Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

National Film Awards : सचिन पिळगांवकर ते त्रिशा ठोसर; या

आर्यन-शाहरुख खानचं टेन्शन वाढलं! Sameer Wankhede यांनी केला अब्रुनुकसानीचा दावा;

Rajesh Khanna यांच्या सुपरस्टारडम काळात त्यांचा सिनेमा फ्लॉप करण्याचे  कुटील

Dilip Prabhavalkar :  उत्कृष्ट अभिनेता ते प्रतिभावान लेखक!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!

 जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!

by धनंजय कुलकर्णी 14/02/2022

मधुबाला! भारतीय सिनेमातील सर्वात देखणी अभिनेत्री. उणीपुरी दहा एक वर्षाची तिची चंदेरी सफर. पण आजही सौंदर्याचा अंतिम शब्द म्हणजे ‘मधुबाला’ असंच समजलं जातं.  तिचं आस्मानी सौंदर्य, तिचं लज्जतदार लाजणं, तिचं खळाळून हसणं, खोडकरपणे हसणारे तिचे जीवघेणे नेत्रकटाक्ष, प्रेमातील उत्कटता आणि विरहातील व्याकुळता टिपणारे तिचे डोळे, सारं कसं जिवंत, रसरशीत आणि मनाला सुखावणारे होते. एकूणच तिचा रूपेरी वावर आजही एक ‘आयडॉल’ समजला जातो. 

आजच्या युवा पिढीला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल मधुबालाला पडद्यावर पहातानाच नव्हे, तर तिच्या उल्लेखानेही रोमांचित होणारे हजारो रसिक होते. अभिनय सम्राट दिलिपकुमार पासून गानसम्राट किशोरकुमारपर्यंत सारेच तिच्यावर फिदा होते. सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञीचा जन्म देखील १४ फेब्रुवारी! हा तमाम प्रेमिकांकरीता शुभ संकेत समजायला हवा. त्यानिमित्ताने तिचा एक किस्सा आपण बघुयात. 

‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार आणि ‘व्हिनस ऑफ द अर्थ’ मधुबाला या दोघांनी केवळ चार चित्रपटात एकत्र काम केले. पण आजही रसिक या दोघांच्या जोडीला विसरू शकलेले नाहीत. या दोघांमध्ये जो गुलाबी स्नेहबंध निर्माण झाला होता या गोड नात्याचा शेवट मात्र कडवट झाला. 

या दोघेजण पहिल्यांदा राम दरयानी दिग्दर्शित ‘तराना’ या चित्रपटात एकत्र आले. अनिल विश्वास यांचे या चित्रपटाला संगीत होते. ‘सीने में सुलगते है अरमान’, ‘नैन मिले नैन हुए बावरे’, ‘एक मै हू एक मेरी बेकसी की शाम है’, ‘बेईमान तोरे नैनवा निंदिया न आये’ ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. या सिनेमात मधुबालाचा एका निरागस, अल्लड मुलीचा रोल होता. या सिनेमापासूनच दिलीप आणि मधू यांची मने जुळली! 

५ ऑक्टोबर १९५१ साली प्रदर्शित झालेल्या ‘तराना’ सिनेमाने चांगलेच व्यवसायिक यश मिळविले. प्रेक्षकांना ही नवी जोडी पसंत पडली. यानंतर या दोघांचा ‘संगदिल’ हा चित्रपट आला. हा चित्रपट १८४७ च्या  Charlotte Brontë यांच्या अभिजात कादंबरी Jane Eyre वर आधारीत होता. या चित्रपटाला सज्जाद हुसैन यांचे संगीत होते. 

‘ये हवा ये रात ये चांदनी तेरी एक अदा पे निसार है’, ‘दिल मे समा गये सजन फुल खिले चमन चमन’, ‘वो तो चले गये ऐ दिल ‘ हि मेलडीयस गाणी होती. ‘दिल में समा गये’ गाण्याच्या वेळचे मधुबालाच्या चेहऱ्यावरील आरक्त लज्जित भाव (सिनेमा कृष्ण धवल असला तरी!)  रसिकांना आवडून गेले. 

२८ नोव्हेंबर १९५२ रोजी ‘संगदिल’ झळकला. या जोडीचा पुढचा सिनेमा होता मेहबूब खान यांचा ‘अमर’. या सिनेमाचे कथानक काहीसे वेगळे होते. यात मधुबालाने वकिलाची भूमिका केली होती. नौशाद यांच्या संगीतातील ‘इंसाफ का मंदीर है ये भगवान का घर है’, ‘न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहां जाते’, ‘तेरे सदके बलम न करे कोई गम’ ही गाणी सुंदर होती. 

१० सप्टेबर १९५४ रोजी ‘अमर’ रुपेरी पडद्यावर झळकला. या तीनही सिनेमात दिलीप – मधूची जोडी असली तरी प्रेमाचा तिसरा कोन होताच. अनुक्रमे श्यामा, शम्मी आणि निम्मी या सिनेमातून चमकल्या. तरी मधुबालाची भूमिका रसिकांच्या कायम लक्षात राहिली. 

यानंतर १९५६  साली बी आर चोप्रा यांनी त्यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात सुरुवातीला दिलीप कुमार आणि मधुबाला यांना कास्ट केले होते. परंतु, या चित्रपटाचे बाह्य चित्रीकरण मध्य प्रदेश मधील इटारसी जवळ होणार आणि तिथे किमान महिनाभर जाऊन राहावे लागणार, असे कळाल्यानंतर मधुबालाच्या वडिलांनी याला तीव्र विरोध केला. कारण त्या काळात दिलीप कुमार आणि मधुबाला बऱ्यापैकी जवळ आले होते आणि ते दोघे तिकडे जाऊन गुपचूपपणे निकाह करतील याची भीती अब्बाजान यांना वाटत होती. ते या निकाहच्या सख्त विरोधात होते कारण मधुबाला त्यांच्या साठी ‘पैशाची मशीन’ होती. तिच्याच पैशावर त्यांचे घर आणि व्यसनं चालत होती. त्यांना ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हातातून सोडायची नव्हती.   

====

हे देखील वाचा: मराठी सिनेसृष्टीवर प्रेम करणारे दिलीप कुमार

====

बऱ्याच वादावादीनंतर बी आर चोप्रा यांनी शेवटी  मधुबालाला या सिनेमा तून काढून टाकले आणि तिच्या जागी वैजंतीमालाची वर्णी लागली. हा अपमान अब्बाजान यांना सहन झाला नाही आणि त्यांनी सरळ कोर्टामध्ये बी आर चोप्रा यांच्याविरुध्द केस टाकली. मग कोर्टात ट्रायल सुरू झाल्या. जस्टीस तुळजापूरकर त्यावेळी मुंबई हायकोर्टचे जज होते. त्यांच्या बेंच समोर सुनावणी सुरू झाली. 

एकदा दिलीप कुमारला यावेळी कोर्टात साक्षीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी विटनेस बॉक्समध्ये दिलीप कुमारने “मधुबालावर माझे नितांत प्रेम आहे”, याची जाहीर कबुली दिली. दिलीप कुमारची भर कोर्टात मधुबालावर प्रेमाची कबुली, ही त्या काळातली मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ होती. 

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हेडलाईनमध्ये ही बातमी छापून आली होती. इथूनच या दोघांच्या गुलाबी नात्यांमध्ये कटूता निर्माण झाली. दोघे एकमेकाला टाळू लागली. याच काळात ते दोघे के असिफ यांच्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात काम करीत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या ‘मुगल-ए-आझम’ मधील सर्वात सुंदर रोमँटिक दृश्याच्या वेळी हे दोघे परस्परांशी अबोला धरून होते. 

शाही महालाच्या बागेत दिलीप कुमारच्या मांडीवर मधुबाला डोके ठेवून पडली आहे आणि तो  मधुबालाच्या चेहर्‍यावरून मोरपीस फिरवतो या हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात सुंदर प्रणय दृश्याच्या वेळी दिलीप कुमार आणि मधुबाला परस्परांशी बोलत देखील नव्हते. एका सुंदर नात्याचा असा दुर्दैवी अंत झाला.

====

हे देखील वाचा: भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला पडलेलं रुपेरी स्वप्न… मधुबाला!

====

आज मधुबाला नाही दिलीप ही नाही त्यांच्या आठवणी मात्र मनात ताज्या आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.