Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

इंग्रजांनाही आकर्षित करणारी झाडीपट्टी रंगभूमी!

 इंग्रजांनाही आकर्षित करणारी झाडीपट्टी रंगभूमी!
कलाकृती विशेष

इंग्रजांनाही आकर्षित करणारी झाडीपट्टी रंगभूमी!

by रसिका शिंदे-पॉल 20/12/2025

बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड या फिल्म इंडस्ट्री आपल्याला माहित आहेतच… पण तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात झॉलिवूड इंडस्ट्री आहे आणि तिला तब्बल १५० वर्षांचा इतिहास आहे… चकित झालात? पण हो… महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या ४ जिल्ह्यांमधील नाट्यसृष्टीलाला झाडीपट्टी रंगभूमी म्हटलं जातं… वर्षाला जवळपास ७० कोटींची उलाढाल करणाऱी या झाडीपट्टी रंगभूमी एकेकाळी इंग्रजांनाही आकर्षित करणारी होती… चला तर जाणून घेऊयात या झाडीपट्टी रंगभूमीबद्दल…

तर, झाडीपट्टी रंगभूमीत जवळपास ५० ते ५५ नाट्यकंपन्या असून त्या दिवाळी ते रंगमंचमी या काळात ३ हजारांपेक्षा जास्त नाट्यप्रयोग सादर करतात… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या झाडीपट्टी रंगभूमीवर कोणत्या प्रकारची नाटकं सादर होतात? विदर्भातील बोलीभाषा असलेल्या झाडीबोलीत ही नाटकं सादर होतात.. या नाटकांचे विषय सामाजिक, ऐतिहासिक, लोककथा, पौराणिक कथावर आधारित असतात… विशेष म्हणजे जवळपास १८८० मध्ये सांगलीकरांच्या नाटकाच्या प्रभावातून या रंगभूमीचा पाया रचला गेल्याचं सांगितलं जातं…

रात्री १० वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत चालणारी नाटकं म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी… अगदी ब्रिटीशकालिन भारताच्या इंग्रज सत्ताधाऱ्यांनाही या रंगभूमीने वेड लावलं होतं… इंग्रजांना मराठी भाषा समजत नसल्यामुळे translators ची १०० वर्षांपूर्वी मदत घेऊन मराठी नाटकं हिंदी आणि इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट करुन सादर केली जात होती… काही अभ्यासकांच्या माहितीनुसार ६ महिन्यांच्या काळात ४०-५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणारी ही झॉलिवूड इंडस्ट्री ७० कोटींची उलाढाल करते… शिवाय, समाज प्रबोधन करणं इतकंच या नाटकांचं उद्देश नसून झाडीपट्टीचे प्रयोग पाहण्यासाठी लांबलाबच्या गावातील लोकं येत असत आणि त्यामुळे ज्या गावात नाटकाचा प्रयोग सुरु असे तिथल्या लग्न न झालेल्या मुला-मुलींची लग्न जुळवण्यासाठी देखील हे प्रयोग महत्वाचे मानले जात होते…

जरा आणखी इंटरेस्टिंग माहिती सांगायची झाली तर, झाडीपट्टी रंगभूमीची खरीखुरी, अस्सल आणि इथल्या मातीतल्या कणाकणात रुजलेली लोककला म्हणजे दंडार. पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक घटनांतील प्रसंग गीत आणि नृत्याच्या रूपातून सादर करण्यालाच दंडार म्हणतात. दंडारसह तमाशा, गोंधळ, खडीगंमत, राधा ही झाडीपट्टी रंगभूमीवरील पारंपरिक लोककलेची विविध रूपं. पुढे या पारंपारिक संस्कृतीतही modernization आल्यामुळे दंडार या नाट्य कलाकृतीची लोकप्रियता कमी होत गेली आणि रात्री सादर होणाऱ्या दंडारची जागा नाटकाने घेतली.

================================

हे देखील वाचा : V Shantaram यांच्या अजरामर ‘पिंजरा’ चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट!

================================

सध्या प्रेक्षक मराठी-हिंदी-साऊथ किंवा इंग्लीश चित्रपटांच्यासोबतच नाटकही तितक्याच हिरीहिरीने पाहताना दिसतात… मराठी नाट्यप्रयोग तर हाऊसफउल्ल होतातच… अशातच ज्या झाडीपट्टी रंगभूमीला १५० वर्षांचा इतिहास आहे ती आजच्या या आधुनिक जगात आपलं अढळ स्थान निर्माण करन आहे हे कौतुकास्पदच आहे… तुमच्यापैकी कुणी झाडीपट्टीचे प्रयोग पाहिले असतील तर तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळला…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Maharashtra what is zadipatti theatre zadipatti theatre zollywood industry in maharashtra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.