Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bhau Kadam आणि Nilesh Sable पुन्हा एकत्र दिसणार?  झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

 Bhau Kadam आणि Nilesh Sable पुन्हा एकत्र दिसणार?  झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण
Bhau and Nilesh Together
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bhau Kadam आणि Nilesh Sable पुन्हा एकत्र दिसणार?  झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

by Team KalakrutiMedia 15/12/2025

Zee Marathi वरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात 26 जुलै 2025 रोजी झाली. मात्र, या पर्वात काही जुनी आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली चेहरे नसल्यामुळे चाहत्यांना सुरुवातीला मोठी निराशा झाली. डॉ. निलेश साबळे (Dr.Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam)आणि सागर कारंडे (Sagar Karande)हे कलाकार या पर्वात नसल्याने सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.(Bhau Kadam and Nilesh Sable Together) 

Bhau Kadam and Nilesh Sable Together
Bhau Kadam

नव्या पर्वात मात्र श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करत आहे. नवीन टीमने प्रेक्षकांचं मनोरंजन सुरू ठेवलं असलं, तरी अनेकांना अजूनही ‘चला हवा येऊ द्या’च्या जुन्या टीमची आठवण येत होती. अशातच झी मराठीने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नवा प्रोमो शेअर केला आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली. या प्रोमोत दोन व्यक्ती पाठमोऱ्या उभ्या असल्याचं दिसत आहे.आणि  प्रोमोमधील कॅप्शनने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे,“बाकीच्यांचं कमबॅक 2026 मध्ये होणार असेल, तर आपलं कमबॅक 2025 मध्येच!” ‘उगाच’ नाही… बघाच! लवकरच…

Bhau Kadam and Nilesh Sable Together
Bhau Kadam

हा प्रोमो पाहताच अनेक चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की, हे पाठमोरे दिसणारे कलाकार म्हणजे भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळेच असावेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. काहींनी तर थेट त्यांच्या पुनरागमनाची खात्री असल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या.  मात्र, हे दोघे कलाकार पुन्हा ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये दिसणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कारण प्रोमोमधील ‘उगाच’ या शब्दावर आणि #Ugach या हॅशटॅगवरून वेगळाच अंदाज लावला जात आहे. झी मराठीवर सध्या चर्चेत असलेल्या ‘उगाच अवॉर्ड्स’ या नव्या संकल्पनेशी हा प्रोमो संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Bhau Kadam and Nilesh Sable Together) 

=============================

हे देखील वाचा: Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

=============================

‘उगाच अवॉर्ड्स’मध्ये झी मराठीवरील विविध मालिकांमधील कलाकारांना भन्नाट आणि हटके पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात येत आहे. ‘सर्वोत्कृष्ट भपाव अवॉर्ड’, ‘सर्वोत्कृष्ट नट्टापट्टा अवॉर्ड’, ‘सर्वोत्कृष्ट झोलर अवॉर्ड’ अशा मजेशीर श्रेणींमुळे हा पुरस्कार सोहळा चर्चेत आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या या विशेष कार्यक्रमातूनच भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांचं झी मराठीवर पुनरागमन होऊ शकतं, असा अंदाज लावला जात आहे. आता हे पुनरागमन नेमकं कुठल्या मंचावर होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. चाहत्यांना मात्र एकच अपेक्षा आहे की भाऊ आणि निलेश पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाल करताना पाहायला मिळावेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhau kadam Bhau Kadam and Nilesh Sable Together Celebrity chala hava yeu dya Entertainment nilesh sable zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.