Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

 जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

by धनंजय कुलकर्णी 30/01/2026

कोणतेही गीत बनताना संगीतकार त्यावर प्रचंड मेहनत घेत असतात त्या गीतातील  शब्दांना रसिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी त्यात थोडेफार बदल देखील करत असतात पण त्या गाण्याचा मतितार्थ योग्य रीतीने रसिकां पर्यंत पोहचवा यासाठी त्याचा कायम प्रयत्न असतो.  गुलजार यांनी लिहिलेली एक गझल तब्बल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली होती आणि प्रत्येकाने त्यातील सौंदर्य अधिक चांगल्या रीतीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला होता.  गंमत म्हणजे पहिले दोन व्हर्जन रसिकांपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे गुलजार यांना आपली ही गझल शापित वाटू लागली पण नंतर मात्र या गझलने  दुनियाभरातील रसिकांना खिळवून टाकले होते. कोणती होती ती गझल आणि काय होता तो नेमका किस्सा?

साठच्या  दशकाच्या अखेरीस एक चित्रपट बनत होता ‘मिट्टी का देव’ यात संजीव कुमार प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाला  संगीत सलील चौधरी यांचे होते या चित्रपटात साठी गुलजार यांनी एक गझल लिहिली.  ‘शाम से आंख मे नमी सी  है आज फिर आपकी कमी सी है..’  गझल सलील चौधरी यांनी मुकेश यांच्या स्वरात रेकॉर्ड केली.  पण हा चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही आणि डब्यात गेला.  त्यामुळे मुकेश यांनी गायलेली गुलजार यांची ही  गझल रसिकांपर्यंत पोहोचू शकले नाही. (अलीकडे मात्र सलिल चौधरी यांच्या वेबसाइट वर हे गाणे ऐकायला मिळते!) 

त्यानंतर काही वर्षांनी हीच गझल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गेली. त्यांनी ही गझल लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड केली यात फक्त त्यांनी ‘ शाम से आंख मे नमी नमी सी है आज फिर आपकी कमी कमी सी है‘ असं नमी’ आणि ‘कमी’ला संगीतकार  एल पी यांनी हे दोन शब्द मीटर मध्ये बसण्यासाठी रिपीट केले. त्या मुळे गझलेत सुरेल नादमयता आली. या गझलला लता मंगेशकर यांनी अतिशय सुंदर रीतीने गायले होते पण दुर्दैवाचा भाग म्हणजे ज्या चित्रपटात ही गझल होती तो चित्रपट देखील अर्धवटच राहिला आणि तो देखील डब्यात गेला! त्यामुळे ही गझल रसिकांसमोर येऊच शकली  नाही. गीतकार  गुलजार यांना आता हे गझल शापित वाटू लागली कारण दोन मातब्बर संगीतकार सलिल चौधरी व लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि मुकेश व लता या गायकांनी गाजलेली गझल रसिकांपर्यंत केवळ चित्रपट पडद्यावर न आल्यामुळे रसिकांपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

================================

हे देखील वाचा : Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना का झापले होते?

================================

यानंतर बरीच वर्षे गेली नव्वद  च्या दशकाच्या सुरुवातीला आर डी बर्मन गुलजार आणि आशा भोसले यांनी ‘दिल पडोसी है’  हा अल्बम तयार केला.  यात त्यांनी गझल घेतली.  आशा भोसले यांच्या स्वरात ही गझल रेकॉर्ड झाली.  यात त्यांनी मूळ गझल जशीच्या तशी वापरली त्यात कुठलाही शब्द रिपीट केला नाही. आता मात्र ही गझल रसिकांपर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचली.  गुलजार अर्थातच खूप आनंदित झाले कारण मागच्या वीस वर्षापासून ही  गझल लिहून झाली होती पण संगीतबद्ध होऊन देखील रसिकांसमोर  येऊ शकली नव्हती. या गझलची स्टोरी इथेच संपत नाही. 

१९९९ साली गजलांचे बादशहा जगजीत सिंग यांच्या हाती ही गजल आली आणि त्यांनी त्यांच्या खास स्टाईल मध्ये ही गझल रेकॉर्ड केली.  पुढे त्याचा समावेश त्यांच्या ‘मरासिम’ या अल्बम मध्ये झाला. अशा रीतीने एक गझल चार संगीतकारांनी सलिल चौधरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन आणि जगजीत सिंग यांनी स्वरबद्ध केली. जगजित सिंग आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ही गझल आवर्जून म्हणत असत आणि रसिक देखील या गजले ला मनमुराद दाद देत असत!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update Entertainment Gulzar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.