
प्रियांका-आलिया-कॅटरिनाच्या ‘Jee Le Zara’ चित्रपटाबदद्ल मोठी अपडेट; फरहान अख्तरनेच दिलं उत्तर…
काही चित्रपट अनाऊन्स होतात आणि बंद पडतात.. काही चित्रपटांचा मुहूर्त होतो, काही दिवस शुटींगही होतं पण काही कारणांमुळे प्रोजेक्ट बिघडतो.. असंच काहीसं फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) एका चित्रपटाचं झालं आहे की काय? असा प्रश्न लोकांना पडला होता… आणि तो चित्रपट म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची प्रमुख भूमिका असणारा जी ले जरा… या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिग्दर्शक फरहान अख्तर यानेच दिली आहे… हा चित्रपट येणार नाही असं बोलणाऱ्या लोकांची त्यानेच तोंड बंद केली असून लवकरच ‘जी ले जरा’ चित्रपट ऑन बोर्ड येणार असल्याचं त्याने जाहिर केलं आहे… नेमकं काय म्हणाला आहे फरहान जाणून घेऊयात… (Je Le Zara movie update)

फरहान अख्तरच्या आगामी ‘जी ले जरा’ चित्रपटाबद्दल ई-टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हा चित्रपट लवकरच ऑन बोर्ड येणार आहे.. याबद्दल फरहान म्हणाला की, तो अजूनही या प्रोजेक्टवर काम करतोय.. इतर प्रोजेक्ट्समुळे या चित्रपटाकडे त्याला फारसं लक्ष देता येत नसल्याची कबूली देखील त्याने दिली असून लवकरच तो पुन्हा यावर काम सुरू करणार आहे. तर, डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, फरहान ‘जी ले जरा’साठी खूप उत्सुक होता. मात्र, तिन्ही अभिनेत्रींच्या तारखा न जुळल्यामुळे काही अडचणी आल्या होत्या.. आता मात्र, सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, अशी कबुली फरहानने दिली आहे. (Bollywood)

दरम्यान, ‘जी ले जरा’ चित्रपटाला उशीर होण्याची बरीचशी कारणं आहेत… एक तर तिन्ही मुख्य अभिनेत्री Individually वेगवेगळ्या चित्रपटांवर काम करत होत्या… शिवाय, प्रियांका चोप्रा ४-५ वर्ष बॉलिवूडपासून लांबच होती.. आणि कॅटरिना देखील लग्न झाल्यानंतर काही काळ चित्रपटांमध्ये झळकली नव्हती.. त्यात आता नुकतीच आई बनली असून सध्या ती आपल्या मुलासोबत क्वॉलिटी टाईम घालवतेय… आता प्रियांका पुन्हा भारतात आली असून साऊथच्या ‘वाराणसी’ (SS Rajamouli’s Varanasi Movie) चित्रपटातून तिने कमबॅक केलं आहे… आणि आता फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मधून ती बॉलवूडमध्ये रिएन्ट्री करणार आहे.. तसेच, आलिया सध्या ‘अल्फा’ आणि ‘लव्ह And वॉर’ (Love and War) चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून ती देखील या चित्रपटाच्या कामासाठी वेळ देणार आहे… (Entertainment News)
================================
================================
दरम्यान, बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची जादू प्रेक्षकांवर उमटवणाऱ्या आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ यांना एकाच चित्रपटात पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी ट्रीट असणार हे नक्की… आता यात अभिनेते कोण असणार? आणि चित्रपटाची कथा काय असणार हे लवकरच सोर यावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे… (Bollywood upcoming movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi