Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !

Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !
मराठी टेलिव्हिजनमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया नाईक ( Akshaya Naik) आता हिंदी मालिकांच्या आणि वेब सीरिजच्या दुनियेतही स्वतःची जागा निर्माण करत आहे. तिचं ओटीटीवर पदार्पण ‘ग्रेटर कलेश’ या वेब सीरिजद्वारे झालं आणि त्यानंतर ती नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘तस्करी’ या शोमुळे जोरदार चर्चेत आली आहे. अक्षयाने आतापर्यंत जी भूमिका साकारल्या, त्यात ‘तस्करी’मधली स्वाती साळुंखे ही भूमिका तिच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरली आहे.‘तस्करी’मध्ये स्वाती साळुंखे हा एक स्मगलिंग करणारा पात्र आहे, ज्याला अक्षयाने अत्यंत नैसर्गिकपणे आणि दमदार पद्धतीने साकारलं आहे. या सिरीजची सुरुवात अक्षया च्या एंट्रीने होते आणि त्यानंतर तस्करीचा नाटकात्मक खेळ उलगडत जातो. या भूमिकेमुळे तिच्या अभिनयाच्या नव्या पैलूंचा खुलासा होतो आणि प्रेक्षकांना तिचा वेगळा अंदाज आवडतो. (Akshaya Naik)

अक्षयाने ‘तस्करी’मध्ये (Taskari web series) अनेक अँक्शन सीन केले आहेत. या अनुभवाबद्दल ती म्हणते, “स्वाती साळुंखेची भूमिका करताना खूप मजा आली, पण याच सोबत अनेक अँक्शन सीनही होते, ज्यामुळे आनंद दुप्पट झाला. ‘तस्करी’मध्ये एक मोठा अँक्शन सिक्वेन्स आहे. या भूमिकेसाठी निवड झाल्यापासून दिग्दर्शक राघव जयरथ सर दर आठवड्याला मला धावण्याची प्रॅक्टिस करायला सांगत होते, कारण दिवसभर खूप पळावं लागतं आणि फिटनेसवर विशेष लक्ष देणं आवश्यक होतं. अखेर तो दिवस आला जेव्हा आम्ही अँक्शन सीन शूट करत होतो. त्या सीनसाठी बॉडी डबल मागवला गेला होता, पण मी जवळजवळ सर्व गोष्टी स्वतः केल्या. त्यामुळे संपूर्ण टीम, फाइट मास्टरपासून ते दिग्दर्शक राघव जयरथ आणि स्पॉट दादा पर्यंत सर्वांनी माझं कौतुक केलं.”

अक्षयाला हेही म्हणाली की, तिला अनेक वर्षांपासून फाइट सीन करण्याची इच्छा होती आणि ‘तस्करी’मुळे ती इच्छा पूर्ण झाली. या वेब सीरिजमुळे तिला बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीसोबत काम करण्याची संधीही मिळाली. तिचा पहिला एंट्री सीनही इम्रान हाश्मी (Imran Hashmi ) सारख्या अनुभवी अभिनेत्याबरोबर असल्यामुळे तिचं कौतुक सोशल मीडियावर जोरदार होतं. ( Akshaya Naik)
================================
================================
आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की ‘तस्करी’नंतर अक्षया नाईक कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार? तिच्या करिअरची पुढची पायरी काय असेल? हे पाहण्यासाठी चाहत्यांना आतुरता आहे, कारण तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या रूपांमुळे ती आता वेगळ्या ओळखीने उभी राहू लागली आहे.