‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेतील ‘त्या’ लोकप्रिय जोडीचे अखेर २३

बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली आहे आणि अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या चिंताजनक परिस्थितीत “येड लागलं प्रेमाचं” (Yed Lagal Premach) मालिकेने एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्याचे ठरवले आहे. या मालिकेतील पात्रांच्या संघर्षाच्या माध्यमातून बिबट्यांच्या हल्ल्यांची गंभीरता आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे उपाय दर्शविले जातील. सध्या मालिकेतील राया आणि मंजिरी यांच्या लग्नाच्या तयारीत एक मोठा वळण येणार आहे. ऐन मेंदीच्या कार्यक्रमात बिबट्याच्या हल्यामुळे गावात एक दहशतीचे वातावरण निर्माण होईल. या नव्या संकटाचा सामना राया आणि मंजिरी कसा करतील, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.(Yed Lagal Premach Serial)

विशाल या मालिकेचा निर्माता याबद्दल म्हणाला की, “महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील बिबट्याच्या हल्ल्याची परिस्थिती साकारताना आम्ही प्रेक्षकांपर्यंत बिबट्यांच्या वावरामुळे होणाऱ्या भीतीची आणि संकटाची भावना प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. वनविभागाच्या सूचनांचे पालन करणे, बिबट्याला दिसल्यास त्वरित कळवणे आणि योग्य उपाययोजना घेणे आवश्यक आहे.”

मालिकेच्या पात्रांनी यावर भाष्य करत सांगितले की, बिबट्यांपासून वाचण्यासाठी आपल्या परिसरातील सुरक्षेसाठी काही साधे उपाय केले जाऊ शकतात. वनविभागाच्या सूचना पाळणे, एकटे न जाणे, गटाने फिरणे आणि प्रकाशाची योग्य व्यवस्था करणे यावर विशेषतः लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच लहान मुलांना एकटे सोडणे टाळावे, यामुळे बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी होऊ शकतो.(Yed Lagal Premach Serial)
=================================
=================================
मालिकेतील मंजिरी म्हणजेच पूजा बिरारी यावर म्हणाली की, “बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. या विषयावर भाष्य करणे म्हणजेच समाजाला एक महत्त्वाचा संदेश देणे. सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”परिस्थितीचं गांभीर्य राखून आम्ही या विषयावर भाष्य करणार आहोत. “येड लागलं प्रेमाचं” या मालिकेमध्ये हा वेगळा प्रसंग दाखवण्यात येणार आहे रोज रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.