
“काही खरं असेल तर काही…”; आदिनाथ सोबतच्या नात्याबद्दल Urmila Kothare स्पष्टच बोलली
कलाकारांच्या पर्सनल आयुष्यात का सुरु आहे हे डोकावून पाहण्यात लोकांना फारच इंटरेस्ट असतो… शिवाय, कोणता कलाकार कुठल्या कारणामुळे ट्रोल होईल याचाही काही नेम नसतो… काही सेलिब्रिटी ट्रोलींगला सडेतोड उत्तर देतात तर काहींच्या मनावर त्याचा फार परिणाम होतो… बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्य सोशल मिडियावर शेअर न केल्यामुळेही कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो हे आता लपून राहिलं नाही… याच मुद्द्यावर अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) हिने तिचं मत मांडलं असून तिच्या वैवाहिक जीवनाबद्दलही तिने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत… सोशल मिडियावर जे दिसतं ते त्यातल्या काही गोष्टी खऱ्याही असतात असं तिने म्हटलं आहे…
उर्मिला कोठारे हिचं वैयक्तिक लाईफ फार डिस्डर्ब आहे अशा चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या होत्या… आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठाने नवरा-बायको असूनही एकत्र राहात नाहीत किंवा एकत्र कुठे स्पॉट होत नाहीत यावरुनही गॉसिप्स सुरु होते… या दोघांचं बिनसलंय, अशा चर्चाही सुरु असतात… आता अशा ट्रोलिंगचा परिणाम आपल्यावर होत नसल्याचं स्पष्ट वक्तव्य उर्मिलाने झी २४ तासशी बोलताना केलं आहे.. उर्मिला म्हणाली की, “ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी कमेंट्स वाचतच नाही. कमेंट्समध्ये लोक खूप विषारी बोलतात, त्यामुळे मी लक्ष देत नाही. तसंही माझ्याकडे इतर खूप व्याप असतात, त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे लक्ष देण्यात मला रस नाही”…

पुढे उर्मिला म्हणाली की, “इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातंय याकडे लक्षच द्यायचं नसतं. इंटरनेटवर फिरत असणाऱ्या काही गोष्टी खऱ्या असतात तर काही खोट्या असतात. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय ते सगळं खरं आहे असं समजू नका. कारण त्यातलं काही खरं असेल तर काही खोटंही नक्कीच असू शकतं”… आता उर्मिलाच्या या विधानांवरुन तिच्या आणि आदिनाथच्या वैवाहिक जीवनात नेमकी अडचण काय आहे? आणि खरंच दोघे वेगळे झाले आहेत का? हे गुढ अजून वाढलं आहे… (Aadinath Kothare)
================================
हे देखील वाचा : “Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला अनुभव
================================
दरम्यान आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती… त्यानंतर ७ वर्षांनी कपलला गोंडस मुलगी झाली जिचं नाव आहे जीजा… सध्या उर्मिला कोठारे मालिका आणि जाहिरातींमध्ये काम करतेय. याव्यतिरिक्त ‘फिल्टर कॉफी’ या नाटकात काम करत असून ‘पुन्हा घाशीराम कोतवाल’ नाटकातही उर्मिला छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारत आहे… तर, आदिनाथ मराठीसह हिंदीत आपलं स्थान निर्माण करत आहे… लवकरच आदिनाथ डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसणार असून नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटाचाही तो महत्वाचा भाग असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi