Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पोलीस स्टेशन मधील ‘झंकार’ प्रेमगीत

 पोलीस स्टेशन मधील ‘झंकार’ प्रेमगीत
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

पोलीस स्टेशन मधील ‘झंकार’ प्रेमगीत

by गणेश आचवाल 11/12/2020

एखादे गाणे जेव्हा चित्रपटातील प्रसंगांना अनुसरून असतं किंवा कथेला पुढे घेऊन जाणारं असतं, तेव्हा त्या गाण्याची रंगत अजूनच वाढते. ‘शेंटिमेंटल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर पाटील आणि संगीतकार मिलिंद जोशी यांची भेट झाली. मिलिंद त्या चित्रपटाचे संगीत करणार होता. पोलीस सेवेत कार्यरत असणारा एक तरुण आणि एक तरुणी यांच्यातील प्रेमाची ती कथा होती आणि पोलीस स्टेशन मध्येच प्रेमगीत चित्रित झालं पाहिजे, असं ठरलं होतं.

समीर पाटीलने मिलिंदला सांगितलं की तुला ही काही सुचलं आणि तू शब्द रचना केलीस तरी काही हरकत नाही. मिलिंद जोशी याच्या पुढे हे एक मोठे आव्हान होते कारण पोलीस स्टेशन मध्ये प्रेमगीत चित्रित करायचे आहे, म्हणजे गाण्यात निसर्ग, झाडे, पाने, वेली काही नाहीत. गाण्यामध्ये पोलीस स्टेशन मधील दृश्येही येणार होती. मिलिंद स्वतः पूर्वी जाहिरात क्षेत्रात देखील कार्यरत असल्याने त्याला एखाद्या गोष्टीचे व्हिज्युअलायझेशन उत्तम जमतं. त्याने शब्द लिहिले,’इथंच झाला तुझ्या नि माझ्या हृदयाचा  झंकार, इथंच मांडू तुझ्या नि माझ्या प्रेमाचा संसार’. दिग्दर्शक समीर पाटील यांना ते शब्द खूप आवडले. पोलीस स्टेशन, तिथलं वातावरण, ठेवलेल्या फाईल्स, चाललेला व्यायाम, मध्येच चोराला पकडून आणणं या सर्वांच्या साक्षीनं त्या दोघांचं प्रेम फुलतं, असं उत्तम पद्धतीने गाणे चित्रित करायचे ठरले.

गीतकार संगीतकार मिलिंद जोशी

या गाण्याला संगीत देताना मिलिंद जोशी स्पॅनिश गिटार, मेलडीज यांचा वापर तर केला आहेच, पण आजच्या काळाला हे गीत कसं योग्य ठरेल याचाही विचार केला. आजच्या ट्रेंड मध्ये हे गीत पूर्ण योग्य वाटलं पाहिजे, असा विचार मिलिंद याने संगीतकार या नात्याने केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गाणे चित्रित होणार असल्याने तो तरुण लग्नाच्या बंधनात अडकला हे दाखवताना तो तरुण आणि ती तरुणी या दोघांच्याही हातात बेड्या दाखवल्या आहेत. विकास पाटील आणि पल्लवी पाटील यांच्यावर हे गीत चित्रित झालं आहे.

हे हि वाचा : ‘हरहुन्नरी’ असा आपला तुषार साळी सगळ्यातच भारी !

हे गीत अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले. अवधूतच्या आवाजात तो मराठी बाणा सुद्धा आहे आणि अर्थात प्रेमगीत गातानाचा जो एक स्टायलिश नखरा म्हणता येईल तो देखील आहे. या गीतात ‘संसार’ या शब्दाचा उच्चार मुद्दामहून हिंदी मधील ‘संसार’ शब्दाप्रमाणे केला आहे. आपण शहरी वातावरणात एकदम मिसळून जातो, तेव्हा आपले काही शब्दांचे उच्चार बदलतात, असा विचार देखील एक संगीतकार या नात्याने मिलिंदने इथे केलेला दिसतो.

अशोक सराफ, उपेंद्र लिमये हे सुद्धा या गाण्यात आहेत. या गाण्याचे संगीत संयोजन मिथिलेश पाटणकर याने केले आहे. मिलिंद जोशी याने गीतकार आणि संगीतकार या दोन्ही भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi songs music Music composer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.