
“ते माझं सर्वस्व होते…”; Dharmendra यांच्या निधनानंतर पत्नी हेमा मालिनींची भावूक पोस्ट
बॉलिवूडचे He-Man धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं… भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनते असमाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol0 यांच्या निधनामुळे खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाली… धर्मेंद्रंच्या आठवणींना कलाकारांनी उजाळा देत सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या… आता धर्मेंद्र यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी पहिल्यांदाच धर्मेंद्रंच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे… धर्मेंद्रजी माझं सर्वस्व होते अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत…

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी किंवा ईशा, सनी आणि बॉबी देओल यांच्यापैकी कुणीच कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती… आता मात्र, पतीच्या निधनानंतर हळूहळू सावतर हेमा मालिनींनी डोळे पाणावणारी पोस्ट शेअर केली आहे… त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ” धर्मेंद्रजी, ते माझं सर्वस्व होते. एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुलींचे ईशा आणि अहाना यांचे लाडके वडील, मित्र, मार्गदर्शक, कवी, माझ्या जवळचा माणूस ,खरं तर ते माझ्यासाठी सर्वकाही होते. आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांनी आपल्या आणि मैत्रीपूर्ण स्वभावाने माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलंसं केलं. त्यांच्या मनात नेहमीच सर्वांप्रती प्रेम आणि आपलुकी असायची.” (Dharmendra Death News)
================================
हे देखील वाचा : Dharmendra : सुपरस्टार ते यशस्वी निर्माता….
================================
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांच्या वागण्यातील नम्रतेमुळे ते इतरांपासून वेगळे असल्याचं जाणवायचं. चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकिर्द आणि योगदानामुळे ते कायमच जिवंत राहतील. माझं वैयक्तिकरित्या खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात कधीही भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर, त्या खास क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी माझ्याकडे खूप आठवणी शिल्लक आहेत“… या पोस्टसोबत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत… (Bollywood News)

दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्नगाठ बांधली होती… ४५ वर्षांच्या सुखाच्या संसारात त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही…’शोले’, ‘सीता और गीता’, ‘नसीब’, ‘अंधा कानून’, ‘छोटी सी बात’, ‘भागवत’, ‘राजा जानी’, ‘सम्राट’, ‘किनारा’, ‘ड्रिम गर्ल’ अशा अनेक चित्रपटांची दोघांनी एकत्र काम केलं होतं… आजन्म चित्रपटांमध्ये येण्याचं स्वप्न पाहून ते जगणाऱ्या धर्मेंद्र यांचा ‘इक्कीस’ (Ikkis) हा अभिनेते म्हणून शेवटचा चित्रपट १७ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… (Dharmendra and Hema Malini Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi