महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
एका लग्नाने संपवले उदित नारायणचे करियर !
फुलों सा चेहरा तेरा, मेरा रंग दे बसंती चोला, मैं यहाँ हूँ यहाँ अशी १५००० गाणी आणि २५ वर्षे हिंदी, मैथिली, भोजपुरी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड, नेपाळी अशा भाषांमध्ये गायन केलेला गायक म्हणजे मेलोडी किंग, रोमँटिक गाण्यांचा अनभिषिक्त बादशाह उदित नारायण !! बिहारमधील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. गायनाचे टॅलेंट त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले. त्यांनी किशोरवयापासून गायनाला सुरुवात केली. पुढे शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्या भवनमध्ये ऍडमिशन घेतले.(Udit Narayan)
१९७० पासून नेपाळ रेडिओ स्टेशनमध्ये गायक म्हणून सुरुवात आणि फिल्मी करियरची सुरुवात नेपाळी फिल्म सिंदुर पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता खर्च भागवायला त्यांना बार आणि हॉटेल्स मध्ये गायन करावे लागे. त्यांचा बॉलिवूड डेब्यू ‘उन्नीस बीस’ या फिल्ममधून मोहम्मद रफी यांच्यासोबत डुएट द्वारे झाली नंतर किशोर कुमार, लता मंगेशकर, आर डी बर्मन यांच्यासोबत गायची संधीसुद्धा मिळाली. ‘कयामत से कायम तक’ या फिल्मची गाणी सुपरहिट ठरली आणि मग तिथून त्यांच्या करियरची गाडी एकदम सुसाट सुटली. इतकी की ते बॉलिवूड मधील एकमेव असे गायक आहेत जे सलग तीन दशके फिल्फेअर पुरस्कार जिंकत राहिले पुढे ‘पहेला नशा’ या गाण्याने त्यांना सुपरस्टारडम दिले. (Udit Narayan)
तुम्हाला वाटत असेल की, एवढया यशस्वी माणसाचे आयुष्य किती मस्त असेल पण त्यांचे वैवाहिक आयुष्य खूपच वादळी, अनेक कोर्ट केसेसने भरलेले आणि बरीच लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. हे सर्व त्यांना त्यांच्या दोन लग्नांमुळे झाले होते. त्यांचे पहिले लग्न १९८४ साली रंजना झा यांच्याशी झालं होते. त्याकाळी उदितजी एवढे फेमस झाले नव्हते त्यामुळे या लग्नाबद्दल जास्त कोणाला माहितीच नव्हते. लग्नानंतर उदीतजी स्ट्रगल करण्यासाठी मुंबईला आले. तिथे त्यांना यश मिळायला चालू झाले होते आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.आपल्या पहिल्या बायकोकडे सुद्धा नाही !! (Udit Narayan)
पहिल्या लग्नाच्या अवघ्या २ वर्षांनंतरच त्यांची भेट झाली दीपा गेहत्रज यांच्याशी. दीपा एअर होस्टेस होती आणि छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्स मधून गात राहायच्या. एका गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी त्यांची पहिली भेट झाली आणि त्यांनी उदित नारायण यांना गाताना ऐकले आणि त्याक्षणी त्यांच्या प्रेमात पडल्या. १९८५ साली दीपा आणि उदित यांनी लग्न केले. उदित नारायण यांनी पहिल्या बायकोला त्यावेळी घटस्फोट दिला नव्हता आणि लग्नाच्या वेळी उदितजींच्या पहिल्या लग्नाबद्दल दीपाला ठाऊक होते की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव ठेवले आदित्य. हाच आदित्य सध्या प्रसिद्ध गायक झाला आहे.(Udit Narayan)
पुढे २००६ साली उदित नारायण (Udit Narayan) एक शोच्या निमित्ताने पटनामध्ये आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या हॉटेलमध्ये रंजना यांनी जबरदस्तीने प्रवेश केला आणि ‘मी उदीतची बायको आहे आणि त्यांनी मला न सांगता दुसरे लग्न केले आहे, मला माझा हक्क हवा आहे.’ असे ओरडत दंगा घातला. जेव्हा त्यांना तुम्ही इतक्या उशिराने का बोलत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा जेव्हा जाहीरपणे सांगण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तेव्हा उदित मला आत्महत्येची धमकी देत असत” या सर्व प्रकारावर उदित नारायण यांनी एक स्टेटमेंट प्रसिद्धीस दिले ज्यात त्यांनी असे सांगितले की, “या महिलेला मी ओळखत नाही ना मी हिला कधी भेटलो आहे. हा सर्व मला बदनाम करण्याचा डाव आहे. मला ४-५ वर्षांपूर्वी असे धमकीचे कॉल आले होते पण मी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही कारण मला वाटले की, आर्टिस्ट सोबत असे होतच असते”. रंजनाला या स्टेटमेंटमुळे मोठा धक्का बसला आणि त्यांना दुःख देखील झाले. मग त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली आणि तिथे त्यांनी लग्नाचे फोटो आणि सर्टिफिकेट्ससह सर्व कागदपत्रे दाखवली ज्यात उदित नारायण यांचा नवरा म्हणून उल्लेख होता.
==========
हे देखील वाचा : सिनेमावृद्धीसाठी प्रयत्न की थिएटरची मार्केटिंग ?
==========
हे सर्व कागदपत्रे बघून महिला आयोगाने उदित नारायण (Udit Narayan) यांना नोटीसा पाठवल्या. पण या नोटिसांना उदित नारायण यांनी कधी उत्तर दिले नाही. जेव्हा महिला आयोगाने उदित नारायण यांना भारताबाहेर जाण्याला बंदी घातली तेव्हा ते कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्यास तयार झाले. यानंतर हे जोडपे एका ठिकाणी भेटले आणि तिथे सेटलमेंट करण्यात आली जी ४ तास चालू होती. जेव्हा कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली आणि मग ४ महिन्यांनी पहिल्या लग्नबद्दल त्यांनी कबुली दिली. या सेटलमेंट मध्ये कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झाली नाही फक्त रंजना या दीपा सोबत उदित यांच्या घरी पत्नी म्हणून राहतील असे ठरले. या सर्वांनंतर उदित नारायण यांचे करियर डबगाईला आले आणि बरेच निर्माते आणि संगीतकार त्यांच्यासोबत काम करण्यास कचरू लागले.