
Pranit More: कंडक्टरचा मुलगा ते ‘बिग बॉस’ फायनलिस्ट; पठ्ठ्याने ट्रॉफी नाही पण मन जिंकली !
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकजण आपली कथा लिहीत असतो. पण काही कथा आपल्याला प्रेरणा देत असतात. तशीच एक कथा आहे. प्रणित मोरे याची. मुंबईच्या दादरमधील एक साध्या चाळीत जन्मलेला प्रणित आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्षाची गाथा, त्याला बिग बॉस 19 च्या फिनालेपर्यंत घेऊन आली . प्रणित मोरेचा बालपण दादरच्या एक साध्या चाळीत गेल. त्याचे वडील एक सामान्य बस कंडक्टर होते आणि कुटुंबाच्या जगण्याचा मुख्य आधार त्यांची सरकारी नोकरी होती. परंतु एक दुर्दैवी अपघातामुळे वडिलांचा रोजगार गमवला आणि घरातील आर्थिक परिस्थिती बदलली. (Pranit More)

नोकरी गेल्यावर घर चालवणे एक मोठे आव्हान बनले आणि परिणामी, कुटुंबाला मुंबई सोडून नवी मुंबईत स्थलांतर करावे लागले.पैशांची अत्यंत कमतरता होती, पण कुटुंबासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. प्रणितच्या आई-वडिलांनी कठोर मेहनत घेऊन टिफिन सर्व्हिस सुरू केली. तेव्हा प्रणितने पावले उचलली आणि आपल्या शिक्षणासोबतच घराघरात टिफिन पोहोचवण्याचे काम सुरू केले. हेच त्याचे जीवनातील पहिले शालेय शिक्षण आणि याच वेळेस त्याला जीवनातील संघर्षांचा खरा अर्थ शिकता आला.

पण परिस्थिती अजूनही कठीण होती. प्रणितच्या वडिलांनी आणखी एक व्यवसाय सुरू केला, पण त्यात देखील त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचं नवीन घर आणि दुकान विकावे लागले. एक भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रणितने त्यावेळी एक स्वप्न पाहिलं, “मी माझ्या आईसाठी एक घर घेईन.” आणि त्याच स्वप्नाच्या पाठीमागे त्याने मेहनत सुरू केली. (Pranit More)
===================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 चा फिनाले कधी? टॉप 5 स्पर्धकांमध्ये प्रणित मोरे पोहचला ‘या’ क्रमांकावर
===================================
शाळा पूर्ण झाल्यावर प्रणितने कार सेल्समॅन म्हणून काम सुरू केलं. त्याच्या कठोर परिश्रमाला आणि धैर्याला मिळालेली यशाची काठी म्हणजेच आरजे बनणं. त्याच्या आवाजाने आणि व्यक्तिमत्त्वाने तो लोकप्रिय होऊ लागला. एक वेळ अशी होती की, त्याचे सगळे शो हाउसफुल होऊ लागले. पण यानंतरच, बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्याने त्याचा जीवनप्रवास आणखी वेगळ्या वळणावर गेला. प्रणीत भले ही Bigg Boss 19 ची ट्राफी जिंकला नाही पण त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत हे नक्की.