Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेतील ‘त्या’ लोकप्रिय जोडीचे अखेर २३

बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!

Kishore Kumar यांनी तब्बल आठ वेळा जिंकले होते बेस्ट सिंगर

Dharmendra यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चाहते झाले भावुक

बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser:  शाळेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

120 Bahadur : फरहान अख्तरकडून खूप अपेक्षा होती पण…

‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kishore Kumar यांनी तब्बल आठ वेळा जिंकले होते बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवार्ड!

 Kishore Kumar यांनी तब्बल आठ वेळा जिंकले होते बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवार्ड!
बात पुरानी बडी सुहानी

Kishore Kumar यांनी तब्बल आठ वेळा जिंकले होते बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवार्ड!

by धनंजय कुलकर्णी 24/11/2025

भारतातील लोकप्रिय चित्रपट नियतकालिक फिल्म फेअरने पन्नासच्या दशकात फिल्म अवॉर्ड्स ची सुरुवात केली. १९५४ सालापासून  सुरू झालेल्या फिल्म फेअर अवार्डस चा  सिलसिला आज देखील चालू आहे. काहीजण याला भारतातील ऑस्कर पुरस्कार असे देखील म्हणतात. पार्श्वगायना चे फिल्मफेअर पुरस्कार १९५७ साला पासून सुरु झाले.  मात्र त्या वेळी गायक आणि गायिका यांच्यासाठी एकच कॅटेगिरी होती. त्यामुळे पुरस्कार कुणा एकालाच मिळत असे. १९६७ सालापासून मात्र गायक आणि गायिकांना स्वतंत्र पुरस्कार दिले जाऊ लागले. पुरुष गायकांसाठीच्या पुरस्कारांची जेव्हा आपण आजवरची टोटल यादी बघतो त्यावेळी गायक किशोर कुमार यांना तब्बल आठ वेळेला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळालेला दिसतो हा आजवर विक्रम आहे. (आता या विक्रमाची बरोबरी अरजित सिंग ने केली आहे!  या लेखात आपण किशोर कुमार यांना कोणत्या गाण्यांसाठी हा पुरस्कार मिळाला होता आणि त्यांना कोण कोणत्या गाण्यांसाठी नामांकन मिळाले होते याचा आढावा घेऊत.

किशोर कुमार पन्नासच्या दशकापासून हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात कार्यरत होते परंतु पन्नास आणि साठ च्या दशकामध्ये प्रामुख्याने ते अभिनेता म्हणून जास्त बिझी होतो. १९६९ सालच्या ‘आराधना’ या चित्रपटापासून त्यांच्या गायकीची खरी कारकीर्द सुरू झाली आणि याच चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना’ (सं. सचिन देव बर्मन) या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. चित्रपट सृष्टीत आल्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर त्यांना पहिला पुरस्कार मिळाला. या नंतरचा पुरस्कार त्यांना १९७६  सालच्या  ‘अमानुष’ या चित्रपटातील ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा’  या गाण्यासाठी मिळाला या चित्रपटाला संगीत श्यामल मित्रा यांचे होते तर हे गाणे इंदीवर यांनी लिहिले होते.

तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्म फेअर  पुरस्कार किशोर कुमार यांना १९७९ साली ‘डॉन’ या चित्रपटातील ‘खाईके पान बनारसवाला’ या गाण्यासाठी मिळाला. हे गाणं अंजान यांनी लिहिलं होतं तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. या नंतरचा पुरस्कार १९८१ साली  ‘थोडी सी बेवफाई’ या चित्रपटातील गुलजार  यांनी लिहिलेल्या आणि खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हजार राहे मुड के देखी…’  या गाण्यासाठी मिळाला. पाचवा फिल्मफेअर पुरस्कार किशोर कुमार यांना १९८३ साली ‘ नमक हलाल’  या चित्रपटातील ‘पग घुंगरू बांध मीरा नाची थी..’ या अंजान यांनी लिहिलेल्या आणि बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यासाठी मिळाला. या नंतर चा  पुरस्कार १९८४ साली ‘अगर तुम न होते’ या चित्रपटातील टायटल सॉंग साठी मिळाला. हे गाणे गुलशन बावरा यांनी लिहिले होते तर संगीत आर डी बर्मन यांचे होते.

या नंतरचा पुरस्कार त्यांना १९८५ साली  मिळाला चित्रपट होता ‘शराबी’. गाण्याचे बोल होते ‘मंजिले अपनी जगह है रास्ते अपनी जगह’ हे गाणं प्रकाश मेहरा यांनी लिहिलं होतं त्याला संगीत बप्पी लहरी यांचं होतं. किशोर कुमार यांना आठवा आणि अखेरचा फिल्मफेअर पुरस्कार १९८६ साली ‘ सागर’  या चित्रपटातील ‘सागर किनारे दिल ये  पुकारे’ या गाण्यासाठी मिळाला.  हे गाणं लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी तर संगीत राहुल देव बर्मन  यांच होते. गंमत म्हणजे यापैकी १९८३,१९८४,१९८५  हे सलग तीन वर्ष त्यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. १९८४ साली  तर त्या वर्षीचे सर्व नामांकन किशोर कुमार यांनाच मिळाली होती!

================================

हे देखील वाचा : रुक जाना नही तू कभी हार के : Vinod Khanna वर चित्रित किशोर कुमारची गाणी!

================================

किशोर कुमार ला तब्बल २७  वेळा फिल्म फेअर चे सर्वोत्कृष्ट गायकाचे नामांकन मिळाले होते पैकी आठ वेळेला ते विजेते ठरले होते. किशोरच्या ज्या गाण्यांना पुरस्कार मिळाले नाहीत पण नामांकन होते ती गाणी होती, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ (अंदाज-१९७१), ‘ये जो मुहोब्बत है’ (कटी पतंग-१९७१), ‘चिंगारी कोई भडके’ (अमर प्रेम-१९७२), ‘मेरे दिल में आज क्या है’ (दाग-१९७३), ‘गाडी बुला रही है सिटी बजा रही है’ (दोस्त-१९७४), ‘मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया’ (कोरा कागज-१९७४), ‘मै प्यासा तुम सावन’ (फरार-१९७५),’आप के अनुरोध पे मै ये गीत सुनाता हूं’ (अनुरोध-१९७७), ‘ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना’ (मुकद्दर का सिकंदर-१९७८), ‘हम बेवफा हरगीज न थे’ (शालीमार-१९७८), ‘इक रास्ता है जिंदगी’ (काला पत्थर-१९७९), ‘मेरी उमर के नौजवानो दिल न लगाना’ (कर्ज-१९८०) , ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते’ ‘(कुदरत-१९८१), ‘छू कर मेरे मन को किया तुने’ (याराना-१९८१), ‘शायद मेरी शादी का खयाल’ (सौतन-१९८३), ‘इन्तेहा हो गई इंतजार की’ (शराबी-१९८४), ‘लोग कहते है मै शराबी हूं’ (शराबी-१९८४)  

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Filmfare Awards Indian Cinema Kishore Kumar kishore kumar singer Singer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.