
रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला रान मोकळं मिळणार?
१९ मार्च २०२६ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील २ मोठे चित्रपट एकमेकांना क्लॅश होणार होते. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ आणि गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक : द फेरीटेल फॉर ग्रोन अप्स’. मात्र, आता टॉक्सिक चित्रपटाने रिलीज डेट पुढे ढकलली आहे. सोशल मिडियावर चित्रपटाच्या टीमने निवेदन जाहिर करत जगात सध्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे पाऊल उचललं आहे. त्यांनी निवेदनात काय लिहिलं आहे आणि आता ‘धुरंधर २’ ला मोकळं रान मिळणार का? याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊयात.. (Toxic : A Fairytale For Grown Ups)
खरं तर, १९ मार्चला बॉक्स ऑफिसवर तुफान येणार होतं. कारण रणवीर सिंग आणि यश यांचे चित्रपट एकमेकांसमोर येणार होते. मात्र, आता टॉक्सिकने रिलीज डेट पुढे ढकलली आहे. टीमने निवेदन पोस्ट करत लिहिलं आहे की, निर्मात्यांचे उद्दीष्ट हा चित्रपट ग्लोबल ऑडियंसपर्यंत पोहोचवणे आहे. मिडल ईस्टमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी सिनेमा करण्याच्या दृष्टिकोनातून टॉक्सिक हा चित्रपट आम्ही तयार केला आहे. कन्नड आणि इंग्रजी या भाषेत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटातून कनेक्ट करण्यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आला आहे’. (Ranveer Singh & Yash)

पुढे त्यांनी असं देखील लिहिलं आहे की,’कठोर परिश्रमानंतर, हा सिनेमा आम्ही १९ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास उत्सुक होतो. दरम्यान, सध्या मध्य पूर्वेत सुरु असलेल्या तणापूर्ण स्थितीमुळे याचा थेट प्रभाव या सिनेमावर होऊ शकतो. त्यामुळे आता हा चित्रपट ४ जून २०२६ रोजी रिलीज होार आहे.’ दरम्यान, यशच्या चाहत्यांना धक्का बसला असून ‘केजीएफ २’ नंतर मोठ्या पडद्यावर त्याला पाहण्यासाठी लोकं उस्तुक होते. पण आता त्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. (entertainment news)

खरं तर, १९ मार्च हा दिवस चित्रपटप्रेमींसाठी खास ट्रिट अशणार होता. कारण, २०२५ हे वर्ष ज्या ‘धुरंधर’ने गाजवलं त्याचा दुसरा भाग ‘धुरंधर २’ रिलीज होणार आहे. त्यामुळे हमजाची स्टोरी पाहायला लोकं फारचं उस्तुक आहेत. परंतु, याच दिवशी यशचा टॉक्सिक रिलीज होणार होता त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये फारच चढाओढ दिसणार होती. मात्र, आता टॉक्सिकने रिलीज डेट बदलली असल्यामुळे ‘धुरंधर २’ ला पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी संधी मिळाली आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने १ महिन्यापेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये राहून हिंदीसह मराठी चित्रपटांची देखील कोडी केली होती. आणि आता पुन्हा एकदा हिंदी, मराठी आणि काही साऊथच्या चित्रपटांनाही त्याचा फटका बसणार हे फिक्स आहे.

५ डिसेंबरला जेव्हा धुरंधप रिलीज झाला होता त्यावेळी त्याच्या मागे पुढे ‘गोट्या गॅंगस्टर’, ‘आशा’, ‘उत्तर’, ‘क्रांतीज्योति विद्यालय-मराठी माध्यम’ असे चित्रपट रिलीज झाले होते. तसंतर बऱ्याचदा मराठी चित्रपटांना हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागतेच. पण त्यातही आपलं स्थान टिकवण्यात ते यशस्वी ठरतात. यावेळीही धुरंधरच्या लाटेत काही उत्तर, आशा आणि क्रांतिज्योति विद्यालय चित्रपटांनी आपलं स्थान टिकवून ठेवलं होतं. पण तरीही ‘धुरंधर’च्या छत्रछायेत या चित्रपटांना जरा माघार घ्यावी लागली होतीच.
================================
================================
आता १९ मार्च २०२६ रोजी धुरंधर २ रिलीज होणार आहे. त्या तारखेच्या मागेपुढे तिघी, भिडेवाडा रिलीज होणार आहेत. पण इथेच एक गंमत आहे. २०२५ मध्ये ‘धुरंधर’मुळे ‘इक्कीस’, ‘किस किस को प्यार करु २’, ‘तु मेरी मे तेरा मे तेरा तु मेरी’ चित्रपटांना चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे मार्च २०२६ मध्ये ‘धुरंधर २’ मुळे कुठलाच मोठा बॉलिवूडचा चित्रपट रिलीज होणार नाही आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांना फटका बसू शकतो. आता ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा रेकॉर्ड मोडणार का? आणि जून महिन्यात टॉक्सिक किती कमाई करणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. तसेच, २०२६ च्या दिवाळीत यशचा पहिला बॉलिवूड चित्रपट रामायण देखील रिलीज होणार आहे हे विशेष. (Bollywood Movies
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi)