Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

केवळ संतूर आणि बासरीच्या मदतीने S.D.Burman यांनी बनवले ‘हे’ अप्रतिम गाणे!
आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसता असं म्हणतात. याचा प्रत्यय सिनेमाच्या दुनियेत देखील बऱ्याचदा आलेला दिसतो. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला सर्व म्युझिशियनस आऊट ऑफ स्टेशन असल्यामुळे संगीतकाराला अवघ्या दोन म्युझिशियनस ची मदत घेऊन गाणं बनवावे लागले. त्या संगीतकाराला आपल्या कर्तृत्वावर प्रचंड आत्मविश्वास होता त्यांनी तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. आज हे गाणं येऊन पन्नास वर्षाचा कालावधी उलटला असला तरी एक सॉफ्ट रोमँटिक सॉंग म्हणून रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहे. कोणतं होतं ते गाणं कोणता होता ते चित्रपट आणि काय होता नेमका किस्सा?

१९७१ साली नवकेतन बॅनरचा ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट बनत होता नवकेतन च्या परंपरेला छेद देणारी या चित्रपटाची कथा होती एक हळुवार फुलणारी प्रेम कथा होती. A.J. Cronin. यांच्या The Citadel, या कादंबरी वर सिनेमाचे कथानक आधारले होते. सिनेमाची कथा/पटकथा ,संवाद आणि दिग्दर्शन विजय आनंद यांचे होते. समाजातील आदर्श, नीतिमत्ता, भ्रष्टाचार या सर्वांना स्पर्श करून जाणारी ही कथा होती. या चित्रपटात देव आनंद, मुमताज, विजय आनंद हेमामालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाचा नायक देव आनंद यांची या सिनेमातील भूमिका इतर चित्रपटातील भूमिकांपासून खूपच हटके होती.
या चित्रपटाची गाणी नीरज यांनी लिहिली होती. तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. चित्रपटात एकूण आठ गाणी होती. यातली सात गाणी ध्वनी मुद्रित झाली होती. फक्त एका गाण्याचे रेकॉर्डिंग राहिले होते. या गाण्याचे शूटिंग शेड्युल असल्यामुळे त्या गाण्याचे रेकॉर्डिंग तात्काळ करणे गरजेचे होते. सचिन देव बर्मन यांनी रेकॉर्डिंगची डेट ठरवली. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना ध्वनीमुद्रणा साठी बोलावले. पण एक प्रॉब्लेम असा झाला की, संगीतकार एस डी बर्मन आणि संगीतकार आर डी बर्मन या पिता पुत्रांची म्युझिक टीम एकच होती. म्युझिशियन्स दोघांकडे कॉमन होते. नेमकं त्याच वेळी आर डी बर्मन साऊथकडील वासन फिल्मच्या ‘लाखो मे एक’ या चित्रपटाला संगीत देत होते. या चित्रपटाच्या म्युझिकसाठी आर डी बर्मन त्यांच्या म्युझिशियन्सला घेऊन मद्रासला गेले होते.

बासू चक्रवर्ती आणि मनोहर सिंग हे अरेंजर देखील आर डी बर्मन सोबत गेले होते. त्यामुळे इकडे गोंधळ झाला. सचिन देव बर्मन यांनी जेव्हा बघितले की कोणीही म्युझिशियन किंवा अरेंजर इथे मुंबईत नाही म्हटल्यावर आता रेकॉर्डिंग कसे करणार? इतक्या तातडीने चेन्नईहून कोणालाही बोलावून घेणे शक्य नव्हते. सचिन देव बर्मन यांची थोडी चिडचिड झाली पण त्यांनी यातून मार्ग काढायचा ठरवले. त्यांनी संतूर वादक शिवकुमार शर्मा आणि बासुरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना सर्व सिच्युएशन सांगितली. आपल्याला फक्त ही दोन वाद्य आणि तबला घेऊन हे गाणे पूर्ण करायचे आहे असे सांगितले. इंटरल्यूड आणि प्रील्यूडमध्ये बासुरी आणि संतूर प्रॉमिनंटली वाजले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. बंगाली वाद्य खोल याचा वापर करावा असे देखील त्यांनी ठरवले त्या पद्धतीने केवळ तीन म्युझिशियनसला घेऊन त्यांनी ‘जीवन की बगिया मेहकेगी लहकेगी चहकेगी ..’ हे गाणं रेकॉर्ड केलं!
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
ज्या काळात शंभर शंभर म्युझिशियन्सचा ताफा रेकॉर्डिंग रूममध्ये असायचा त्या काळात केवळ तीन म्युझिशियन्स ला घेऊन सचिन देव बर्मन एक अप्रतिम युगल गीत तयार केलं! खरोखरच ही कमाल होती. तुम्ही हे गाणं शांतपणे ऐका तुम्हाला यामध्ये फक्त तीन वाद्य ऐकायला मिळतील. त्यातही संतूर आणि बासुरी याचा वापर पुरेपूर केलेला दिसतो. ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट त्या काळात सुरुवातीला चालला नाही पण नंतर एक कल्ट क्लासिक म्हणून आज देखील आवर्जून बघितला जातो. कधी कधी अशा प्रसंगातून चांगल्या गोष्टींचा जन्म होतो संतूर वादक शिवकुमार शर्मा आणि बासुरी वादक हरीप्रसाद चौरसिया या गाण्यात एकत्र आले आणि त्यांनी एक अप्रतिम गाणं तयार केलं. दहा वर्षानंतर हे दोघे ऑफिशियल एकत्र आले आणि यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ (१०८१) या चित्रपटाला संगीत दिले त्यानंतरचे पुढचे दोन दशक हे दोघे शिव-हरी या नावाने चित्रपटांना संगीत देत होते.