‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अशी आहे अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या स्क्रीन टेस्टची कहाणी
या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी टिनू आनंद यांना ख्यातनाम दिग्दर्शक ‘सत्यजित रे’ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. (पुढे पाच वर्षे त्यांनी ‘रे’ यांच्या सोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं.) त्यामुळे त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ मधील भूमिका सोडून त्यांनी कलकत्त्याला प्रयाण केलं. आता त्यांच्या भूमिकेसाठी कुणाला घ्यावं हा पेच ‘के ए अब्बास’ यांना पडला.
याच दरम्यान त्यांना आठवलं की, त्यांच्याकडे एक छायाचित्र टिनू आनंद यांनी दिले होते, ते अमिताभचं छायाचित्र होतं. त्यांनी अमिताभला (Amitabh bachchan) बोलावलं. त्याचं नाव विचारलं. बच्चन नाव म्हटल्यावर लगेच ‘हरीवंशराय बच्चन’ यांच्याबाबत विचारलं. अमिताभने ते आपले वडील असल्याचं सांगितल्यावर लगेच अब्बास यांनी विचारले “सिनेमात काम करायला त्यांनी परवानगी दिली आहे का?”
अमिताभने होकारार्थी मान हलवल्यावरही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी त्याला दोन दिवसांनी भेटायला यायला सांगितलं. या दरम्यान त्यांनी हरिवंशराय बच्चन यांना टेलिग्राम करून खात्री करून घेतली आणि मगच आपल्या चित्रपटात भूमिका दिली. अशाप्रकारे अखेर अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांची मायानगरीतल्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मागच्या शतकातील महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेमाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण तुम्हाला माहित आहे का की, याच अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेमात प्रवेश करताना फार मोठा संघर्ष करावा लागला होता. कलकत्त्याला नोकरी करत असताना बिग बी मुंबईमध्ये अभिनयाच्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करण्यासाठी आले होते.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बच्चन परिवार यांचे चांगले घरगुती संबंध होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना एक पत्र देऊन मुंबईला पाठवलं. हे पत्र अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी अभिनेता मनोज कुमार यांना दिलं. मनोज कुमार आणि पंतप्रधान यांच्यामध्येही चांगले संबंध होते.
त्यावेळी मनोज कुमार मोहन सैगल यांच्या ‘साजन’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. रूपतारा स्टुडिओ येथे या सिनेमाचे चित्रीकरण चालू होते. मनोजकुमार यांनी दिग्दर्शक मोहन सैगल यांना अमिताभची स्क्रीन टेस्ट घेण्याची विनंती केली. मोहन सैगल यांनी त्यांचे सहाय्यक ग्रोवर यांना अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांची स्क्रीन टेस्ट घ्यायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी अमिताभ बच्चन आल्यानंतर त्यांना एक डायलॉग ग्रोवर यांनी त्यांना दिला. हा डायलॉग कुठल्याही सिनेमातला नव्हता. ग्रोवर यांनी त्यांच्या प्रेयसीला लिहिलेलं ते एक पत्र होतं. हा डायलॉग असा होता “निम्मो, जब भी मै तुम्हे देखता हूँ सब कुछ भूल जाता हू. क्या हुआ, कैसे हुआ, कुछ समझ नही आता. नजारा पूनम के चांद का हो या संगेमरमर के ताजमहल का … खुदा जानता है तुमसे बढकर और कोई नजारा है ही नही…”
अमिताभ बच्चन यांनी अतिशय धीर गंभीर आणि भावस्पर्शी स्वरात आणि चेहऱ्यावर रोमँटिक भाव दाखवत स्क्रीन टेस्ट दिली. त्यानंतर या संवादाची रेकॉर्डिंग टेप मोहन सैगल यांच्याकडे पाठवण्यात आली. मोहन सैगल यांनी ते फुटेज पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त करत “या मुलाने माझा वेळ आणि फिल्म वाया घालवली आहे”, असे म्हणत अमिताभला स्क्रीन टेस्टमध्ये रिजेक्ट केलं.
अमिताभ बच्चन निराश होऊन पुन्हा दिल्लीला रवाना झाले. मनोजकुमार यांनी त्यांना ‘यादगार’ चित्रपटात एक छोटी भूमिका देऊ केली, पण अमिताभचे मन उडाले होते. कारण याच काळात अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) ऑल इंडिया रेडिओवर देखील असेच रिजेक्ट झाले होते. त्यांचा आवाज तिथल्या अधिकाऱ्यांना अजिबात आवडला नाही.
=======
हे देखील वाचा – दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं ‘असं’ कृत्य की त्याचा त्यांना झाला पश्चात्ताप
=======
संकट आली की समूहाने येतात असं म्हणतात. किमानपक्षी रेडीओवरील जाहिरातीत तरी आपला आवाज यावा, असं अमिताभला वाटत होतं. त्या आवाजाच्या टेस्टसाठी ते ‘अमीन सायानी’ यांच्या ऑफिसमध्ये गेले. पण अमीन सायानी यांच्याकडून नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडून नकारघंटा आल्यामुळे अमिताभ बच्चन नाराज झाले होते.
याच वर्षी दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास त्यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमाची जुळवाजुळव करत होते. यातील एक भूमिका टिनू आनंद यांना मिळाली होती. आनंद यांनीच अमिताभ बच्चन यांचे एक छायाचित्र दिग्दर्शक के अब्बास यांना दिलं होतं. अब्बास यांना प्रथमदर्शिनी अमिताभ यांचा चेहरा तेवढा काही आवडला नव्हता.