
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार या जोडगोळीचा Bhoot Bangala ‘या’ दिवशी होणार रिलीज
बॉलिवूडमध्ये आजवर बरेच कॉमेडी चित्रपट आले. यात मग कधी रोहित शेट्टीने Action Comedy चित्रपट आणले तर कधी करण जोहर, आनंद एल राय यांनी रॉमेंचिक कॉमेडी चित्रपट आणले… याच विनोदी चित्रपटांच्या यादीत दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी आपल्या हटके कॉमेडी चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या लक्ष विशेष वेधून घेतलं… ‘हेरा फेरी’, ‘हलचल’, ‘भूल भूलैल्या’ असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि ती जोडी आहे प्रियदर्शन व अक्षय कुमार यांची… लवकरच या जोडगोळीचा ‘भूत बंगला’ (Bhoot Bangala) हा चित्रपट रिलीज होणार आहे…
तर, बॉलिवूडचा खिलाडी (Akshay Kumar) बराच काळ देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसत होता. आणि आता लवकरच पुन्हा एकदा तो ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या कॉमेडी अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे… बऱ्याच महिन्यांपासून ज्या चित्रपटाच्या रिलीज डेटची सगळेच आतुरतेने वाट पाहात होते अखेर तो दिवस आला आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर करत मेकर्सनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. “बंगल्यातून एक बातमी आली आहे! १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात येत आहे ‘भूत बंगला’,” अशा कॅप्शनसह ही घोषणा करण्यात आली आहे. (Bollywood Movies)

दरम्यान, ‘भूत बंगला’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार दिसणार असून त्याच्यासोबत परेश रावल, राजपाल यादव आणि दिवंगत कॉमेडियन असरानी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. असरानी यांचा या जगाचा निरोप घेण्यापूर्वी हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. तसेच, या चित्रपटात तब्बू (Tabbu), वामिका गब्बी आणि जिस्सू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. विशेष म्हणजे प्रियदर्शन यांच्या जुन्या हिट चित्रपटांप्रमाणे या देखील चित्रपटात टॅलेंटेड कलाकार असल्यामुळे प्रियदर्शनच्या दिग्दर्शनाची जादू आणि तीच विनोदीबुद्धी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. (Entertainment News)
================================
================================
प्रियदर्शन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या टॅलेंटेड माणसाने १९९२ मध्ये ‘मुस्कुराहट’ या चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीची वाटचाल सुरु केली होती. त्यानंतर गर्दीश, विरासत, ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘खट्टा मिठा’, ‘क्युकी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आणि आता ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी त्यांचं कमबॅक जबरदस्त असणार यात शंकाच नाही… (Priyadarshan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi