’ हे गाणे हिट झाले होते. या सिनेमाच्या दरम्यानचा एक किस्सा आशा पारेख यांच्या चरित्रात लिहिला आहे. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.

‘कन्यादान’ या चित्रपटाचे शूटिंग रोहतांग पास येथे चालू होते. तिथेच एक मिलिटरी कॅम्प देखील होता. एकदा लष्करी अधिकाऱ्यांनी आशा पारेख आणि मोहन सैगल यांना टी पार्टीसाठी बोलावले. पार्टी संपल्यानंतर आशा पारेख ,मोहन सैगल आणि त्यांची पत्नी आपल्या कार मधून हॉटेल कडे निघाले. परंतु रस्त्यातच त्यांची कार नादुरुस्त झाली. त्यामुळे या तिघांनाही अक्षरशः चालत चालत हॉटेल कडे जावे लागले. त्या काळात तिथे जंगलामध्ये हिंस्त्र अस्वलांचा मोठी संख्या होती. त्यामुळे तिघेही अस्वलाच्या भीतीने जीव मुठीत घेऊन हॉटेलकडे निघाले होते. इकडे हॉटेलला हे तिघे पोहोचले नाही म्हणून शशी कपूर आपली जीप घेऊन त्यांच्या दिशेने निघाला. आणि त्यांना मोठ्याने आवाज देत बोलावू लागला. जेव्हा आपल्याला कोणीतरी बोलवत आहे असे या तिघांना कळाले तेव्हा ते आवाजाचे दिशेने जाऊ लागले.
जेव्हा शशी कपूर आपल्याला नेण्यासाठी आला आहे असे आशा पारेख कळाले तेव्हा ती प्रचंड खूष झाली आणि ती सुसाट पळत पळत जाऊन त्याच्या दिशेने गेली आणि त्याला घट्ट करकचून मिठी मारली! ही घट्ट करकचून मिठी त्या दोघांना एक जुनी आठवण जागी करून गेली. कोणती होती ती आठवण? १९६५ साली आशा पारेख आणि विश्वजीत यांच्या ‘मेरे सनम’ या चित्रपटाचे चित्रीकरण काश्मिरला मध्ये चालू होते. त्याच वेळी शशी कपूर आणि नंदा यांच्या ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाचे चित्रीकरण देखील काश्मीरला चालू होते. जेव्हा शशी कपूरला कळाले की आशा पारेखचे तिथेच शूट करत आहे तेव्हा तिला भेटण्याची त्याला खूप इच्छा निर्माण झाली. पण त्यावेळेला ती मोठी स्टार होती. शशी कपूर त्या काळात त्या अर्थाने स्ट्रगलरच होता. म्हणून त्याने एक आयडिया केली!
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
आशा पारेख ज्या हॉटेलमध्ये उतरली होती. तिथल्या रिसेप्शन कडून आशा पारेख यांना निरोप आला की दोन महिला त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. थोड्या वेळाने दोन बुरखा घातलेल्या स्त्रिया आशा पारेख च्या रूम मध्ये आल्या. आशा ने त्यांना त्यांचा परिचय विचारला आणि बुरखा काढण्यास सांगितले. त्या वेळेला त्यातील एका महिलेने पुढे येवून आशा पारेखला करकचून मिठी मारली!! आशाला ते खूप अनकम्फर्टेबल वाटलं. ती चिडली. तिने ताबडतोब त्या स्त्रीचा बुरखा काढला. तर त्या बुरख्याच्या आड शशी कपूर होता! आशा पारेख चे अंकल तिथेच होते. त्यांना हा शशी कपूरचा प्रँक अजिबात आवडला नाही. त्यांनी शशी कपूरला रागवायला सुरुवात केली. (दुसऱ्या बुरख्यामध्ये शशी कपूरचा मित्र बी बी भल्ला होता.) पण शशी कपूर ने आपल्या मिठास वाणीने आशा च्या अंकलची समजूत काढली. तो आशाला म्हणाला की,” मला तुला भेटण्याची खूपच इच्छा होती. पण तू तर मला तशी भेटली नसतीस म्हणून मी ही आयडिया केली”…
किस्सा इथेच संपत नाही! शशी कपूरने नंतर आशा पारेख कडून त्यांच्या रूम मधील इंटर कॉम वापरण्याची परवानगी घेतली आणि त्याच हॉटेलमध्ये असलेल्या विश्वजीतला एका मुलीच्या आवाजात फोन करून सांगितले की ,” मी आणि माझी बहीण तुमची खूप मोठी फॅन आहे. आम्ही सध्या आशा पारेख यांच्या रूममध्ये आहोत. कृपया आपण इथे याल का? मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे!” थोड्या वेळत विश्वजीत त्या रूममध्ये दाखल झाला. त्याने बघितले दोन बुरखा धारी महिला तिथे बसल्या आहेत. त्यातील एक महिला (म्हणजे शशी कपूर!) उठली आणि तिने विश्वजीतला चक्क मिठी मारून मारली. आता विश्वजीत टोटली अनकम्फर्टेबल झाला आणि तो त्या मगर मिठीने पडता पडता वाचला! कारण मिठीच जबरदस्त होती. हे सर्व पाहून आशा पारेख जोरजोरात हसू लागली आणि तिनेच शशी कपूरचा बुरखा दूर केला. विश्वजीत थोडासा नाराज झाला “ये क्या बदत्तमीजी है…” म्हणून तो चिडला पण शशी कपूर ने त्याला देखील आपल्या मिठ्ठास वाणीने शांत केले! शशी ने आशा पारेखला मारलेली करकचून मिठीची आठवण त्यांना रोहतांग पास ला झाली!

शशी कपूर आणि आशा पारेख यांनी ‘कन्यादान’(१९६८) या चित्रपटानंतर नासिर हुसेन यांच्या ‘प्यार का मौसम’(१९६९) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता. ‘तुम बिन जाऊ कहा’, ‘निसुलताना रे प्यार का मौसम आया …’ हि गाणी बेफाम होती! पण या चित्रपटानंतर मात्र हे दोघे कोणत्याही चित्रपटात लीड पेअर म्हणून एकत्र आले नाही. आशा पारेख यांनी या पुस्तकात असे अनेक किस्से सांगितले आहेत!