
रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का जाब विचारला होता?
आपल्या देशात भाषे बाबत ची अस्मिता प्रचंड आहे. भाषावार प्रांत रचना जारी झाली असली तरी भाषेच्या प्रश्नावर वाद विवाद चाललेलाच असतो. अर्थात हे वाद आत्ता चेच नाहीत तर पूर्वी पासून आहेत. याचा फटका एक संगीतकाराला बसला होता. हा किस्सा चाळीस च्या दशकाच्या अखेरचा आहे. संगीतकार सचिन देव बर्मन यांना रस्त्यात अडवून काही दाक्षिणात्य लोकानी धमकावले होते. सचिनदा यांनी कशी बशी यातून सुटका करून घेतली होती पण या प्रसंगाचा चांगलाच धसका त्यांनी घेतला होता.
फिल्मिस्तानच्या ‘आठ दिन’ (१९४६) द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे संगीतकार सचिन देव बर्मन यांना त्याच बॅनरच्या १९४९ च्या निर्मिती, “शबनम” या चित्रपटाल संगीत दिले होते. हा सिनेमा म्युझिकली हिट झाला होता. कामिनी कौशल, दिलीप कुमार आणि पारो अभिनित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला. या सिनेमाचे दिग्दर्शन बी मित्रा यांनी केले होते. हा सिनेमा George Cukor दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट Sylvia Scarlett, (१९३५) वर आधारीत होता या हॉलीवूड सिनेमात कॅथरीन हेपबर्न आणि कॅरी ग्रँट यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

‘शबनम’ ची गाणी देशभर सर्वत्र गाजत होती आणि लग्न कार्यात वाजवली जात होती, विशेषतः मुंबईतील बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये या गाण्यांचा विशेष बोलबाला होता. शमशाद बेगम यांनी गायलेले बहुभाषिक गाणे, “ये दुनिया रूप की चोर” हे एक खास गाणे होते ज्याने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात अपील केले होते . हे गाणे, हलकेफुलके आणि मजेदार होते , ज्यामध्ये भारतातील विविध भागातील संगीताचे विडंबन आहे कारण नायिका बंगाली, गुजराती, महाराष्ट्रीयन, ‘मद्रासी’ आणि पंजाबी पुरुषांशी संवाद साधत नृत्य करीत हे गाणे गाते. खरं तर हे मजेदार स्ट्रीट सॉन्ग होते. या गाण्याने कहर लोकप्रियता हासील केली होती. पण ‘मद्रासी’ प्रांताची यातून थट्टा होते. त्यांच्या बोलण्याच्या शैली ची चेष्टा यातून होते असे मुंबई तील काही दाक्षिणात्य लोकाना वाटले ते या गाण्याने चिडले होते. आमचा अपमान करण्यासाठी हे गाणे बनवले असा त्यांचा समज झाला.
‘शबनम’ ज्या वेळी प्रदर्शित झाली तेव्हा एस डी बर्मन सायन येथे राहत होते, जिथे दक्षिण भारतीयांची संख्या जास्त होती, विशेषतः तमिळ समुदाय. उत्तरेकडील लोक त्यांना ‘मद्रासी’ म्हणत. एके दिवशी, बर्मन दादा किंग्ज सर्कल स्टेशनवर जात असताना काही तमिळ लोकांनी त्यांना थांबवले आणि विचारले की ,” आपण एस डी बर्मन आहात का? “ बर्मन दादांनी मान हलवली आणि त्या लोकांना ऑटोग्राफ हवा आहे असे समजून पेन बाहेर काढला कारण आता रसिक प्रेक्षक त्यांना ओळखत होते. पण सचिन दा यांना धक्का बसला, जेव्हा एका माणसाने त्यांच्या गळ्याला धरले आणि दुसऱ्याने त्याचा कुर्ता ओढला.जमाव खूप प्रक्षुब्ध झाला होता. बर्मन दादा स्वतः या घटनेबाबत म्हणाले होते कि , “ते लॉक खूप रागावले होते. ‘तुम्हाला वाटते की तुम्ही आमच्या संगीताची थट्टा करू शकता?’ असं ते लोक म्हणत होते ‘आम्ही तुम्हाला दाखवू की आमचे संगीत कसे आहे!’ … मी त्यांची नम्रपणे माफी मागितली. त्यांनी मला शपथ घेण्यास भाग पाडले की भविष्यात मी माझ्या संगीतात असे कधीही करण्याचा प्रयत्न करणार नाही.”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
‘ शबनम ‘चे हे जे गाणे आहे ते मला तर संपूर्ण गाणे खूपच मजेदार वाटते. शमशाद बेगम ने मोठ्या उत्साहात हे मजेदार गीत गायले होते. गमंत म्हणजे या गाण्याच्या दहा वर्षे आधी प्रभात फिल्म्स च्या ‘आदमी’ या सिनेमात असेच बहुभाषिक गाणे होते. त्यावर कुणी आक्षेप घेतला नव्हता. या गाण्यात भारतातील विविध प्रांता तील गाण्याचा तिथल्या शैलीचा लहजा जपत संगीतकाराने गाणे बनवले होते. कमर जलालाबादी यांनी गाणे लिहिले होते. या शनबम ची प्रेक्षकांना प्रकर्षाने झाली जेव्हा या सिनेमाची नायिका कामिनी कौशल्य यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्यावरच हे गाणे चित्रित झाले होते. या चित्रपटाची दुसरी आठवण म्हणजे अभिनेता मनोज कुमार चे खरे नाव हरीकिशन गोस्वामी. लहानपणा पासून तो दिलीपकुमारचा चाहता होता. त्याने स्वतःचे फिल्मी नाव मनोज कुमार केवळ याच साठी करून घेतले होते कि ‘शबनम’ या सिनेमात दिलीपकुमारच्या व्यक्तीरेखेचे नाव मनोज होते! दिलीपकुमारने जी बॅग या सिनेमात आपल्या गळ्यात घेतली होती ती शबनम बॅग म्हणून सर्वत्र फेमस झाली!