Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rajinikanth करिता किशोर कुमारचे पहिले आणि एकमेव हिट गाणे!

 Rajinikanth करिता किशोर कुमारचे पहिले आणि एकमेव हिट गाणे!
बात पुरानी बडी सुहानी

Rajinikanth करिता किशोर कुमारचे पहिले आणि एकमेव हिट गाणे!

by धनंजय कुलकर्णी 26/01/2026

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी सिनेमां मध्ये साउथ कडील सिनेमे रिमेक होऊन बॉलीवूड मध्ये येत होते. या रीमेक चित्रपटाचा नायक बऱ्याचदा जितेंद्र असायचा. ‘ज्योती बने ज्वाला’, ,’तोहफा’, ‘हिम्मतवाला’..  त्याच वेळी बॉलीवूडमधील काही सिनेमा देखील तमिळ तेलगू मध्ये रिमेक होत होते जसे ‘डॉन’, ‘दीवार’..   आणि तिकडे या सिनेमाचा नायक बऱ्याचदा रजनीकांत असायचा.  दिग्दर्शक टी. रामाराव यांनी  तमिळमध्ये बनलेल्या Sattam Oru Iruttarai (1981) या चित्रपटाचा रिमेक हिंदी मध्ये करायचे ठरवले ‘अंधा कानून’ या नावाने.  

यासाठी त्यांनी तमिळ सुपरस्टार रजनीकांत याला पहिल्यांदा हिंदी सिनेमा इंट्रोड्युस करायचे ठरवले. एकट्या रजनीकांतच्या जोरावर बॉलीवूड मध्ये सिनेमा हिट होऊ शकणार नाही म्हणून त्यांनी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना देखील एक स्पेशल अपीयरन्स मध्ये घेतले. अंधा कानून या सिनेमात हेमा मालिनी, प्राण ,प्रेम चोपडा , डॅनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्राण खूप वर्षांनी यात पुन्हा व्हिलन बनला होता. (यात व्हिलन ची नावे अमर, अकबर, अँथनी अशी होती.)  सिनेमाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती.  त्या काळात बॉलिवूडमध्ये एक ट्रेंड  होता.  सिनेमाचा दोन नायक असतील तर दोघांना वेगवेगळ्या पार्श्वगायकांचा प्लेबॅक असायचा.  या सिनेमात देखील अमिताभ बच्चन साठी किशोर कुमार आणि रजनीकांत साठी एस पी बालसुब्रमण्यम यांचा स्वर वापरण्याची ठरवले. 

एस पी बालसुब्रमण यांच्या स्वरातील दोन गाणे रेकॉर्ड झाली होती. मौसम का तकाजा है आणि एक तरफ हम तुम ही ती गाणी होती.  यातले दुसरे गाणे फास्ट ट्रॅक वरचे होते  त्यामुळे संगीतकार प्यारेलाल यांना एस पी बालसुब्रमण्यम यांच्या ऐवजी किशोर कुमार यांचा स्वर वापरावा असे वाटत होते.  (गाणं होतं एक तरफ हम तुम एक तरफ सारे) संगीतकार प्यारेलाल दिग्दर्शक टी रामाराव यांना म्हणाले की “ या गाण्यात आशाच्या आवाजा खाली एसपी यांचा आवाज दबलेला वाटतो तिथे आपल्याला एनर्जेटिक आवाज पाहिजे. “ पण “एस पी बालसुब्रमण्यम यांचाच आवाज रजनीकांतला सूट होतो!”  असे टी रामाराव यांचे म्हणणे होते. त्यावर प्यारेलाल असं म्हणाले की,” ते बरोबर आहे पण हा सिनेमा आपण हिंदीत बनवत आहोत . त्यामुळे किशोर चा स्वर हवाच. 

बॉलीवूड मधील सर्व ॲक्टर्स ला किशोर कुमार आणि रफी यांचा आवाज स्युट होतो कारण हे दोघे त्या हिरोच्या बॉडी लैंग्वेज ला अनुसरून आपला प्लेबॅक देत असतात त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका रजनीकांत वर किशोर कुमार चे गाणे स्युट   होईल!” त्यावर टी  रामाराव यांचे म्हणणे होते “ आता जाऊ द्या आता आहे ते गाणं तसंच राहू द्या.  या सिनेमात आणखी एक गाणं आहे जे रजनीकांत आणि हेमामालिनी वर चित्रित होणार आहे.  त्या गीतात किशोर कुमार यांचा स्वर वापरा!” संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल खूष  झाले.

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

=================================

त्यांनी लगेच किशोर आणि आशाच्या स्वरात गाणं रेकॉर्ड केलं गाण्याचे  बोल होते ‘मेरी बहना दिवानी पर वो समझती है सबसे वो सयानी है’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं चांगलं हिट  झालं होतं. सिनेमा सुपर हिट झाला. हे गाणे आजही रक्षा बंधन ला हमखास आठवले जाते. रजनीकांत वर किशोर कुमार यांचा स्वर व्यवस्थित स्युट झाला होता अंधा कानून या चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय गाणे होते जे अमिताभवर चित्रित होते ‘रोते रोते हसना सीखो हंसते हंसते रोंना..’ यातील ‘ये अंधा कानून है’ हे गाणे देखील हिट  झाले.  रजनीकांत आणि किशोर कुमार हे कॉम्बिनेशन फार काही चाललं नाही या दोघांची एकूण सात गाणी आहेत त्यापैकी सर्वाधिक हिट गाणं हेच ‘अंधा कानून’ या चित्रपटातील आहे गंगवा आणि भगवानदादा या सिनेमातील किशोर कुमार यांनी रजनीकांत साठी गायलेली गाणी त्या काळात बऱ्यापैकी हिट झाली होती.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan Bollywood bollywood update Celebrity Entertainment Kishore Kumar Rajinikanth
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.