Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास

 सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास
कलाकृती विशेष

सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास

by दिलीप ठाकूर 20/10/2023

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, पण काही विक्रम कधीच मोडले जाणाऱ्यातील नाहीत. यश चोप्रा निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्म या बॅनरचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल युगाच्या भाषेत डीडीएलजे. २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते. तेथे दिवसा तीन खेळ याप्रमाणे प्रवास केल्यावर हा चित्रपट मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि एकेक वर्ष करत करत अठ्ठावीस वर्षानंतरही तो सुरुच आहे. मी आवर्जून जवळपास प्रत्येक वर्षी १९ अथवा २० ऑक्टोबर रोजी या मराठा मंदिर चित्रपटगृहाला भेट देऊन ‘आठवड्याचा वाढलेला आकडा तो किती बघूया’ असा मनोमन विचार करत नजर टाकतो. (Multiplex)

यावेळी ही संख्या आहे, १३८२ वा आठवडा. अबब म्हणावा असाच हा विक्रमी मुक्काम. जगभरातील कोणत्याही भाषेतील चित्रपट असा इतकी वर्ष चित्रपटगृहात मुक्काम करु शकत नाही. म्हणून तर डीडीएलजेचा प्रवास कोणाला अनावश्यक हट्ट वाटतो. कोणाला ते हास्यास्पद वाटते. सोशल मिडियात अशाच उलटसुलट प्रतिक्रिया दिसतात.चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल अजिबात वाद नाही. कितीदाही पहावा झक्कास मनोरंजन आहे. पण असा तेराशे आठवड्यांचा मुक्काम ही हळूहळू कौतुकाची गोष्ट न राहता, थट्टेचा विषय बनते. आज मी काही काळ ‘तिकीट विंडोज’वर थांबलो. वय वर्ष अठ्ठावीस तीसपेक्षा कमी असलेले युवक युवती डीडीएलजे पाहायला खरंच येत होते. संख्या अगदीच किरकोळ असेल पण अगदीच कोणी नाही ‘ऐसे तो हालात नही’ हे कमी महत्वाचे नाही. बरं तिकीट दर किती ? तर ड्रेस सर्कल तीस रुपये आणि बाल्कनी चाळीस रुपये असे. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या परंपरेतील आहेत. मध्यंतरी कोरोना प्रतिबंधक काळात हे खेळ थांबले होते इतकेच. पण आता हा विक्रम पुरे असेच म्हणावेसे वाटते.(Multiplex)

यश चोप्रा यांनी आपल्या दिग्दर्शनात जे भावनिकपण जपले (वक्त, इत्तेफाक, दाग, दीवार, मशाल, चांदनी, लम्हे यात ते अनेक दृश्यात आहे), रोमान्स खुलवला, गीत संगीत व नृत्याची बहार खुलवली, ते सगळे त्यांचा पुत्र आदित्य चोप्राने अतिशय आकर्षक पॅकेजमध्ये ( काळ बदलला होता हो. मसाला मिक्स हा शब्द मागे पडला) पहिल्याच दिग्दर्शनात ते खुलवून रंगवून पडदाभर साकारले आणि ते नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात सुसंगत होतेच. देशात जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यांचे वारे रुजत होते. समाजात नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग वाढत होता. विदेशातील भारतीय हा घटक फोकसमध्ये आला होता. विदेशात शिक्षण, नोकरी, पर्यटन तर झालेच पण लग्न करुन जावई अथवा सून म्हणून जाण्याची संस्कृती रुजत होती आणि त्याच टप्प्यावर डीडीएलजे पडद्यावर आला. चित्रपट प्रदर्शित होण्याचे सही टायमिंग म्हणतात ते हेच. असेच असायला हवे.

डीडीएलजेतही विदेशातील इंग्लंडमधील भारतीय युवक युवतीची प्रेम कथा आणि जोडीला वतन की याद, भारतीय असल्याचा अभिमान, देशप्रेम, दोन पिढ्यांतील कळत नकळतपणे संघर्ष असलेली मानसिकता आणि पंजाबी संस्कृती हीच गोष्ट आहे. सगळे कसे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जुळून येत होते. चित्रपटाचा इतिहास विचारात घेताना असे सगळेच फंडे महत्वाचे. पडद्यावरचा चित्रपट व प्रत्यक्षातील समाज यांचा ताळमेळ हा असतोच असतो. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती अशी जगावेगळीच आहे. या पिक्चरच्या एक हजाराव्या आठवड्यात शाहरूख खान आणि काजोल मराठा मंदिर चित्रपटगृहात आवर्जून आले होते. आपल्याच चित्रपटाच्या यशाचा असा प्रवास त्यांनी असा येऊन एकदा पहावा हे विशेष उल्लेखनीय आहे.

डिजिटल मिडियात बातमी झाली हो ही. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट आपले महत्त्व टिकवून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा ११० वर्षांवर फोकस टाकताना डीडीएलजे पहिल्या पंचवीस चित्रपटात येतोच. इतिहास म्हणतात तो अशा गोष्टीने पुढे सरकतो. खरं तर या चित्रपटाचे यश कशात? राज मल्होत्रा (शाहरूख खान) आणि सिमरन सिंग (काजोल) यांच्यातील ही अगदी दिलखुलास, मिस्कील, मार्मिक, खेळकर, खोडकर अशी प्रसन्न प्रेमकथा आहे. इंग्लंडमधील देखणं आकर्षक शूटिंग आहे. झक्कास आऊटडोअर्स लोकेशन आहेत. याची गाणी आजची वाटतात. म्युझिक चॅनलवर पुन्हा पुन्हा पाहताना, रिंगटोन, काॅलरटूनवर ऐकताना, यू ट्यूबवर पाहताना ती रिलॅक्स करतात. तुझे देखा तो मै जाना सनम ( पार्श्वगायक कुमार शानू व लता मंगेशकर), जरा सा झूम लू मै ( आशा भोसले व अभिजित भट्टाचार्य), मेरे ख्वाबो मे जो आये ( लता मंगेशकर), मेहंदी लगा के रखना ( लता मंगेशकर व उदीत नारायण), हो गया है तुजको जो प्यार सजना ( लता मंगेशकर व उदीत नारायण), रुक जा ओ दिल दीवाने ( उदीत नारायण) एक गाणे होतेय तोच दुसरं हवेसे वाटते. आणि यातलं कोणतेही गाणे आठवले वा गुणगुणले तरी डोळ्यासमोर पडद्यावरचे गाणे येते. येथे दिग्दर्शक दिसतो म्हणायचे. (Multiplex)

डीडीएलजे इतिहासासोबत वाटचाल करीत येथपर्यंत आला आहे आणि हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सर्वोत्कृष्ट दहा प्रेमकथांमध्ये डीडीएलजेची राज आणि सिमरन यांच्या या प्रेमकथेचा समावेश होतोच. एक टप्पा राज कपूर दिग्दर्शित ‘बाॅबी’ (१९७३) या मोकळ्या ढाकळ्या प्रेमपटाचा होता. तोही पन्नास वर्षांनंतरही तारुण्यात. इतकेच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा अभ्यास करताना रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) पर्यंतचा चित्रपट, आणि ‘शोले’ ते ‘डीडीएलजे असा एक स्थित्यंतरचा टप्पा आणि डीडीएलजे ते त्यानंतरचा काळ असा तो फोकस टाकला जातो.

डीडीएलजेनंतर व्यावसायिक चित्रपटाच्या स्वरुपात बदल होत गेला. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण डीडीएलजेने एक हजार आठवड्यांचा प्रवास पूर्ण केला (नोव्हेंबर २०१४) तेव्हा मिडियात ‘शोले’ आणि ‘डीडीएलजे’ यांच्या यशाची तुलना झाली. वृत्तवाहिन्यांवर त्यावर बरीच उलटसुलट चर्चा रंगली. तशी व्हायलाच हवी.हा दोन भिन्न पिढीतील संवाद होता. त्यामुळेच हे दोन्ही चित्रपट सारखेच सरस ठरले. ( माझं मत ‘शोले’च सरस. कालही, आजही आणि उद्याही. अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय माध्यम संदर्भात ‘शोले’ सतत आपलं अस्तित्व दाखवतोच. रिॲलिटी शोपासून काॅमेडी शोपर्यंत सतत कुठे ना कुठे ‘शोले’चा संदर्भ आहे. दूरवरच्या गावात कोणी पाण्याच्या टाकीवर चढले की ‘शोले’च डोळ्यासमोर येतो.)

==========

हे देखील वाचा : ‘या’ अभिनेत्याने यश चोप्रासोबत केलेला हा एकमेव चित्रपट

==========

‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ प्रदर्शित झाला तेव्हा तो असा बहुस्तरीय आणि अबब म्हणावा असा प्रवास करेल असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. तरी बरं चित्रपटसृष्टीत ज्योतिषी खूप आहेत. चित्रपटाच्या जबरदस्त यशाने त्याची सगळीच समिकरणे बदलून टाकलीत, बदल ही तर केवढी तरी मोठी गोष्ट आणि तेच त्याचे वेगळेपण आहे आणि मोठेच यश आहे. सिनेमाच्या जगात तर यश म्हणजेच बरेच काही असते…सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स (Multiplex), ओटीटी असा प्रवास झाला, चित्रपट समिक्षक ते सोशल मिडियातील ट्रोलर अशी प्रगती आहे. पण दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे अनेक किस्से, आठवणी, गोष्टी, दंतकथा यासह कायम आहे. दिवाळीत चकाचक चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेण्डही डीडीएलजेने आणला आणि त्यात शाहरुख खान ‘मेन हीरो’ राहिलाय.

  • 3
    Share
    Facebook
  • 2
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 2
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity Entertainment Featured journey Multiplex single skin
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.