Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा

“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

स्वयंवराची १०४ वर्ष!

 स्वयंवराची १०४ वर्ष!
नाट्यकला मिक्स मसाला

स्वयंवराची १०४ वर्ष!

by रश्मी वारंग 11/12/2020

नाटकाची शंभरी सोपी गोष्ट नाही. कथा, लेखन, सादरीकरण या सगळ्याच बाबतीत नाटकाचं नाणं खणखणीत असल्या शिवाय पिढ्यानु पिढ्याते नाटक सादर करत राहावंसं वाटू शकतं नाही. मात्र विविध नाटक कंपन्यांना आजही जे खुणावतं, सादर करावसं वाटतं असं संगीत नाटक म्हणजे ‘स्वयंवर’. १० डिसेंबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीतर्फे मुंबईत झाला होता. १०४ वर्षं जुन्या नाटकाचं हे स्मरणरंजन!

नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर लिखीत – दिग्दर्शित या पाच अंकी नाटकाने संगीत नाटक ही संकल्पना ख-या अर्थाने रंगभूमीवर रुजवली. रुक्मिणी आणि कृष्णाची स्वयंवर कथा या नाटकाने मांडली. रुक्मिणीच्या भूमिकेत खुद्द बालगंधर्व तर कृष्णाच्या भूमिकेत गणपतराव बोडस होते. ही प्रेमकथा रसिकांना भावली. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे नाटकातील पदं. मूळ नाटकात ५७ पदं होती विविध नाटक कंपन्या त्यापैकी निवडक पदं सादर करीत. भास्करबुवा बखले यांनी चाली दिलेली पदं खुद्द बालगंधर्वांच्या मुखातून ऐकणं ही रसिकांसाठी पर्वणी असायची. ‘नरवर कृष्णा समान.. नाथ हा माझा.. मम आत्मा गमला.. मम मनीं कृष्ण सखा.. करी यदुमनी सदना.. मम सुखाची ठेव…सुजन कसा मन चोरी.. स्वकुलतारक सुता ह्या नाट्यपदांवर आजही नाट्य रसिक डोलतात.

हे देखील वाचा: वंदना गुप्ते यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट !

‘संगीत स्वयंवर’ हे मराठी रंगभूमी वरील सर्वात श्रीमंत नाटक म्हणता येईल. शब्दशः या नाटकाने अत्तराचे दिवे लावण्याचा अनुभव रसिकांना दिला. अत्तरात न्हाऊन निघालेले बालगंधर्वांचे भरजरी शालू  प्रेक्षकांना श्रीमंती सुवासिक अनुभव देत. ही अत्तरं पॅरिसहून खास मागवण्यात आली होती. रुक्मिणीचे दागिनेही खास घडवण्यात आले होते. हे सारं ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्र पाहण्यासाठी रसिक गर्दी न करते तर नवल!

या नाटकाने ख-या अर्थाने गंधर्वयुगाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. खाडीलकरांचे हे तिसरे नाटक. संगीत रंगभूमीची नाडी ओळखून या नाटकाने प्रेक्षकांना बांधून टाकलं. आजही नवनव्या नटसंचात निवडक नाट्यपदांसह हे नाटक कलावंतांना सादर करावंसं वाटतं यातच या नाटकाचं यश सामावलेलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Natak Natak
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.