Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष;

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !

 Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !
Super Duper Marathi Movie 2026
मिक्स मसाला

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !

by Team KalakrutiMedia 28/02/2026

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ (Super Duper)  या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि क्षणात चर्चेचा विषय ठरला. पोस्टरनंतर वाढलेली उत्सुकता आता टीझरमुळे आणखीच उंचावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत एन्जॉय करता येईल असा हा बहुचर्चित मल्टिस्टारर सिनेमा ३ एप्रिलपासून थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टीझरमध्ये दोन वेगळ्या कुटुंबांची रंगतदार झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरांना जपणारी घराणी, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण पिढी आणि या दोघांमध्ये सुरू असलेली काहीतरी ‘गुप्त’ योजना. नेमका हा डाव कोणता? या विचारांच्या टकरीतून काय गमती-जमती घडणार? आणि शेवटी या संघर्षाला कोणतं वळण मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता टीझर वाढवतो, मात्र उत्तरांसाठी चित्रपटगृहात जावंच लागणार आहे. (Super Duper Marathi Movie Teaser)

Super Duper Marathi Movie
Super Duper Marathi Movie 2026

या कथानकाचा केंद्रबिंदू आहे, एकाच छताखाली राहणाऱ्या दोन भिन्न विचारसरणी. पिढ्यांमधील अंतर, जीवनशैलीतील बदल आणि नात्यांमधील गोडवा या सगळ्याचा संगम हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न ‘सुपर डुपर’मध्ये दिसतो. विनोदासोबत भावनिक क्षणांचीही जोड असल्याची झलक यातून मिळते. नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. छायांकनाची धुरा संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

Super Duper Marathi Movie
Super Duper Marathi Movie 2026

कलाकारांची भलीमोठी फौज हा या चित्रपटाचा खास आकर्षणबिंदू आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासोबत ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला वेगळीच रंगत देणार आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या मते, हा केवळ विनोदी सिनेमा नसून नात्यांमधील ऊब, पिढ्यांतील दरी आणि ती मिटवण्याचा प्रवास यांची कहाणी आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.  (Super Duper Marathi Movie Teaser)
=================================

हे देखील वाचा: मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…

=================================

झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही ‘सुपर डुपर’ला वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा असल्याचे सांगितले. दमदार कलाकार, मजबूत लेखन-दिग्दर्शन आणि उच्च निर्मितीमूल्ये यामुळे हा चित्रपट उन्हाळ्यातील परिपूर्ण मनोरंजन पॅकेज ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. एकूणच, विनोद, भावना आणि कौटुंबिक नात्यांचा सुंदर मिलाफ अनुभवायचा असेल, तर ‘सुपर डुपर’ हा चित्रपट ३ एप्रिलला नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी चिन्हे टीझरवरून स्पष्ट दिसत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi cinema news marathi entertainment news Marathi Family Entertainer Marathi Film Teaser Marathi Movie marathi movie 2026 New Marathi Movie Teaser Super Duper April 3 Release Super Duper Marathi Film Super Duper Marathi movie Super Duper teaser Super Duper Teaser Launch Upcoming Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.