Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

मल्याळम सुपरस्टार Fahadh Faasil करतोय मराठी नाटकाचं प्रमोशन!
मल्याळमचा सुपरस्टार मराठी नाटकाचं प्रमोशन करतोय… हो बरोबर ऐकलंत… आणि तो सुपरस्टार आहे फहाद फासील (Fahadh Faasil)… ‘अथिरन’, ‘आवेशम’, ‘विक्रम’ असे एकाहून एक सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा भाग असणाऱ्या फहादने महेश मांजेकर आणि भरत जाधव यांच्या आगामी ‘शंकर जयकिशन’ या मराठी नाटकाच्या तालमीला हजेरी लावत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत… अमराठी रसिक-प्रेक्षकांनी नाटक किंवा चित्रपटांना दिलेला प्रतिसाद हा अभिमानास्पद असतोच, पण त्यासोबतच अमराठी कलाकारांकडून मराठी कलाकार आणि त्यांच्या नाट्य किंवा अन्य कलाकृतींचं केलं जाणारं कौतुक आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारं असतं…
फहादचा याच मराठी नाटकाच्या टीमसोबतचा व्हिडिओ सध्या व्हाय़रल होतोय… एक तर फहाद मराठी नाटकाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या तालमीला गेलाय हे तर एक्सायटिंग आहेच; शिवाय मुंबईत १९ डिसेंबरला नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगालाही तो हजर राहणार असल्याचं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलंय… या व्हिडिओत महेश मांजरेकरांनी फहादला म्हटलंय की, “नाटक असल्यामुळे सबटायटल्स देऊ शकत नाही पण नक्कीच तुला नाटक कळेल”. यावर क्षणाचाही विलंब न करता फहाद म्हणाला की, “भाषा कोणतीही असो भावना या सारख्याच असतात“. त्यामुळे नक्कीच फहादलाही मराठी नाटकाची भूरळ पडलीये हे स्पष्ट होतंय. दरम्यान, महेश मांजरेकर त्यांच्या आगामी साऊथ चित्रपटाच्या शुटींगसाठी हैदराबादला असल्यामुळे ‘शंकर जयकिशन’ची संपूर्ण टीम रिहर्सलसाठी हैदराबादला मुक्कामी पोहोचली आहे.. अशातच फहादचं तिथे येणं म्हणजे तो देखील मांजरेकरांसोबत त्या चित्रपटात असणार का अशी उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

बरं, फहादबद्दल सांगायचं झालं तर मल्याळम आणि तमिळ चित्रपटांत त्याने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या फहादने विनोदी भूमिकांसोबतच सिरीयस आणि क्राईम थ्रिलर चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका वठवल्या आहेत.. फहादने २०व्या वर्षी २००२ मध्ये आलेल्या ‘कैयुथम दूरथ’ या रोमॅंटिक चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘केरळ कॅफे’, ‘डायमंड नेकलेस’, ‘२२ फिमेल कोट्टायम’ अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. (Fahadh Faasil movie)
================================
================================
विशेष म्हणजे ‘२२ फिमेल कोट्टायम’ या चित्रपटासाठी त्याला पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव नोंदवत मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांच्या यादीत फहाद पोहोचला. लवकरच फहाद इम्तियाज अलीच्या ‘इडियट्स ऑफ इस्तानबुल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. त्यामुळे आता आगामी कोणत्या चित्रपटांचा तो भाग असणार आणि ‘पुष्पा ३’ (Pushpa 3)मध्ये तो असेल की नाही याची उस्तुकताही शिगेला पोहोचली आहेच. साऊथ कलाकारांचा मराठी कलाकृतींकडे वाढणारा कल नक्कीच अभिमानास्पद आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi