‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शशी कपूरने अमिताभ बच्चन यांची त्याच्या सिनेमातील भूमिका का ‘डिलीट’ केली?
इंग्रजीमध्ये एक चांगले सुभाषित आहे ‘इफ यू वॉन्ट टू बी हर्ड, देन डोंट सिंग इन अ कोरस’. याचा अर्थ जर तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं तुम्हाला वाटत असेल, तर कोरसमध्ये गाऊ नका. हे सांगण्याची प्रयोजन म्हणजे अमिताभ बच्चन यांचा एक हृदयस्पर्शी किस्सा!
त्यावेळी म्हणजे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा अमिताभ बच्चन स्ट्रगलर होते. चित्रपटात काम मिळावे म्हणून या स्टुडिओतून त्या स्टुडिओत दिवसभर भटकत होते. रोल मिळत होते, नंतर कळत होतं की, त्यांचा तो रोल दुसऱ्या कोणाला दिला गेला.
थोडक्यात दिवस कठीण होते, संघर्षाचा तो कालावधी होता. १९६९ साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेमाच्या दुनियात पदार्पण केले. ब्रेक तर चांगला मिळाला होता, पण संघर्ष मात्र थांबला नव्हता. त्यावेळी अभिनेता शशी कपूर एक एस्टॅब्लिश स्टार बनले होते.
‘जब जब फुल खिले’, ‘वक्त’, ‘कन्यादान’, ‘प्यार किये जा’, ‘हसीना मान जाएगी’ या चित्रपटातून त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे चांगले मित्र होते. दोघांना परस्परांच्या कामाचा कमालीचा आदर होता. त्यामुळे शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यात चांगली मैत्री होती. (Shashi Kapoor And Amitabh Bachchan friendship)
अमिताभ बच्चन कायम शशी कपूर यांच्या सेटसवर जाऊन त्यांना “कुठे काम मिळेल का?” याची चौकशी करत होते. शशी कपूर यांनी देखील अनेक निर्माते दिग्दर्शक यांच्याशी अमिताभ बच्चनबद्दल बोलणी करत असत. पण काम काही होत नव्हतं.
शशी कपूर यांना अमिताभ बच्चन यांच्यातील ‘स्पार्क’ दिसत होता. अमिताभ पुढे मोठा कलाकार होणार याची त्यांना जाणीव होती. पण अमिताभला कामच मिळत नव्हते. त्यामुळे तो कमालीचा अपसेट असायचा आणि दिवसभर कामाच्या शोधात भटकत असायचा. या काळात शशी कपूर इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांच्या ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात भूमिका करत होते.
या चित्रपटात एक अंत्ययात्रेत सीन होता. या मॉब सीनमध्ये अनेक एक्स्ट्रॉ कलाकारांची गरज होती. अमिताभ बच्चन या एक्स्ट्राच्या भाऊगर्दीत सामील झाले. त्यावेळी त्यांना काम आणि पैसा दोन्ही मिळणे गरजेचे होते. त्यांच्या मते, “काम हे काम होतं आणि ते छोटं का मोठं हा प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टिकोन असतो.”
त्यामुळे त्यांनी हे काम स्वीकारले. या प्रसंगाचे चित्रीकरण चालू असताना, शशी कपूर सेटवर आले आणि त्यांनी अमिताभ बच्चन यांना एक्स्ट्रॉ कलाकारांच्या गर्दीत उभे असलेले पाहिलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं. त्यांनी अमिताभला बोलावलं आणि विचारलं, “अरे अमित, तू इथे काय करतोयस?” अमिताभ यांनी सांगितले “मी या चित्रपटात एक्स्ट्राची भूमिका करत आहे.” (Shashi Kapoor And Amitabh Bachchan friendship)
शशी कपूर त्यांना म्हणाले, “अमित, अशा छोट्या भूमिका करून तू आपल्या करिअरवर का पाणी टाकून घेत आहेस?” अशा छोट्या भूमिकांमुळे तुझ्यावर अशाच भूमिकांचे स्टॅम्पिंग होऊ शकते. तू इथे हिरो बनायला आला आहेस. अशा छोट्या भूमिका करून तू स्वत:च तुझ्या करिअरची वाट लावत आहेस.”
त्यावर अमिताभ म्हणाला, “हिरो वगैरे सगळं ठीक आहे पण सध्या मला कामाची आणि पैशाची खूप गरज आहे आहे.” त्यावर शशी कपूरने सांगितले “जर प्रश्न पैशाचाच असेल, तर मी तुला हवे तेवढे पैसे देऊ शकतो. पण कृपया अशा भूमिका करू नकोस.”
पण अमिताभने ऐकले नाही. त्याने इस्माईल मर्चंटच्या ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात एक्स्ट्राची काही मिनिटांची भूमिका केली आणि आपले पैसे घेऊन तो सेटवरून निघून गेला. शशी कपूर ते दृश्य पाहत होते. त्यांच्या लक्षात आले अमिताभ हा स्वाभिमानी आहे. आपण दिलेले फुकटचे पैसे तो घेणार नाही. आपल्या कामाचे/मेहनातीचेच पैसे घेईल. (Shashi Kapoor And Amitabh Bachchan friendship)
शशी कपूर यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी दिग्दर्शकाला बोलावून सांगितलं, “हा जो तरुण आत्ता तुमच्या चित्रपटात भूमिका करून गेला आहे, त्याचे सर्व शॉट तुम्ही डिलीट करून टाका. तो एकदाही या भूमिकेत पडद्यावर दिसता कामा नये.”
स्टार शशी कपूर यांची विनंती अर्थातच दिग्दर्शकाने ऐकली आणि एडिटिंगच्या वेळेला अमिताभ बच्चन यांचे सर्व शॉट्स त्यांनी काढून टाकले. यामुळे अमिताभवर एक्स्ट्रा कलाकाराचा बसू पहाणारा शिक्का पुसला गेला. यातून दोन्ही परपज साध्य झाले. अमिताभला पैसे ही मिळाले आणि एक्स्ट्रा म्हणून त्याची भूमिका आणि मान्यता दोन्ही थांबले गेले.
पुढे अमिताभला हळूहळू चित्रपटात कामे मिळू लागली. काही वर्षातच त्याला प्रकाश मेहरांचा ‘जंजीर’ मिळाला आणि त्याच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढे शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपट एकत्रित केले. (Shashi Kapoor And Amitabh Bachchan friendship)
====
हे देखील वाचा – मजरूह सुलतानपुरी यांनी फैज यांच्या नज्म मधील एक ओळ घेऊन बनवले ‘हे’ अजरामर गीत!
====
‘रोटी कपडा और मकान’, ’दिवार’, ‘कभी कभी’, ‘इमान धरम’, ‘त्रिशूल’, ’काला पत्थर’, ’सुहाग’, ‘दो और दो पांच’, ‘सिलसिला’, ‘नमक हलाल’, ’शान’, ‘अकेला’ या तब्बल १२ चित्रपटातून त्यांनी एकत्र भूमिका केल्या. पण शशी कपूरने त्यावेळी १९६९ साली दाखवलेला ‘दूरदर्शीपणा’ अमिताभच्या करिअरला आकार देणारा ठरला.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही भावस्पर्शी आठवण लिहून ठेवली आहे. मैत्री असावी तर अशी! आपल्या मित्रातील टॅलेंट ओळखून त्याला वेळीच योग्य रस्त्यावर आणण्याचे काम शशी कपूर यांनी केले. त्यामुळेच अमिताभ बच्चन शशी कपूर यांचे कायम ऋणी होते. (Shashi Kapoor And Amitabh Bachchan friendship)