Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

 NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….
कलाकृती विशेष

NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

by दिलीप ठाकूर 09/02/2026

आपल्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशातील चित्रपट संस्कृतीत अनेक लहान मोठे घटक समाविष्ट आहेत. आणि ती एक खूपच मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. आपल्या देशात वर्षभरात विविध भाषांतील जवळपास बाराशे तेराशे चित्रपट प्रदर्शित होतात या संख्याबळासह इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट, चित्रपट निर्मिती. त्यात आर्थिक नियोजन यशस्वीपणे करीत पडद्यावर चित्रपट आणण्यासाठी अतिशय फोकस्ड असलेल्या निर्मिती संस्था ते चित्रपट निर्मितीची केवळ हौस मौज असलेले, पण चित्रपट माध्यम आणि व्यवसाय याची जराही माहिती नसलेले अशी ही उतरंड आहे. कमी जास्त गुणवत्तेचे चित्रपट का बनतात याचे उत्तर त्यात आहे.

त्यातच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ. अर्थात एन एफ डी सी.‌ ही भारत सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेली चित्रपट निर्मिती संस्था.१९७५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली, त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातूनच वेगळ्या अशा मराठी आणि हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाले. (NFDC)

सत्तरच्या दशकात एकीकडे मसालेदार मनोरंजक चित्रपटांची गल्ला पेटीवर चलती होती. एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्यानी पब्लिक पिक्चर एन्जॉय करे (दिग्दर्शक मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, रमेश सिप्पी जबरदस्त फाॅर्मात होते), तर दुसरीकडे वास्तववादी आणि कलात्मक अशा चित्रपटांची निर्मिती हळूहळू आकार घेत होती. मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्या कलाकृती. बौध्दिक खाद्य देणारे असे चित्रपट. त्यातच या दोन्हीचा मध्य असलेल्या अशा स्वच्छ, निखळ मनोरंजन चित्रपट रसिक स्वीकारत होते. ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी यांचे चित्रपट. या चित्रपटाना क्वालिटी असं प्रमाणपत्र देण्यात यावे अशी त्या काळात चर्चा होत होती. ती चर्चा तशीच राहिली. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील फक्त आणि फक्त चर्चेत राहिलेले विषय अनेक.

अशातच वेगळ्या प्रवाहातील आशयघन चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी आणि आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि ती हितकारक ठरली. ही संस्था आर्थिक नियोजनापासून चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सकारात्मक असल्याने अनेक दर्जेदार कलाकृती आपल्या समोर येत राहिल्या. त्यातील काही चित्रपटांची नावे अशी, कुंदन शहा दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’(हिंदी), रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (एकाच वेळेस हिंदी आणि इंग्रजीत),डॉ.जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ (मराठी), अरीबन स्याम शर्मा दिग्दर्शित ‘सनबी’ (मणिपुरी), एम. एस. सथ्यू दिग्दर्शित ‘गलिग’ (कन्नड), सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘दोघी’ (मराठी), भरेन्द्र नाथ सैकिया दिग्दर्शित ‘काल संध्या(आसामी). (Indian Cinema)

मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ (हिंदी), रितेश बत्रा दिग्दर्शित ‘लंच बॉक्स’ (हिंदी), ए. के. कौल दिग्दर्शित ‘२७ डाऊन’ (हिंदी), तपन सिन्हा दिग्दर्शित ‘एक डॉक्टर की मौत’ (हिंदी),  व्ही. अय्यर दिग्दर्शित ‘आदि शंकराचार्य’ (संस्कृत), दुविधा सत्यजित रे दिग्दर्शित ‘गणशत्रू’ (बंगाली), गौतम घोष दिग्दर्शित ‘अंतरजली यात्रा’ (बंगाली), कुमार शाहनी दिग्दर्शित ‘तरंग’ (हिंदी), मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’ (हिंदी), लक्ष्मीकांत शेटगावकर दिग्दर्शित ‘द मॅन बियॉण्ड द ब्रीज’ अर्थात ‘पालटाडाचो मुनिस’ (कोंकणी), ए. के. बीर दिग्दर्शित ‘शीशा दृष्टी’ (ओरिया), चिदानंदा दासगुप्ता दिग्दर्शित ‘आमोदिनी’ (बंगाली), कल्पना लाजमी दिग्दर्शित ‘रुदाली’ (हिंदी), श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘सूरज का सातवा घोडा’ (हिंदी), गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘पार्टी’ (हिंदी), परवेझ मेरवानी दिग्दर्शित ‘पेरसी’ (गुजराती), के. एस. सेतुमाधवन दिग्दर्शित ‘मरुपक्कम’ (तमिळ) वगैरे वगैरे अनेक चित्रपट.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रकाश मगदूम हे सध्या काम पाहत आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या या संस्थेची वाटचाल अतिशय फोकस्ड आणि उल्लेखनीय अशीच आहे. एन एफ डी सीच्या वतीने चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत असते. या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक वैशिष्ट्यपूर्ण कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले असून ते संग्राह्य असेच आहे.  एन एफ डी सीच्या वैशिष्ट्यपूर्ण” लॅण्डमार्क ” चित्रपटाची बोलकी पोस्टर्स आणि फोटो त्यात पाहायला मिळतात. चित्रपटाची पहिली ओळख त्याचे नाव, त्यासह त्याचे पोस्टर, त्यावरचे लेटटिंग असते. चित्रपट असा छोट्या छोट्या गोष्टीतून रसिकांपर्यंत जात असतो. हे व्यावसायिक पत्थ एन एफ डी सीने व्यवस्थित जपले आहे…. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : विक्रम भट्टच्या Kasoor चित्रपटाची पंचवीशी….

================================

एन एफ डी सीला अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त असा फोकस हवाच. अर्थात, काही निर्माता आणि दिग्दर्शकांना एन एफ डी सीचे सहकारी मिळू शकले नाही हादेखील एक विषय आहेच. आणि तशाही काही गोष्टी होत असतात.महत्वाचे आहे ते एन एफ डी सीने आपल्या देशातील हिंदी आणि मराठीसह बंगाली, तमिळ, तेलगू, कोंकणी इत्यादी प्रादेशिक भाषेतील वेगळ्या गोष्टीवरील चित्रपटांना प्रोत्साहन दिले. चित्रपट रसिकांना बौद्धिक आनंद दिला. आज ओटीटी माध्यमातून चित्रपट खूपच जवळ आला आहे आणि त्यात जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट आणि वेबसिरीज पाह्यला मिळताहेत, त्यात अशा वेगळ्या गोष्टीवरील चित्रपटांनाही विशेष स्कोप आहेच. आजचा चित्रपट रसिक विविध गोष्टींवरील चित्रपटाचा शोध घेत आहेत, तो शोध अशा चित्रपटापर्यत नेणाराही आहे.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Entertainment Indian Cinema indian cinema history
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.