
Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा
Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतच्या (Rakhi Sawant) धमाकेदार एन्ट्रीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. तिच्या आगमनापासूनच घरात नवा ड्रामा, टोलेबाजी आणि वादांची मालिकाच सुरू झाली आहे. आता अपकमिंग भागाच्या प्रोमोमुळे राखी आणि रुचिता (Ruchita) यांच्यातील संघर्ष विशेष चर्चेत आला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी खास ‘मस्तानी’ लूकमध्ये दिसते. पारंपरिक अंदाजात सजलेली राखी मात्र स्वतःला ‘मस्तानी’ नव्हे तर ‘चुस्तानी’ म्हणत सगळ्यांनाच इशारा देते. “मी मस्तानी नाही, चुस्तानी आहे… सगळ्यांचं रक्त चुसणार,” असा डायलॉग टाकत ती घरातल्या सदस्यांना चांगलंच घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिचा आत्मविश्वास आणि बिनधास्त शैली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते.(Bigg Boss Marathi 6)

यानंतर राखी घरातील सदस्यांना आदेश देताना दिसते. कुणाला भांडी घासायला सांगते, तर कुणाला कपडे धुवायला. या सगळ्यात ती थेट रुचितालाच तिचे कपडे धुवायला सांगते आणि इथूनच वादाला सुरुवात होते. राखीचा हा हुकूमशाही अंदाज रुचिताला अजिबात पसंत पडत नाही. रुचिता देखील तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर देते. ती राखीला सुनावत, “कपडे धुवेन, पण परत घालायला काही उरणार नाही,” अशा शब्दांत इशारा देते. तिच्या या प्रत्युत्तरामुळे घरातील वातावरण आणखी तापतं. दोघींमध्ये शब्दांची चकमक रंगते आणि इतर सदस्यही हा प्रसंग पाहत स्तब्ध होतात.

प्रोमोमध्ये पुढे रुचिता राखीचे कपडे घेऊन थेट स्विमिंग पूलजवळ जाताना दिसते. “हेच धुवायचे आहेत का?” असा सवाल करत ती परिस्थितीला आणखी रंगत आणते. या दृश्यामुळे आगामी भागात काय घडणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण राखीच्या एंटरटेनिंग आणि बेधडक स्वभावाचं कौतुक करत आहेत, तर काहींना रुचिताची ठाम भूमिका आणि आत्मविश्वास भावला आहे. दोघींच्या या वादामुळे घरातील समीकरणांमध्ये बदल होणार का, याबद्दलही चर्चा रंगली आहे.(Bigg Boss Marathi 6)
==============================
==============================
एकूणच, राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर बिग बॉस मराठी 6 अधिकच रंगतदार झाला आहे. आगामी भागांमध्ये राखी आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष आणखी तीव्र होणार का, की दोघी पुन्हा मैत्रीच्या वाटेवर येणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच रोचक ठरणार आहे.