Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही…. 

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील तीन गाणी!

 Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील तीन गाणी!
बात पुरानी बडी सुहानी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील तीन गाणी!

by धनंजय कुलकर्णी 20/02/2026

भारतीय चित्रपट संगीतामध्ये लता मंगेशकर आशा भोसले यांच्या सोबतच ज्या स्वराने रसिकांना मोहित केले होते त्यामध्ये एक स्वर होता गीता दत्त यांचा.  पन्नास आणि साठ  च्या दशकामध्ये गीता दत्त यांनी अप्रतिम गाणी गाऊन भारतीय चित्रपट संगीत समृद्ध केलं आहे. लता अशा आणि गीता दत्त या दोघींची काही युगल गीते आहेत जसे क्या बताऊ  मुहोब्बत है क्या (पर्बत) हम पंछी मस्ताने ( देख कबीरा रोया) आशा भोसले आणि गीता दत्त यांनी काही गाणी सोबत गायली ‘जानू जणू रे काहे खनका (इंसान जग उठा) लता आणि आशाची तर चिक्कार गाणी आहेत. मन कयू बहका रे बहका (उत्सव) पण लता ,आशा आणि गीता या तिघींनी एकत्र एकही गाणे गायल्याचे ऐकिवात नाही. पण एक म्युझिकल थ्रेड आपल्याला सापडतो ; ज्यामध्ये गीता दत्त यांनी गायलेल्या एका बंगाली गाण्यावरून हिंदीत लता मंगेशकर यांनी एक गाणे गायले होते आणि लताच्या याच हिंदी गाण्याच्या इंटरल्यूड मधील म्युझिकवरून आशा भोसले यांचे एक सदाबहार चित्रपट गीत गायले!

या तिघींनी एकत्र जरी एकही गाणे गायले नसले तरी एक ट्यून या  तिघींना एकत्रित आणणारी होती. कोणती होती ती ट्यून? आणि काय होता तो नेमका हा  किस्सा? पार्श्व गायिका गीता रॉय या तिघी मध्ये सीनियर. यांनी आपल्या गायकीची सुरुवात चाळीस च्या दशकात सुरू केली होती.  त्यावेळी गीता रॉय या नावाने त्या पार्श्वगायन करत असत. ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ हे त्यांचे पहिलं गाजलेले हिंदी चित्रपट गीत. गीता रॉय यांनी बंगालीमध्ये देखील भरपूर गायन केले आहे. अभिनेता गुरुदत्त यांच्या सोबत १९५२ साली त्यांचे लग्न झाले आणि गीता रॉय च्या गीता दत्त झाल्या.  

गीताचा आवाज जितका सुंदर होता तितकाच त्यांचा चेहरा देखील.  त्यामुळे त्यांना चित्रपटात काम करण्याच्या  ऑफर पहिले पासून येत होत्याच. 1957 साली गुरुदत्तने आपली पत्नी गीता दत्तच्या करिता एका बंगाली चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरलं ‘गौरी’.  हा चित्रपट बंगाली मध्ये बनणार होता.  या सिनेमासाठी संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांना साईन  केले गेले.  या सिनेमासाठी गीता दत्त यांच्या स्वरात सचिन देव बर्मन यांनी एक गाणे रेकॉर्ड केले. गाण्याचे बोल होते ‘जानी भंवरा काइना ’ (Lyrics: Gauriprasanna Majumdar) गीतादत्तच्या लडिवाळ आवाजात हे गाणे अतिशय सुंदर बनले होते. पण गुरुदत्त च्या लहरी स्वभाव मुळे हा चित्रपट डब्यात गेला आणि गीता दत्त ला पडद्यावर अभिनेत्री म्हणून येण्याचं स्वप्न अपुरेच राहिले.  ‘गौरी’ या चित्रपटासाठी जे गाणं गीता दत्त यांच्या स्वरात रेकॉर्ड केलं होतं तेच गीत पुढे संगीतकार सचिन देव बर्मन यांनी स्वत:च्या आवाजात एका प्रायव्हेट अल्बमसाठी रेकॉर्ड केली.

यानंतर तीन चार वर्षाचा कालावधी निघून गेला 1962 साली संगीतकार सचिन देव बर्मन ‘डॉ. विद्या ‘ या हिंदी चित्रपटाला संगीत देत होते.  त्यावेळी एका गाण्याचे ध्वनीमुद्रण करताना त्यांना आपल्या त्या बंगाली गाण्याची आठवण झाली जे गाणे त्यांनी गीता दत्ताच्या स्वरात ‘गौरी’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले होते.  त्याच  गाण्याची ट्यून  घेऊन त्यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात ‘जानी तुम डोले दगा देके ‘ हे गाणे रेकॉर्ड केले. खरी गंमत पुढेच आहे या हिंदी गाण्याच्या इंटरल्यूड  मधील म्युझिक ला घेऊन सचिन बर्मन यांनी त्याच्या पुढच्याच वर्षी बिमल रॉय यांच्या बंदीनी ‘चित्रपटातील गाणे आशा भोसले यांच्या स्वरात रेकॉर्ड केले.

================================

हे देखील वाचा : किशोर-Asha Bhosleच्या रोमँटिक गाण्याची लोकप्रियता आज सत्तर वर्षानंतर देखील का वाढते आहे?

================================

या गाण्याचे बोल होते ‘ओ पंछी प्यारे सांझ सखा रे बोली तू कौनसी बोले बता रे..’  हे गाणं अफाट लोकप्रिय झालं.  चित्रपट होता 1963 सालचा बंदिनी.  म्हणजे गीता दत्त च्या स्वरात रेकॉर्ड झालेले गाणं जे कधी पडद्यावर येऊ शकलं नाही पण याच गाण्याच्या ट्यून वर  डॉ.  विद्या या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी एक  गाणे गायले आणि याच गाण्याच्या अंतऱ्यातील म्युझिक मधून आशा भोसले यांच्या  या सदाबहार गाण्याचा जन्म झाला.  लता मंगेशकर , आशा भोसले आणि गीता दत्त या तीन स्वरांनी एकत्र कुठलेही गाणे जरी गायले नसले तरी हा एक संगीताचा धागा त्यांना एकत्र आणताना दिसतो. खाली मी वर उल्लेख केलेल्या चार ही गाण्यांच्या यू ट्यूब लिंक दिल्या आहेत नक्की ऐका.

https://youtu.be/FNOBqxomNmw?si=-9TyV4GKrRxrxOjJ (geeta dutta)

https://youtu.be/dNzmE8yhM4M?si=6bLHxk__qMIPKNfS (S D Burman)

https://youtu.be/LBDz1Kpns2o?si=jYKzcpH4-NKuVPQr (डॉ विद्या लता मंगेशकर)

https://youtu.be/E-3Yk6nmwNo?si=t6L9ykZzzQcLhXNc (बंदीनी – आशा भोसले)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: asha bhosle Bollywood bollywood update classic music Entertainment News geeta dutt indian songs lata mangeshkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.