Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा

“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये विशाल अक्षयाने बांधली लग्नगाठ   

 Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये विशाल अक्षयाने बांधली लग्नगाठ   
Vishal-Akshaya Wedding Photo
टीव्ही वाले मिक्स मसाला

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये विशाल अक्षयाने बांधली लग्नगाठ   

by Team KalakrutiMedia 12/02/2026

मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाची बातमी चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) यांनी आयुष्यभराच्या सोबतीचा निर्णय घेत अखेर ते लग्नबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे १० फेब्रुवारी म्हणजेच विशालच्या वाढदिवशी दोघांनी सात फेरे घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विशालने ही आनंदवार्ता चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती, आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली. महत्वाच म्हणजे मुंबई-पुण्यातील भव्य सोहळ्यांऐवजी या जोडीने उत्तराखंडमधील पवित्र त्रियुगीनारायण मंदिरात (Triyuginarayan Temple) साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला.गंगा घाट (Ganga Ghat)  परिसरातील हे मंदिर हिंदू परंपरेत अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक जोडपी आयुष्यभराच्या नात्यासाठी या स्थळाची निवड करतात. विशाल आणि अक्षया यांनीही याच परंपरेचा मान राखत मंदिर परिसरात पारंपरिक विधींनुसार विवाह केला.(Vishal-Akshaya Wedding)

Vishal NIkam Akshaya Hindalkar Wedding
Vishal-Akshaya Wedding Photo

या दोघांचा लग्नसोहळा अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता. फक्त जवळचे कुटुंबीय आणि काही निवडक नातेवाईक यांच्या उपस्थितीत विधी पार पडले. अक्षयाने केशरी रंगाचा आकर्षक घागरा परिधान केला होता. पारंपरिक दागिन्यांसह तिचा लूक अत्यंत देखणा दिसत होता. तर विशालने हिरव्या रंगाची धोती आणि पांढरे उपरण परिधान करत साधेपणातला रुबाब दाखवला. दोघांचाही पारंपरिक आणि सोज्वळ अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. लग्नाचा व्हिडीओ शेअर करत विशालने एक भावुक कॅप्शन लिहिलं.  “चंद्रभागेसारखं प्रेम आपलं सखी, मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाई सारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन, कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन.” अस म्हणत त्याने अक्षयावरचं प्रेम व्यक्त केलं. या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील मित्रमंडळींनीही नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

Vishal NIkam Akshaya Hindalkar Wedding
Vishal-Akshaya Wedding Photo

विशाल आणि अक्षया यांनी स्टार प्रवाहवरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्या काळातच दोघांची मैत्री घट्ट झाली आणि पुढे त्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्याची चर्चा आहे. पडद्यावरची केमिस्ट्री आता खऱ्या आयुष्यातील नात्यात रूपांतरित झाल्याने चाहते त्यांच्या प्रेमकथेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.(Vishal-Akshaya Wedding)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा

============================

एकूणच, ग्लॅमर आणि दिखाव्यापेक्षा परंपरा आणि अध्यात्मिकतेला प्राधान्य देत विशाल आणि अक्षया यांनी केलेला हा विवाह सोहळा मराठी इंडस्ट्रीत वेगळेपणाने लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या नव्या आयुष्याला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshaya Hindalkar wedding Celebrity Entertainment Marathi celebrity wedding marathi entertainment news Marathi TV actors wedding Triyuginarayan Temple wedding Uttarakhand wedding Vishal Akshaya wedding Vishal Akshaya wedding Triyuginarayan Temple Vishal Nikam wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.