Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार एन्ट्री?; अभिनेत्रीने स्वतःच दिल उत्तर
मराठी छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘Bigg Boss Marathi’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सहाव्या सीझनची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असून, मागील सीझनच्या यशानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या नवीन सीझनचे होस्ट यंदाही महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) असणार आहे. या सीजनमधल्या स्पर्धकांची यादी अद्याप गुप्त ठेवली गेली आहे, तरी सोशल मीडियावर काही नावांची चर्चा जोरात सुरू आहे. ज्यात प्राजक्ता माळी च्या नावाची खुप चर्चा होत होती. चाहत्यांमध्ये आपापल्या आवडत्या कलाकारांबद्दल प्रश्न ही पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर (Prajakta Mali) चाहत्यांनी ‘तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार का?’ असा प्रश्न विचारला होता. प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर दिलेल्या उत्तरात “Never Ever” असे स्पष्ट सांगितले, ज्यामुळे तिच्या सहभागाविषयीची अफवा थांबली आहे. (Bigg Boss Marathi 6)

या सीझनसाठी काही प्रमुख चर्चित नावांमध्ये गौतमी पाटील (Gautami Patil), गौरव मोरे (Gaurav More), ईशा केसकर (Isha Keskar), विनायक माळी, विजय पाटकर आणि अंशुमान विचारे यांचा समावेश आहे. तरीही अधिकृत लिस्ट अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. सध्या ऐकण्यात येतंय की बिग बॉस मराठी 6 च्या घरासाठी ‘स्वर्ग आणि नरक’ ही थीम निवडण्यात आली आहे. घरात प्रवेशासाठी भव्य ‘महाद्वार’ असणार आहे, ज्यातून स्पर्धकांना त्यांच्या वागणुकीनुसार किंवा टास्कच्या निकालानुसार स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळेल. ही नवीन थीम खेळ अधिक आव्हानात्मक आणि मनोरंजक बनवेल असा अंदाज आहे.

बिग बॉस मराठी 6 चे प्रीमियर 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता Colors Marathi वाहिनीवर तसेच JioCinema – JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. मागील सीझनचा विजेता सूरज चव्हाण होता आणि त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता यंदा अधिकच वाढली आहे. (Bigg Boss Marathi 6)
===============================
===============================
चाहत्यांचे लक्ष आता याच्यावर आहे की, या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार, घरात कोणत्या टास्कची धमाल असेल आणि कोणाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करेल. नवीन थीम, रोमांचक ट्विस्ट आणि रितेश देशमुखचा होस्टिंग अंदाज यामुळे बिग बॉस मराठी 6 नक्कीच मनोरंजनाचा अनुभव देणार हे नक्की आहे.