लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

‘तो’ सीन करताना माधुरी Vinod Khanna सोबत झालेली अनकम्फर्टेबल; धकधक गर्लनेच केला धक्कादायक खुलासा
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवलं आहे… आजही बऱ्याच डान्स शो ची जज बनून किंवा काही चित्रपट, सीरीजमध्ये कामं करत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेच आहे… नुकतीच तिची एक सायकॉलॉजिकल थ्रिलर क्राईम सीरीज ‘मिसेस देशपांडे’ (Mrs.Deshpande) रिलीज झाली असून या चित्रपटात तिने आजवर कधी न सारालेली सिरील किलरची भूमिका निभावली आहे… आता माधुरीचा विषय चालला आहे तर तिच्या एका जुन्या चित्रपटाचा किस्सा जाणून घेऊयात… आणि तो किस्सा आहे माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्या ‘दयावान’ (Dayavan Movie) चित्रपटाचा…
माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आणि त्यापैकीच एक म्हणजे विनोद खन्ना…’दयावान’ (Dayavan Movie) हा विनोद खन्ना आणि माधुरीचा चित्रपट खूप गाजला. याच चित्रपटातील एका गाण्यामुळे माधुरीची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटामध्ये माधुरीनं विनोद खन्ना यांच्यासोबत इंटीमेट सीन शूट केलेले. पण, त्यावेळी घडलेल्या काही गोष्टींनंतर मात्र माधुरीनं पुन्हा कधीच असे सीन्स न करण्याची शपथच जणूकाही घेतली होती. (Madhuri Dixit unknown facts)

तर, नुकत्याच एका मुलाखतीत माधुरीने दयावान चित्रपट आणि त्यातील विनोद खन्ना यांच्यासोबतच्या सीन्सबद्दल भाष्य केलं होतं… आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत तो सीन करताना माधुरी पुरती अनकम्फर्टेबल झालेली. रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली की, “ ‘आज फिर तुम पर प्यार आया है’ गाण्याचा सीन शूट करताना मी अक्षरशः लाजेनं अर्धमेली झाले होते. त्यासोबतच खूपच अनकम्फर्टेबलही. त्यानंतर मात्र मी पुढे माझ्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यावेळी मी ग्रोइंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये होती. प्रत्येक गोष्टीतून आपण शिकतो आणि त्यातूनही मी खूप काही शिकले. पण, त्यानंतर मात्र मी लाजेनं अर्धमेली झालेले आणि त्याचवेळी ठरवलं की, पुढे असं काहीच करायचं नाहीये”… दरम्यान, माधुरीनने याआधीही दयावान चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं होतं की, जेव्हा तिने ही चित्रपट साईन केला होता तेव्हा तिला या सीनबद्दलल माहिती दिली गेली नव्हती… (Entertainment news)

दरम्यान, असं सांगितलं जातं की, ‘दयावान’ चित्रपटाच्या त्या इंटीमेट सीनदरम्यान विनोद खन्ना वाहवत गेले होते… दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही त्यांनी किसींग सीन सुरु ठेवला होता आणि त्यामुळे घाबरलेल्या माधुरीने नंतर तो सीन चित्रपटातून हटवण्याची विनंती केली होती… मात्र, फिरोज खान (Feroz Khan) यांनी तो सीन डिलिट केला नाही. उलट त्या सीनसाठी माधुरीला अतिरिक्त १ कोटी रुपये दिले, त्यावेळी ही मोठी रक्कम होती. यानंतर विनोद खन्नांनी माधुरीची माफी मागितली, पण त्याचा परिणाम तिच्या मनावर इतका खोलवर झाला होता की, माधुरीनं पुन्हा कधीही त्यांच्यासोबत काम केलं नाही…. (Madhuri Dixit Intimate Scene)
================================
हे देखील वाचा : दिवाळीत Madhuri Dixit हिला टक्कल का करावं लागलं होतं?
================================
दरम्यान, सध्या ९०च्या दशकातील सुपरस्टार २०२५ मध्ये दमदार कमबॅक करताना दिसत आहेत… त्याचं ताजं उदाहरण म्हणजे विनोद खन्ना यांचाच मुलगा अक्षय खन्ना (Akshaye Khanna)… २०२५ च्या सुरुवातीला ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातून अक्षयने सीक्सर मारला… आणि त्यानंतर आता ‘धुरंधर’मधील (Dhurandhar Movie) भूमिकेने त्याने अख्ख मार्केट जाम केलं आहे… तर दुसरीकडे माधुरी दीक्षितने मिसेस देशपांडे या नव्या psycological crime सीरीजमध्ये सीरीयल किलरची भूमिका साकारत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi