Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉबी देओल ते Akshaye Khanna; बॉलिवूडचे ‘हे’ खलनायक नायकांवर पडले भारी!

 बॉबी देओल ते Akshaye Khanna; बॉलिवूडचे ‘हे’ खलनायक नायकांवर पडले भारी!
कलाकृती विशेष

बॉबी देओल ते Akshaye Khanna; बॉलिवूडचे ‘हे’ खलनायक नायकांवर पडले भारी!

by रसिका शिंदे-पॉल 19/12/2025

बॉलिवूड इंडस्ट्री ही स्टार ड्रीव्हन फिल्मी दुनिया आहे… चित्रपटाच्या कथेपेक्षा चित्रपटाचा हिरो कोण असणार? यावर तो चित्रपट सुपरहिट की सुपरफ्लॉप हा थप्पा आधीच लागतो… अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, वरुण धवन, शाहिद कपूर अशा एकाहून एक ग्रेट हिरोंनी हिट चित्रपट आत्तापर्यंत बॉलिवूडला दिले… पण गेल्या काही काळात काही चित्रपट हे हिरोंनी नाही तर विलन्सनी (Villains In Bollywood) गाजवले आहेत… आणि सध्या याचं ताजं उदाहरण म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar)… बरं आताच नाही तर अगदी हिंदी चित्रपटसृष्टीत मोगॅम्बो, गब्बर सिंग असे गाजलेले खलनायक आधीही होऊन गेले आहेतच की… चला तर मग जाणून घेऊयात बॉलिवूडच्या काही अशा चित्रपटांबद्दल ज्यातील नायकापेक्षा खलनायक जास्त भाव खाऊन गेले आहेत…

२०१४ मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ (Ek Villian) चित्रपटात नायक होता सिद्धार्थ मल्होत्रा पण त्याच्यापेक्षा मराठमोळ्या रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) साकारलेला व्हिलन विशेष गाजला होता… याशिवाय ‘अग्निपथ’ चित्रपटाचा नायक होता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) पण चित्रपटातील संजय दत्तने (Sanjay Dutt) साकारलेला खलनायक तुफान चर्चेत होता… यानंतरचा चित्रपट म्हणजे ‘पद्मावत’… नायक होता शहिद कपूर पण रणवीर सिंगचा (Ranveer Singh) खलनायक शाहिद आणि दीपिका पादूकोणपेक्षा वरचढ ठरला होता… (Entertainment News)

बरं इथवरच हिट ठरलेल्या खलनायकांची यादी थांबत नाही… २०२३ मध्ये आलेला ‘अ‍ॅनिमल’ रणबीर कपूरच्या एका वेगळ्याच अवतारामुळे गाजला… पण कानामागून येत बॉबी देओलने (Bobby Deol) साकारलेली भूमिका अख्खं लाईमलाईट खाऊन गेली… त्यानंतर विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ चित्रपट आला… छत्रपती संभाजी महाराजांची त्याने निभावलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलीच, परंतु, अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब काही अंशी वरचढ होता…

या पाठोपाठ आलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट तर सरसच ठरला आहे… या चित्रपटाचा मेन हिरो होता रणवीर सिंग पण अक्षय खन्नाचा रेहमान डकैत मुख्य आकर्षण ठरला आहे… बरं यात केवळ अक्षयच नाही तर अर्जून रामपाल (Arjun Rampal) यानेही साकारलेला खलनायक लक्षवेधी आहे… एकूणच काही गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडचं स्टारडम अभिनेत्यांमुळे तर आहेच पण हळूहळू खलनायक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत हे देखील तितकंच खरं…. (Bollywood’s Villians)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?

================================

बरं, खलनायक हा नायकाइतकाच तगडा असायला हवा ही कॉन्सेप्ट खरं तर हॉलिवूड आणि साऊथमध्ये फार दिसून येते… आणि आता हळूहळू बॉलिवूडही त्याकडे वळत असून चित्रपटात कोणता नायक असणार यापेक्षा अधिक महत्व खलनायक कोण असणार याकडे दिलं जातंय असं चित्र दिसून येत आहे…. या सगळ्यात आणखी एक प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे एक व्हिलन असो किंवा ‘अ‍ॅनिमल’ जे खलनायक गाजले ते सगळे ९०च्या दशकातील स्टार्स होते… त्यामुळे नवोदित कलाकारांना हा एक रिमांईडर आहे की जुनं तेच सोनं…! (Bollywood News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshaye Khanna Animal bobby Deol Bollywood Chitchat bollywood update Bollywood villians Entertainment News Ranveer Singh sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.