Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट !
Shiv Thakare सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः त्याच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शिवने सोशल मीडियावर लग्न मंडपातील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना त्याने गुपचूप लग्न केल्याचा अंदाज बांधला. मात्र नंतर शिवने स्पष्ट केलं की हा फोटो त्याच्या एका शूटिंगदरम्यानचा होता. त्यामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली. दरम्यान आता शिव ठाकरेचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो स्वतःच्या लग्नाविषयी आणि भावी पत्नीबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतो. शिवने यामध्ये 2026 मध्ये लग्न करण्याचा विचार असल्याचं सांगितलं आहे. मात्र होणारी पत्नी नेमकी कोण असेल, याबाबत त्याने कोणताही खुलासा केलेला नाही.(Shiv Thakare)

या व्हिडीओमध्ये पापाराझी शिवला त्याच्या “सीक्रेट लग्ना”बद्दल शुभेच्छा देताना दिसतात. त्यावर शिव आश्चर्याने “कशासाठी?” असा प्रश्न करतो. पुढे तो हसत म्हणतो की ते सगळं चुकून झालं होतं आणि तो फक्त शूटिंगसाठी लग्नाचा सीन होता. “माझी आई तिथे नव्हती, आईशिवाय लग्न कसं होईल?” असंही तो स्पष्टपणे सांगतो.

शिव पुढे असंही म्हणतो की चाहत्यांकडून मिळणारं प्रेम पाहता आता खरंच लग्न करावंसं वाटू लागलं आहे. याच वर्षी लग्न होण्याची शक्यता असल्याचं तो सूचकपणे सांगतो. “देवाच्या मनात असेल तर तिच्याशीच लग्न होईल. देवाला वाटतंय की गावाकडच्या मुलीशीच माझं लग्न व्हावं,” असं म्हणत त्याने आपल्या साधेपणाची झलक दाखवली. तसेच होणाऱ्या सूनबाईची निवड आईच करणार, हेही त्याने ठामपणे सांगितलं. (Shiv Thakare)
=================================
=================================
शिव ठाकरे हे रिअॅलिटी टीव्ही विश्वातलं एक लोकप्रिय नाव आहे. ‘एमटीव्ही रोडीज 15’, ‘बिग बॉस मराठी 2’ ज्याचा तो विजेता ठरला, ‘बिग बॉस 16’, ‘खतरों के खिलाडी 13’ आणि ‘झलक दिखला जा 11’ अशा अनेक गाजलेल्या कार्यक्रमांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता चाहत्यांना फक्त एकच प्रश्न सतावत आहे, तो म्हणजे शिव ठाकरेच्या आयुष्यात लवकरच ‘ती’ कोण आहे?