दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मायानगरीचे स्थलांतर – ये अंदर की बात है!
साधारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हाची गोष्ट. त्यावेळी मुंबईमध्ये असलेली चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशातही व्हावी यासाठी योगी प्रयत्नशील होते. त्यावेळी त्यांनी अनेक उत्तर भारतीय कलाकारांच्या भेटीगाठी घेतल्या. यात उदित नारायण यांच्यापासून अनेक कलाकार त्यांच्या भेटीला दाखल झाले होते.
त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निदर्शनंही करण्यात आली होती. मुंबई म्हणजेच महाराष्ट्रातली सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात कशी नेली जाऊ देणार नाही, याबद्दलची वक्तव्य त्यावेळी झाली होती. त्यानंतर योगी तिकडे परत गेल्यावर याला विराम लागला होता.
आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याला कारण ठरलं आहे ते योगींनी केलेली नवी घोषणा. अगदी अलिकडेच योगींनी केलेल्या घोषणेनुसार ते आता मुंबईत उत्तर प्रदेश भवन उभारणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या नागरिकांच्या समस्या. त्यांच्या अपेक्षा याद्वारे पूर्ण करता याव्यात ही त्यामागची मुख्य भावना असली तरी त्याचा छुपा अजेंडा वेगळा असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रातल्या जाणकारांच्या वर्तुळात सुरू आहे. (Will Bollywood shift to UP?)
महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे उद्योग तिकडे नेणे… हा त्यातला एक भाग आणि दुसरा महत्वाचा भाग असा की, मुंबई आणि परिसरात तरतरुन उगवलेल्या फिल्म इंडस्ट्रीला उत्तर प्रदेशची दारं उघडी करून देणं. खरंतर योगींच्या घोषणेनंतर या दोन गोष्टीच्या चर्चांना ऊत आला आहे. पण खरंच असं होईल का, हा मुद्दा आहे.
खरंतर कोणत्याही इंडस्ट्रीचा विकास व्हायचा असेल, तर तिला पूरक वातावरण तयार करून वाढवावं लागतं. त्यासाठी काही सवलती द्याव्या लागतात. भूखंड द्यावे लागतात. त्या इंडस्ट्रीसाठी पोषक सामाजिक आणि सार्वजनिक वातावरण तयार करावं लागतं. त्यानंतर ती इंडस्ट्री तिथे रुजते. मुंबईने आणि अर्थातच महाराष्ट्राने हे सगळं सिनेसृष्टीला दिलं. स्टुडिओ उभारणीसाठी भूखंड वगैरे दिलेच. अनुदान आदी गोष्टींसाठीही हात सढळ ठेवला. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती अशा उद्योगांना सुरक्षित वाटेल याकडेही पाहिलं.
हे काही एका रात्रीत झालेलं नाही. हळूहळू या गोष्टी घडत गेल्या. असं घडतानाही अनेक दुर्दैवी घटनाही घडल्याच. फार लांब कशाला जायचं अगदी अलिकडेपर्यंत मढमधून परत यायला बस नसे. त्यातून महिलांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अनेकांना रात्री लुबाडलं जात होतं. पण ही स्थिती लक्षात घेऊन अनेक नवे उपाय तिथे केले गेले.
आता इतक्या वर्षांनंतर सगळंच सेट झालं आहे. कलाकारांच्या घरांपासून चित्रिकरणाच्या स्थळांपर्यंत प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत. अशावेळी अचानक उठून इकडून मी सांगतो तिकडे चल…मी तुम्हाला अमूक देईन…असं कोणी म्हणालं, तर ते तितकं साधं राहिलेलं नाही. (Will Bollywood shift to UP?)
अभिनेते रणजीतही पुण्यात आले असताना त्यांनी याचा पुनरुच्चार केला. कुणाला वाटलं म्हणून ती इंडस्ट्री अचानक तिकडे जाणार नाही कारण इंडस्ट्रीने तिथे यावं वाटत असेल, तर तसं पोषक वातावरण तिथे निर्माण करावं लागेल, असं ते म्हणतात.
इथे आपण एक लक्षात घ्यायला हवं की ही इंडस्ट्री मुंबईत वाढली आणि स्थिरावली असली तरी यात काम करणारे बहुतांश लोक हे उत्तर भारतीय आहेत. इथे फॉईस (FWICE) अंतर्गत जवळपास २१ फेडरेशन्स येतात. म्हणजे चित्रपटाशी संबंधित जे जे विभाग आहेत त्या प्रत्येकाची आपली अशी संघटना आहे.
उदाहरणार्थ, ज्युनिअर आर्टिस्ट्स, कलादिग्दर्शक, सिनेमेटोग्राफर्स, निर्माते, कलाकार, स्टंट मॅन, कोरिओग्राफर्स, डान्सर्स, मेकअप आर्टिस्ट इतकंच कशाला सुतार, इलेक्ट्रिशिअन आदी प्रत्येकाची आपली संघटना आहे. यात फार मोठं अर्थकारण चालतं. या संघटनेत यायचं तर काही हजारांची फी द्यावी लागते. इतकंच कशाला, काही वर्षांपूर्वी कलादिग्दर्शकांच्या संघटनेने काही करणाने फेडरेशनला ३३ लाख रुपये देऊ केले होते. यावरुन या संघटना किती गब्बर आहे याचा अंदाज येतो. (Will Bollywood shift to UP?)
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, या संघटनांचे म्होरके आणि वर्किंग कमिटी जी असते त्यात उत्तर भारतीयच भरलेले आहेत. ही सगळी मंडळी साम, दाम, दंड वापरून प्रत्येकाकडून पैसे वसूल करत असतात. यात एकही मराठी गट नाही हे लक्षात घ्यायला हवं.
फार लांब जायची गरज नाही काही वर्षांपूर्वी राजू साप्ते या कलादिग्दर्शकाने अशाच उत्तर भारतीयांच्या दहशतीला आणि हुकूमशाहीला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी स्वत: एक व्हिडिओ जारी करून ही माहीती दिली आणि त्यानंतर लगेचंच आत्महत्या केली होती. इतकं सगळं होऊनही त्यात आलेल्या आरोपींना कोणतंही शासन झालं नाही. ही सगळी मंडळी काही काळापुरती महाराष्ट्राबाहेर जाऊन बसली होती. प्रकरण शांत झाल्यावर जामीन मिळाल्यावर ही मंडळी पुन्हा आपआपल्या संघटनांच्या प्रमुखपदी येऊन बसली. त्यांच्या अशा बेदरकार वर्तणुकीला महाराष्ट्रातला एक नेता कारणीभूत असल्याचंही बोललं जातंय कारण या संघटनांमागे असलेल्या मलईचाच हा सगळा परिणाम आहे. (Will Bollywood shift to UP?)
गणित साधं आहे. इथे कामाच्या शोधात आधी एक सामान्य सुतारकाम करणारा उत्तर भारतीय येतो. तो आपल्या कष्टाने, मेहनतीने आपली जागा पक्की करतो. मग तो आपल्या इतर उत्तर भारतीय बांधवांना कामासाठी इकडे बोलावतो. मग एकाचे दोन.. दोनाचे चार होतात. ती मंडळी स्थिरस्थावर झाली की, ती आपल्या परिचितांना इकडे बोलावतात. हे सगळं सुरू असताना जो पहिला आलेला गृहस्थ आहे, त्याच्या सांगण्यानुसार सगळी काम सुरू होतात.
कुणी कुठलं काम करायचं.. कोणतं काम करायचं नाही हे सगळं तो ठरवू लागतो. एकदा त्याच्या निर्णयाने कामं सुरू झाली की तो त्यांचा नेता होतो.. या सगळ्यात कमाईही असते. हळूहळू तो आपलं काम थांबवतो आणि आपण बोलवलेल्या लोकांकडून.. त्यांनी त्यांच्या ओळखीतून बोलवलेल्या लोकांकडून बिदागी घेणं सुरू होतं.. यातून सावकारी येते.. कारण हा धंदा बिनभांडवली आहे…येतंय का लक्षात?? हा असा पसारा वाढत जातो.
सांगण्याचा मुद्दा असा की, या मंडळींचंही आपलं असं रॅकेट आहे हे खरं आहे. पण ते सध्या महाराष्ट्रात सेट आहे. इथला कुणीही नेता ते रॅकेट तोडू इच्छित नाही. पण अशी एकाधिकारशाही त्यांना उत्तर प्रदेशात राबवता येणारी नाही. कारण, वासरापेक्षा लंगडी गाय बरी अशी अवस्था त्यांची होऊन बसणारी आहे.
या मंडळींना सामाजिक स्तराशी, सुरक्षेशी काही देणंघेणं नसतं. कारण, ही मंडळी उत्तर भारतातून येताना त्याच परिस्थितीतून आलेली असतात. पण या सगळ्या संघटना ज्यांच्या आधारे चालल्या आहेत ते कलाकार, दिग्दर्शक आदींना मात्र सार्वजनिक सुरक्षा, स्तर, प्रतिष्ठा महत्वाची वाटत असते. महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी या वरच्या क्रीमीलेअरसाठी पोषक आहेत. ते वातावरण उत्तर भारतात नाही. (Will Bollywood shift to UP?)
मायानगरी मुंबईत आहे याची भूरळ जरी भारतातल्या अनेकांना पडत असली, तरी त्याची दुसरी एक बाजूही आहे. जी फार लोकांना माहीत नाही. महाराष्ट्राने आणि इथल्या लोकंनी फार प्रयत्नांनी ही इंडस्ट्री इथे रुजवली आहे. ती अशी अचानक जाणं अशक्य आहे.
==========
हे देखील वाचा – गेला कलादर्पण कुणीकडे? संस्कृती कलादर्पण पुरस्कारावरून नवा वाद
==========
अर्थात उत्तर प्रदेश भवन महाराष्ट्रात झाल्यामुळे मायानगरीशी जोडलेल्या लोकांशी संपर्क साधणे त्यांना सोपं होईल हे नक्की. शिवाय, कदाचित योगींनी काही आश्वासनं देऊ केली, तर काही मंडळी जातीलही तिकडे. पण मग जाणारे जाऊ देत. नाहीतरी मुंबई थोडी रिकामी करण्याची गरज आहेच. ते हिंदीत डायलॉग मारतात ना, “बेटा.. आखिर बाप बाप होता है”, तसं आहे हे.