VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Dhurandhar च्या वादळाचा मराठी चित्रपटांना फटका बसलाय का?
बॉक्स ऑफिसवर सध्या साऊथ, हिंदी आणि मराठी चित्रपटांची चांगलीच स्पर्धा सुरु आहे… परंतु, २०२५ मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘धुरंधर’ या शर्यतीत पहिला येण्याच्या मार्गात आहे… रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाचा मराठी चित्रपटांना फटका बसला आहे.. बरं, हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे.. याआधीही साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांच्या गराड्यात मराठी चित्रपट भरडले जातात… आताही असंच काहीसं घडलं आहे रेणूका शहाणेंच्या ‘उत्तर’ आणि रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) ‘आशा’ चित्रपटासोबत… जाणून घेऊयात सध्या या दोन्ही चित्रपटांची काय स्थिती आहे…

दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘धुरंधर’ रिलीज झाला होता… त्यानंतर १२ डिसेंबरला क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित उत्तर आणि त्यानंतर १९ डिसेंबरला ‘आशा’ (Aasha) चित्रपट रिलीज झाला… परंतु, आदित्य धरच्या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना संघर्ष करावा लागतोय… मिळालेल्या माहितीनुसार, ‘आशा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे ७ लाख रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माऊथ पब्लिसिटीमुळं सिनेमाच्या कमाईत किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटानं अंदाजे २२ ते २४ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे…

तर, दुसरीकडे अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांच्या ‘उत्तर’ चित्रपटाने ८ लाख कमवत पहिल्या दिव,ची सुरुवात केली होती… त्यानंतर आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.१८ कोटींची कमाई केली आहे.. महत्वाचं म्हणजे ‘आशा’ आणि ‘उत्तर’ हे दोन्ही कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवूनही दोन्ही चित्रपटांना योग्य शो आणि कलेक्शनसाठी झगडावं लागत आहे… दरम्यान, ‘धुरंधर’ च्या कमाईबद्दल बोायचं झालं तर या चित्रपटाने देशात ६०० कोटींच्या टप्पा तर जगात ८५० कोटांचा टप्पा पार केला आहे. (Marathi Movies 2025)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar चित्रपटाचा धमाका; रेकॉर्ड्स बघून हैराणच व्हाल!
================================
गेल अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते आणि मेकर्स मराठी चित्रपटांना मुंबईतच न मिळाणारं महत्व यासाठी झगडत आहेत, परंतु, कुठेतरी त्यांची ताकद कमी पडत आहे असं चित्र दिसून येत आहे… एकाहून एक उत्तम कथा मराठी चित्रपटांतून मांडल्या जात आहेत, शिवाय त्याच चित्रपटांना जागतिक पातळीवर कौतुकाची थाप मिळत असून आपल्या महाराष्ट्रात मात्र मराठी चित्रपटांनाच योग्य तो मान मिळत नाही आहे… लवकरच यावर काहीतरी उपाय करणं एकूणच मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी फार गरजेचं आहे… (Marathi Film Industry)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi